जाहिरात

Malasana Benefits: रोज मलासनाचा सराव केल्यास काय होतं? मलासनात किती वेळ बसावे? योगगुरूंनी दिली मोठी माहिती

Malasana Benefits: मलासनाचा रोज सराव केल्यास काय होतं? मलासनाचा सराव करण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घेऊया माहिती...

Malasana Benefits: रोज मलासनाचा सराव केल्यास काय होतं? मलासनात किती वेळ बसावे? योगगुरूंनी दिली मोठी माहिती
"Malasana Benefits: मलासन करण्याचे फायदे"
Canva

Malasana Benefits: मलासन हे एक अतिशय सोपे पण आरोग्यासाठी प्रभावी योगासन आहे, या आसनाचा नियमित सराव केल्यास आरोग्यास असंख्य फायदे मिळतील. सेलिब्रिटी योग प्रशिक्षक अंशुका परवानी यांनी इंस्टाग्राम हँडलवर मलासनाची माहिती देणारा व्हिडीओ शेअर केलाय. मलासनाचा योग्य पद्धतीने सराव केल्यास कोणते फायदे मिळतील, याची माहिती त्यांनी व्हिडीओद्वारे दिलीय. मलासनामध्ये किती वेळ बसावे, मलासन करण्याची योग्य पद्धत यासह सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

मलासनाचा रोज सराव करण्याचे फायदे | Malasana Benefits In Marathi

पचनप्रक्रिया

मलासन केल्यास पोट आणि आतड्यांवर हलकासा ताण येतो, ज्यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.  

ओटीपोटातील अवयवास लाभदायक

ओटीपोटाच्या भागातील स्नायू मजबूत होतील, हे आसन महिला आणि पुरुष दोघांसाठी फायदेशीर आहे.  

PCOD, PCOS आणि मासिक पाळीशी संबंधित समस्या 

मलासनाचा सराव केल्यास महिलांच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळेल. यामुळे अनियमित मासिक पाळी, PCOD आणि PCOS यासारख्या समस्यांपासून सुटका मिळेल. 

कंबरदुखीपासून सुटका

जे लोक कंबरदुखीच्या समस्येमुळे त्रस्त असतील त्यांच्यासाठी मलासनाचा सराव करणं फायदेशीर ठरेल. यामुळे पाठीचा कणा मजबूत होईल, ज्यामुळे नैसर्गिकरित्या पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास कमी होईल. 

Weight Loss Tips: सुटलेले पोट होईल सपाट, काय खाल्ल्याने वजन होईल कमी? वैद्यांनी दिली महत्त्वाची माहिती

(नक्की वाचा: Weight Loss Tips: सुटलेले पोट होईल सपाट, काय खाल्ल्याने वजन होईल कमी? वैद्यांनी दिली महत्त्वाची माहिती)

गुडघे आणि पायांचे स्नायू होतील मजबूत

मलासनाचा नियमित सराव केल्यास गुडघे, टाचा, मांड्या, पायांचे स्नायू मजबूत होतील. 

मानसिक शांतता 

Fasting Benefits: उपवास केल्यास कोणते आजार बरे होतील? रोज किती तास उपवास करणं फायद्याचे ठरेल?

(नक्की वाचा: Fasting Benefits: उपवास केल्यास कोणते आजार बरे होतील? रोज किती तास उपवास करणं फायद्याचे ठरेल?)

मलासनाचा सराव कसा करावा? 
  • सर्वप्रथम दोन्ही पायांवर सरळ उभे राहा आणि दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा. 
  • यानंतर हळूहळू श्वास घेत स्क्वॅट्स पोझिशनमध्ये बसा.  
  • पूर्णपणे जमिनीवर बसू नये.  
  • दोन्ही हात नमस्ते मुद्रेमध्ये ठेवावे आणि दोन्ही हातांच्या कोपराने गुडघे मागील बाजूने नेण्याचा प्रयत्न करावा. 
  • पाठ सरळ ठेवा आणि समोर पाहावे.  
मलासनाचा किती वेळ सराव करावा? 

सुरुवातीस 30 सेकंद ते एक मिनिटभर मलासनाचा सराव करावा. हळूहळू सवय झाल्यानंतर दोन ते पाच मिनिटांपर्यंत मलासन करण्यास सुरुवात करावी. शरीराच्या क्षमता वाढल्यानंतर पाच ते 10 मिनिटेही मलासन करू शकता. पण शरीरावर जास्त प्रमाणात भार देऊ नये.  

कोणत्या वेळेस मलासनाचा सराव करावा?
  • सकाळच्या वेळेस मलासन करणं फायदेशीर ठरेल. 
  • यामुळे पोट स्वच्छ होण्यासही मदत मिळेल. 
  • याचे सकारात्मक परिणाम तुमच्या शरीरावर होतील. 
  • जेवणानंतर लगेचच मलासनाचा सराव करू नये.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com