Water After Tea: चहा प्यायल्याशिवाय काही लोकांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. दिवसाचा शुभारंभ करण्यापासून ते संध्याकाळचा आळस घालवण्यापर्यंत अशा कित्येक कारणांसाठी चहा प्यायला जातो. पण जास्त प्रमाणात चहा पिणे देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तसेच काही लोकांना तुम्ही ऐकले असेल की चहा प्यायल्यानंतर किंवा चहा पिण्यापूर्वी पाणी पाणी पिणे टाळावे. याच गोष्टींमुळे चहाप्रेमींचा अनेकदा गोंधळ उडतो. जाणून घेऊया यामागील सत्य...
चहा पिण्यापूर्वी पाणी प्यायल्यास काय होते?
चहा पिण्यापूर्वी पाणी प्यायल्यास काय होते, हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी तुम्ही थेट चहा पित असाल तर शरीराचे प्रचंड नुकसान होऊ शकते. यामुळे गॅस आणि अॅसिडिटी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही चहा पिण्यापूर्वी पाणी पिऊ शकता. कोमट पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरेल. यामुळे तुमच्या शरीराची पीएच पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते. म्हणजे चहापूर्वी पाणी पिणे फायदेशीर असते.
(नक्की वाचा: Tea Best Recipe: चहा तयार करताना सर्वात आधी काय मिक्स करावे पावडर, साखर की दूध? 90% लोक करतात ही चूक, जाणून घ्या योग्य पद्धत)
चहा प्यायल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यास काय होईल?
चहा प्यायल्यानंतर लगेचच पाणी पिणे टाळावे, असा सल्ला कित्येक जण देतात. चहा प्यायल्यानंतर पाणी प्यायल्यास सर्दी, नाकातून रक्त येणे आणि दात किडणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. गरमागरम चहानंतर थंडगार पाणी पिणाऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
चहा प्यायल्यानंतर किती वेळ पाणी पिऊ नये?
- चहा प्यायल्यानंतर कमीत कमी अर्धा तास पाणी पिऊ नये. पाणी पिणे आवश्यक असल्यास कोमट किंवा साध्या पाणी चूळ भरावी, तोंड स्वच्छ करुन मग पाणी प्यावे.
- दिवसभरात कमीत कमी दोन कपच चहा प्यावा.
- रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)