Black Raisins Benefits: रोज 5 मनुके पाण्यात भिजवून खाल्ल्यास काय होईल? कोणत्या समस्यांमधून मिळेल मुक्तता?

Black Raisins Benefits: रोज काळ्या मनुक्यांचे सेवन केल्यास आरोग्यामध्ये कोणकोणते बदल होतील?

जाहिरात
Read Time: 2 mins
"Black Raisins Benefits: काळ्या मनुक्यांचे सेवन केल्यास शरीराला कोणते फायदे मिळतील?"
Canva

Black Raisins Benefits: डाएटमध्ये सुकामेव्याचा समावेश करण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांकडून दिला जातो. सुकामेव्याचे योग्य प्रमाणात सेवन केलं तर आरोग्यास असंख्य फायदे मिळतील. यातील काळे मनुके रोज खाल्ले तर एक नव्हे शरीराच्या असंख्य समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. डॉ. रुचा पै यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया...

लोहाचा नैसर्गिक स्त्रोत म्हणजे काळे मनुके. अ‍ॅनिमियाच्या समस्येचा सामना करत असाल तर रोज काळे मनुके खाणे फायदेशीर ठरेल. काळ्या मनुकांमध्ये फॉलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स या गुणधर्मांचे प्रमाण जास्त असते. मनुक्यांचे योग्य प्रमाणात सेवन केले तर शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या वाढ होण्यास मदत मिळेल. हिमोग्लोबिनचीही पातळी नैसर्गिकरित्या सुधारेल.

पचनप्रक्रियेस लाभदायक 

  • अन्नाद्वारे लोह शोषून घेण्याची शरीराची प्रक्रिया सुधारते. 
  • अ‍ॅनिमियाची समस्या असणाऱ्या काही लोकांना गॅस, पोट फुगणे, जडपणा जाणवणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.  
  • काळ्या मनुकांमधील मृदू-विरेचन गुणांमुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. 

थकवा, चक्कर येणे, कमकुवतपणा 

  • काळ्या मनुक्यांमध्ये ग्लुकोज आणि मॅग्नेशिअम, अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. 
  • यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, दिवसभराचा थकवा कमी होण्यास मदत मिळते.   
  • मासिक पाळीदरम्यान काही महिलांना जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होतो, यामुळे हिमोग्लोबिनची पातळी कमी होते. 
  • काळ्या मनुक्याचे सेवन केल्यास शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते आणि हिमोग्लोबिनची पातळीही नैसर्गिकरित्या सुधारण्यास मदत मिळते.  

काळे मनुके खाल्ल्यास पोट स्वच्छ होतं का? 

  • काळ्या मनुकांमध्ये मृदू-विरेचन (नैसर्गिकरित्या, कोणताही त्रास न होता पोट स्वच्छ करणारे) गुण असतात.
  • म्हणून मल मऊ होतो. पचनमार्गात सहज गती मिळते आणि पोट नैसर्गिकरित्या स्वच्छ होण्यास मदत मिळते. 

(नक्की वाचा: Why Do You Yawn: दुसऱ्याला पाहून आपल्यालाही जांभई का येते? या 4 गोष्टी 99% लोकांना माहितीही नसतील)

फायबर + नैसर्गिक ग्लुकोज

  • मनुक्यांमध्ये सोल्युबल फायबर, नैसर्गिक ग्लुकोज हे गुणधर्म आहेत. 

  • यामुळे आतड्यांची हालचाल (peristalsis) वाढते. परिणामी सकाळची मलप्रवृत्ती सोपी आणि व्यवस्थित होते.
पित्त शांत होतं 
  • पोटातील जळजळ कमी होऊन, पचनही सुधारते.
  • काळ्या मनुका शीतवीर्य असल्यामुळे पित्त शांत होते.
  • पित्ताची पातळी संतुलित झाल्यास गॅस, पोट फुगणे यासारख्या समस्या कमी होतात.

Advertisement

(नक्की वाचा: Dry Cough Remedies: सिरप संपलंय? खोकलाही कमी होत नाही? तज्ज्ञांनी सांगितलेले 10 घरगुती उपाय वाचा)

मनुक्यांचे सेवन कसं करावे?
  • रात्री पाच ते सात काळे मनुके पाण्यात भिजवा.  
  • सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन करावे. 
  • यानंतर थोडेसं कोमट पाणी प्यावे. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)