Why Do You Yawn : ऑफिसमध्ये, ट्रेनमध्ये असताना किंवा घरातही एखाद्याला जांभई देताना पाहिलं की आपल्यालाही जांभई येते. थकवा, अपुऱ्या झोपेमुळे जांभई येते; असे अनेकांना वाटतं. आयुर्वेदिक डॉक्टर रूचा पै यांनी जांभई येण्यामागील कारणं सांगितली आहेत, त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
1. मेंदूचा मिरर न्यूरॉन प्रभाव
आपल्या मेंदूमध्ये मिरर न्यूरॉन (Mirror Neurons) नावाचे विशेष न्यूरॉन्स असतात. हे न्यूरॉन्स दुसऱ्याच्या कृती, भावना किंवा हालचाली आपोआप "कॉपी" करतात. म्हणजेच कोणी हसत असेल तर आपल्यालाही हसू येतं आणि कोणी जांभई देत असेल तर आपला मेंदूही तीच क्रिया कॉपी करते, याच गोष्टीमुळे जांभई संसर्गजन्य (Contagious) होते.
2. भावनिक समरसता (Empathy Connection)
संशोधनातील माहितीनुसार, जेव्हा आपले एखाद्या व्यक्तीशी भावनिक नातं असतं, जसं की आपले मित्र, कुटुंबीय. तेव्हा त्यांना जांभई देताना पाहिल्यावर आपल्यालाही लवकर जांभई लागते. हे दर्शवते की आपला मेंदू "भावनिक ताल” (emotional sync) साधत आहे.
(नक्की वाचा : Sleep Tips: गाढ झोपेसाठी कोणत्या अवयवाचा मसाज करावा? कोणते अवयव दाबल्यास झोप पटकन येते? वाचा 100% रामबाण उपाय)
3. शरीरातील ऑक्सिजन संतुलन
कधी कधी अनेकजण एकाच खोलीत असतात आणि सर्वांसाठी हवेतील ऑक्सिजन वायू कमी होत जातो, तेव्हा मेंदूला अधिक ऑक्सिजनची गरज जाणवते आणि त्यामुळे जांभई येते. दुसऱ्याला येणारी जांभई पाहून आपलं शरीरही तसंच प्रत्युत्तर देतं.
(नक्की वाचा: How To Stop Snoring: घोरण्याच्या समस्येतून सुटका मिळवायचीय? फॉलो करा 10 जबरदस्त टिप्स)
4. आयुर्वेदिक दृष्टीनेआयुर्वेदामध्ये "जुंभा" (जांभई) ही एक वातप्रधान क्रिया मानली जाते. ही क्रिया थकवा, झोपेच्या अभावामुळे किंवा मनाच्या क्लांतीमुळे होते. दुसऱ्याला पाहून आपल्यालाही जांभई येणं म्हणजे मन आणि प्राणवायू यांचा अनुकरण-भाव -म्हणजेच शरीर आणि मन "तालबद्ध" होतं.
डॉ.रुचा पै यांची पोस्ट(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world