Ghee Benefits: तुपामुळे जेवणाची चव वाढते, शिवाय आरोग्यासही असंख्य फायदे मिळतात. शरीरासाठी आवश्यक असणारे पोषणतत्त्व तुपामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी तूप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर रोबिन शर्माने आपल्या यु-ट्यूब चॅनेलवर तुपाची माहिती देणारा व्हिडीओ शेअर केलाय.
रिकाम्या पोटी तूप खाल्ल्यास काय होते?
डॉक्टर शर्मा यांनी सांगितले की, तूप खाल्ल्यास शरीरातील वात आणि पित्त दोष संतुलित होण्यास मदत मिळते. शरीरामध्ये वात दोष वाढल्यास त्वचा कोरडी होणे, हात-पाय दुखणे, गॅस होणे आणि बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. शरीरातील पित्त दोष असंतुलित झाल्यास शरीरामध्ये जळजळ होणे, झोप कमी येणे, थकवा जाणवणे, शरीराला दुर्गंध येणे या गोष्टींचा सामना करावा लागतो. योग्य प्रमाणात तूप खाल्ल्यास या समस्यांमधून सुटका मिळेल.
त्वचेसाठी फायदेशीर
तुपामुळे त्वचेला आतील बाजूनं पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. यामुळे त्वचा मऊ होते, त्वचेवर नैसर्गिक चमक येते. चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवा असल्यास सकाळी रिकाम्या पोटी तुपाचे सेवन करणं फायदेशीर ठरेल.
(नक्की वाचा: Constipation Remedies: पोट स्वच्छ करण्यासाठी सर्वात चांगलं चूर्ण कोणते? काय खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होईल दूर?)
शरीराला मिळेल ताकद
तुपामुळे शरीराला ताकद मिळेल, अधिक कष्टाचे काम करणारी मंडळी, जीममध्ये जाणारे लोकांनी आणि वजन वाढवायचे असेल तर तुपाचे सेवन करावे.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक
आयुर्वेदिक डॉक्टरांच्या माहितीनुसार, तुपामध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी पोषक असणाऱ्या गुणधर्मांचा समावेश आहे. रिकाम्या पोटी तूप खाल्ल्यास डोळ्यांचा थकवा कमी होण्यास मदत मिळेल. दीर्घकाळ लॅपटॉप किंवा फोनचा वापर करत असाल तर डाएटमध्ये तुपाचा समावेश करावा.
(नक्की वाचा: Better Sleep Tips: गाढ झोप हवीय? झोपेचा 10-5-3-2-1 नियम फॉलो करा, 5 मिनिटांत मेंदू होईल शांत)
शरीराला ऊर्जा मिळेल किती आणि कोणत्या तुपाचे सेवन करावे?- सुरुवातीस केवळ अर्धा चमचा इतकेच तुपाचे सेवन करावे.
- जास्त प्रमाणात तुपाचे सेवन करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.