जाहिरात

Constipation Home Remedy: पोट स्वच्छ होत नाही? 3 गोष्टी पाण्यात मिक्स करुन प्या, पटकन डिटॉक्स होईल शरीर

Constipation Remedy: पोट स्वच्छ करण्यासह संपूर्ण शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळेल, असा उपाय न्युट्रिशनिस्ट आणि वेलनेस कन्सल्टंट नेहा सहाय यांनी सांगितलाय.

Constipation Home Remedy: पोट स्वच्छ होत नाही? 3 गोष्टी पाण्यात मिक्स करुन प्या, पटकन डिटॉक्स होईल शरीर
"Constipation Remedy: बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी उपाय"
Canva

Constipation Remedy: बदलत्या जीवनशैलीनुसार बद्धकोष्ठता अतिशय सामान्य समस्या होत चाललीय. पूर्वी वयोवृद्ध या समस्येमुळे त्रस्त असत, पण आता तरुण मंडळी देखील पोट स्वच्छ न होण्याच्या समस्येचा सामना करत आहेत. अयोग्य जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पाणी कमी पिणे इत्यादी गोष्टी या समस्येसाठी जबाबदार ठरू शकतात. सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ न झाल्यास दिवसभर पोट जडजड वाटते, आळस आणि पोटदुखी यासारख्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. न्युट्रिशनिस्ट आणि वेलनेस कन्सल्टंट नेहा सहाय यांनी बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय शेअर केलाय, यामुळे पोट स्वच्छ होईल शिवाय संपूर्ण शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळेल.   

न्युट्रिशनिस्ट नेहा सहाय यांनी काय सांगितलं?

न्युट्रिशनिस्ट नेहा सहाय यांनी इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलंय की, बद्धकोष्ठता यासारख्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी ग्लासभर कोमट पाण्यात एक चमचा इसबगोल (Psyllium Husk), एक चमचा तूप आणि चिमूटभर सैंधव मीठ मिक्स करुन प्यावे. तीनही गोष्टी एकत्रित मिक्स करुन प्यायल्यास पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत मिळेल आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळेल. 

डिटॉक्स ड्रिंकमुळे कशी मिळेल मदत?

  • इसबगोलमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. 
  • इसबगोल पाणी शोषून घेऊन मल मऊ करण्याचे काम करते, ज्यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत मिळते. 
  • तुपामध्ये ब्युटरेट नावाचे (Butyrate) नावाचे फॅटी अ‍ॅसिड असते, जे आतड्या निरोगी आणि पचनसंस्था मजबूत ठेवण्याचे काम करते. शरीरातील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करण्यासही मदत करतात. 
  • सैंधव मिठामुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते आणि गॅस तसेच पोटातील जळजळ कमी होते.   

Weight Loss Tips: 15 दिवस दुधात उकळून खा हा पांढरा पदार्थ, त्वचेपासून ते वेटलॉसपर्यंत मिळतील असंख्य फायदे

(नक्की वाचा: Weight Loss Tips: 15 दिवस दुधात उकळून खा हा पांढरा पदार्थ, त्वचेपासून ते वेटलॉसपर्यंत मिळतील असंख्य फायदे)

डिटॉक्स ड्रिंक कधी आणि कसे प्यावे?

न्युट्रिशनिस्ट नेहा सहाय यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, झोपण्याच्या तासाभरापूर्वी हे ड्रिंक प्यावे. यामुळे वजन कमी होण्यासही मदत मिळू शकते. वजन कमी करायचे असेल तर रात्रीच्या जेवणापूर्वी जवळपास 30 मिनिटांपूर्वी हे पाणी पिऊ शकता. 

Frequent Urination Causes: रात्री वारंवार लघवीला का होते? या गोष्टी खाल्ल्याने तुमच्या मूत्राशयावर येतोय ताण

(नक्की वाचा: Frequent Urination Causes: रात्री वारंवार लघवीला का होते? या गोष्टी खाल्ल्याने तुमच्या मूत्राशयावर येतोय ताण)

ही गोष्ट देखील लक्षात ठेवा

  • इसबगोलचे सेवन करत असाल तर जास्त प्रमाण पाणी पिणे आवश्यक आहे. अन्यथा पोट जड होईल आणि ब्लॉकेज यासारख्या समस्याही निर्माण होऊ शकतात.
  • न्युट्रिशनिस्ट नेहा सहाय यांच्या माहितीनुसार, हा उपाय पूर्णतः नैसर्गिक आहे, शरीरावर याचे दुष्परिणाम होत नाहीत.  
  • नियमित स्वरुपात हा उपाय केल्यास पोट स्वच्छ होईल आणि पचनसंस्था आणि चयापचयाची गती देखील जलद होईल. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.) 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com