- डॉ. रुचा पै
Vitamin D Benefits: व्हिटॅमिन डी केवळ शरीराच्या हाडांसाठी नव्हे तर संपूर्ण शारीरिक प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सूर्यप्रकाशात कोणत्या वेळेस बसावे? डाएटमध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करावा? यासह महत्त्वाची माहिती डॉ. रुचा पै यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
व्हिटॅमिन डी संदर्भातील महत्त्वाची माहिती | What Is Vitamin D
व्हिटॅमिन D म्हणजे काय?
व्हिटॅमिन D हे एक चरबीयुक्त (fat-soluble) जीवनसत्त्व आहे, जे शरीरातील हाडांची मजबुती, स्नायूंचं आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. शरीरातील व्हिटॅमिन D कमी झालं, तर हाडांचे विकार (उदाहरणार्थ ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओमॅलेशिया) आणि थकवा, स्नायू दुखणे, प्रतिकारशक्ती कमी होणे अशा अनेक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
Vitamin Dची Physiology (शारीरिक क्रिया-विज्ञान)
1. संश्लेषण (Synthesis) सूर्यप्रकाशातून निर्मिती
- त्वचेमध्ये "7-Dehydrocholesterol" नावाचे फॅटसारखे कोलेस्टेरॉल कम्पाउंड हे नैसर्गिक घटक असतो.
- जेव्हा सकाळच्या वेळेस सूर्यप्रकाश (UV-B rays) त्वचेवर पडतो, तेव्हा या घटकाचं रूपांतर Vitamin D3 (Cholecalciferol) मध्ये होतं. म्हणजेच सूर्यप्रकाश = नैसर्गिक Vitamin D!
2. यकृतातील रूपांतरण (Liver Conversion)
त्वचेमध्ये तयार झालेले Vitamin D3 रक्ताद्वारे यकृतात (Liver) जाते. तिथे ते "25-Hydroxy Vitamin D" नावाच्या रूपात साठवलं जातं. म्हणजे शरीरातील Vitamin D ची साठवण.
3. Vitamin D मूत्रपिंडात सक्रिय होणे
यानंतर हे साठवलेलं Vitamin D मूत्रपिंडात (Kidney) जाऊन "1,25-Dihydroxy Vitamin D (Calcitriol)" मध्ये बदलतं, जे शरीरात काम करणारे सक्रिय रूप असतं.
"Vitamin D कमी का दाखवतं? - वैज्ञानिक आणि व्यावहारिक कारणांसह जाणून घ्या
1. सूर्यप्रकाश मिळतो... पण योग्य वेळी नाही
- Vitamin D तयार होण्यासाठी UV-B किरणं लागतात.
- ही किरणं सकाळी 9 ते सकाळी 11 या वेळेत सर्वाधिक सक्रिय असतात.
- जर आपण खूप लवकर म्हणजे सकाळी 7 वाजेपूर्वी किंवा संध्याकाळी चालत असू तर सूर्यप्रकाशात Vitamin D तयार होत नाही.
- योग्य वेळ आणि पुरेसा कालावधी (15-20 मिनिटे) अत्यावश्यक आहे.
2. सनस्क्रीन, कपडे आणि शेड्समुळे सूर्यकिरण त्वचेपर्यंत पोहोचत नाहीत
- आजकाल बहुतेक लोक पूर्ण बाह्यांचे कपडे, टोपी आणि सनस्क्रीन वापरतात.
- पण सनस्क्रीनमुळे UV-B किरणं अडवली जातात, त्यामुळे Vitamin D तयार होण्याचा मार्गच बंद होतो.
- फक्त चेहऱ्यावर सूर्यकिरण पडले तरी पुरेसे नसतात. हात, पाय, मान आणि पाठ यावर थेट सूर्यप्रकाश पडणं आवश्यक आहे.
3. अग्नी (पचनशक्ती) मंद असणे
- आयुर्वेद सांगतो – “अग्निः सर्वेषां शरीरिणाम् जीवनम्।”
- म्हणजे पचनशक्ती योग्य नसली तर शरीर Vitamin Dचं शोषण (absorption) करू शकत नाही.
- सतत आम, वात-पित्त असंतुलन, अन्नाच्या चुकीचे वेळा या सर्व गोष्टींमुळे सर्व शोषण कमी करतं.
4. लिव्हर आणि किडनीचं कार्य महत्त्वाचं
त्वचेत तयार झालेला D3 प्रथम यकृतात (Liver), मग मूत्रपिंडात (Kidney) जाऊन सक्रिय रूपात बदलतो. जर या दोन्ही अंगांची कार्यक्षमता कमी असेल (फॅटी लिव्हर, डिहायड्रेशन, औषधं इत्यादींमुळे) तर शरीर Vitamin D तयार करूनही वापरू शकत नाही.
5. आहारात पूरक घटकांची कमतरता
Vitamin D चे शोषण कॅल्शियम, फॉस्फरस आणि तुपातील फॅट्सवर अवलंबून असते. जर तूप, दूध, आवळा, गव्हांकुर यासारखे पदार्थ आहारात नसतील तर D मिळालं तरी शरीरात टिकत नाही.
(नक्की वाचा: Vitamin D: दुपारच्या उन्हाद्वारे Vitamin D मिळते? किती वाजता आणि किती वेळ उन्हात बसावे? AIIMSच्या डॉक्टरांनी दिली माहिती)
6. आयुर्वेदिक तत्त्वज्ञान
"सूर्य म्हणजे अग्नि, अग्नि म्हणजे जीवन"
सूर्यप्रकाश हा फक्त बाह्य तेज नाही; तो शरीरातील अंतर्गत तेज - अग्नी - जागवतो.
जेव्हा हा अग्नी मंदावतो, तेव्हा आपण कितीही सूर्य पाहिला तरी Vitamin D शोषण होत नाही.
व्हिटॅमिन D का आवश्यक आहे?
- कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे शोषण वाढवते.
- हाडे आणि दात मजबूत होण्यास मदत मिळते.
- शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
- मूड, झोप आणि हार्मोनल बॅलन्स राखते.
- थकवा, वेदना आणि त्वचेवरील काही विकार कमी करण्यास मदत मिळते.
व्हिटॅमिन Dच्या कमतरतेची लक्षणं | Vitamin D Deficiency Symptoms
- सतत थकवा जाणवणे
- हाडं किंवा सांध्यांत दुखणे
- केस गळणे
- मूड स्विंग्स / नैराश्य
- प्रतिकारशक्ती कमी होणे
- वारंवार सर्दी-खोकला
(नक्की वाचा: Anjeer Benefits: रोज 1 अंजीर खाल्ले तर काय होईल? सलग 15 दिवस अंजीर खाण्याचे फायदे, योग्य पद्धत आणि वेळ जाणून घ्या)
Vitamin D चे नैसर्गिक स्रोत (Vitamin D Natural Sources)
- सूर्यप्रकाश (Sunlight) हा सर्वात मोठा आणि नैसर्गिक स्रोत आहे.
- सकाळी 7 ते सकाळी 9 वाजेपर्यंत 15-20 मिनिटं सूर्यप्रकाशात राहिल्यास शरीर स्वतः Vitamin D तयार करतं.
- हात, चेहरा, मान, आणि पायांवर थेट सूर्यकिरण पोहोचले पाहिजेत.
- जनावरांपासून मिळणारे (Non-veg / dairy) व्हिटॅमिन डी
- तूप आणि लोणी
- दूध आणि दही (fortified milk)
- अंडी (पिवळा भाग)
- फिश (सॅल्मन, ट्युना, सार्डिन)
- सूर्यप्रकाशात वाळवलेले मशरूम
- गव्हांकुर सत्व (Wheat Germ Extract)
- आवळा रस
- तूप / लोणी
- फोर्टिफाइड सीरिअल्स / दूध
- हे घटक शरीराला D मिळवून देतात किंवा त्याचं शोषण सुधारतात.
- नैसर्गिक Vitamin D2 चा सर्वोत्तम शाकाहारी स्रोत.
- सकाळच्या सूर्यप्रकाशात 30-40 मिनिटं वाळवलेले मशरूम रोजच्या आहारात घ्या.
- सूप, भाजीत किंवा स्टिर-फ्रायमध्ये वापरा.
A post shared by Dr Rucha Mehendale Pai | Ayurvedic Doctor (@dr.ruchamehendalepai)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )