जाहिरात

Anjeer Benefits: रोज 1 अंजीर खाल्ले तर काय होईल? 15 दिवस अंजीर खाण्याचे फायदे, योग्य पद्धत आणि वेळ जाणून घ्या

Anjeer Benefits: डाएटमध्ये अंजीरचा समावेश केल्यास आरोग्यास असंख्य फायदे मिळतील.

Anjeer Benefits: रोज 1 अंजीर खाल्ले तर काय होईल? 15 दिवस अंजीर खाण्याचे फायदे, योग्य पद्धत आणि वेळ जाणून घ्या
"Anjeer Benefits: अंजीर खाण्याचे फायदे"
Canva

Anjeer Benefits: आपल्या आसपास असणारे कोणी-न्-कोणी एखाद्या तरी शारीरिक समस्येने त्रासलेले असतात. आताच्या चुकीच्या लाइफस्टाइलमुळे पचनप्रक्रिया, संधिवात, कोलेस्टेरॉल, हृदयविकार किंवा त्वचेशी संबंधित समस्यांमुळे लोक हैराण झाले आहेत. या समस्या सामान्य असल्या तरीही यावर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करणं गरजेचं आहे. यापैकीच एक पर्याय म्हणजे अंजीर. अंजीरचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास पचनप्रक्रिया, त्वचा, हृदय आणि सांध्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. सलग 15 दिवस अंजीर खाल्ल्यास कोणकोणते फायदे मिळतील, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

अंजीरमधील पोषणतत्त्व (Anjeer Nutritional Value)

अंजीर फळही तुम्ही खाऊ शकता आणि सुकवलेलंही अंजीर खाणे फायदेशीर ठरेल. अंजीरमध्ये व्हिटॅमिन  A, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन K, कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फायबर यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. या पोषकघटकांमुळे शरीर आतील बाजूने निरोगी राहते आणि शरीराला ऊर्जा देखील मिळते.  

अंजीर खाण्याचे फायदे (Anjeer Health Benefits)
पचनप्रक्रिया

आयुर्वेदानुसार अंजीर हे पचनप्रक्रियेसाठी टॉनिक मानले जाते. यातील सॉल्युबल फायबरमुळे शौचाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. विशेषतः बद्धकोष्ठतेच्या त्रासातून सुटका मिळेल.  

बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय (Constipation Remedy)

रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर दुधामध्ये दोन ते तीन सुकवलेले अंजीर उकळा. दूध थंड किंवा गरमही पिऊ शकता आणि अंजीर चावून खा. यामुळे सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ होईल. यकृताचे आरोग्यही निरोगी होईल आणि भूकही लागेल. 

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर 

अंजीर खाल्ल्यास रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते, कारण यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक आहे. याद्वारे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (LDL) घटण्यास आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची (HDL) पातळी वाढण्यास मदत मिळते. रीसर्चनुसार, अंजीरचे सेवन केल्यास शरीरातील ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी होण्यास मदत मिळते, ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होता. म्हणूनच यास नॅचरल कार्डिओ प्रोटेक्टर म्हटले जाऊ शकते.

त्वचेवर येईल नैसर्गिक ग्लो

अंजीर खाणे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. कोरडी त्वचा, अ‍ॅलर्जी, एक्झिमा किंवा पिग्मेंटेशनची समस्या असल्यास अंजीर खाणे लाभदायक मानले जाते. यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेतील टॉक्सिन्स कमी होतील, ज्यामुळे सुरकुत्यांची समस्या कमी होईल, त्वचेचा रंग उजळेल आणि त्वचा तरुणही दिसेल.  

Cardamom Benefits: 15 दिवस 2 वेलची खाल्ल्या तर काय होईल? Doctor Hansa यांनी सांगितल्या 4 मोठ्या गोष्टी

(नक्की वाचा: Cardamom Benefits: 15 दिवस 2 वेलची खाल्ल्या तर काय होईल? Doctor Hansa यांनी सांगितल्या 4 मोठ्या गोष्टी)

सांधेदुखी आणि संधिवाताच्या त्रासातून मिळेल आराम

अंजीरमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत, यामुळे सांधेदुखी तसेच सांध्यांवरील सूज कमी होईल. हाडे मजबूत होतील, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होईल आणि स्नायूंची ताकद वाढेल. संधिवात किंवा सांधेदुखीची समस्या असणाऱ्यांनी नियमित अंजीरचे सेवन करावे. 

Why You Should Stop Eating Rice: 30 दिवस भात खाल्ला नाही, तर काय होईल?

(नक्की वाचा: Why You Should Stop Eating Rice: 30 दिवस भात खाल्ला नाही, तर काय होईल?)

अंजीर खाण्याचे योग्य पद्धत

  • दिवसभरात दोन ते तीन सुकवलेले अंजीर खाणे पुरेसे आहे. 
  • वजन कमी करायचे असेल तर जास्त प्रमाणात अंजीर खाणे टाळावे. 
  • बद्धकोष्ठतेच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी रात्री दुधात अंजीर उकळून ते प्यावे.  
  • उन्हाळ्यात अर्धा ग्लास पाण्यात अंजीर भिजत ठेवा आणि त्यानंतर ते पाणी प्यावे.   

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com