Winter Health Tips: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जास्त थंडी लागते? जाणून घ्या

Winter Health Tips: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जास्त थंडी लागते आणि यानुसार डाएटमध्ये कोणते बदल करावे?

जाहिरात
Read Time: 2 mins
"Jast Thandi Kontya Karnamule Lagte: थंडी लागण्यामागील कारणं"
Canva

Winter Health Tips: काही लोकांना प्रचंड प्रमाणात थंडी लागते, वातावरणात थोडासा जरी गारवा असेल तरी या मंडळींना हुडहुडी भरते. तुमच्यासोबतही असेच घडत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. कारण शरीरामधील व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे या समस्या निर्माण होऊ शकतात. कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे थंडी वाजते आणि यानुसार डाएटमध्ये कोणकोणत्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा, याबाबत माहिती जाणून घेऊया...

जास्त थंडी लागण्यामागील कारण | Health News What Vitamin Deficiency Can Make You Feel Extra Cold
 
व्हिटॅमिन डी 

'व्हिटॅमिन डी' सनशाइन व्हिटॅमिन या नावानेही ओळखले जाते. केवळ हाडे मजबूत होण्यासह नाही तर शरीराची ऊर्जा आणि हार्मोन देखील संतुलित ठेवण्यास हे व्हिटॅमिन मदत करतं. शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण झाल्यास थकवा, मूड बदलणे आणि जास्त थंडी लागणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्हिटॅमिन डीची कमतरता भरुन काढण्यासाठी अंड्याचे बलक, दूध, मशरूम आणि फोर्डिफाइड फुड यासारख्या पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करावा. याव्यतिरिक्त काही वेळ कोवळ्या उन्हात बसणंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

(नक्की वाचा: Better Sleep Tips: दोन मिनिटांत येईल अगदी गाढ आणि शांत झोप, फॉलो करा 3 मिलिटरी टिप्स)

व्हिटॅमिन बी12 

व्हिटॅमिन बी12 लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतात, यानुसार शरीरामध्ये व्हिटॅमिन बी12 ची कमतरता निर्माण झाल्यास अ‍ॅनिमिया या आजाराची समस्या उद्भवू शकते. ज्यामुळे संपूर्ण शरीरास ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास अडथळे निर्माण होतात आणि सारखी थंडी लागते. यामुळे कमकुवतपणा जाणवतो आणि हात-पाय देखील थंड पडतात. शरीरातील या व्हिटॅमिनची कमतरता दूर करण्यासाठी डाएटमध्ये दूध, अंडी, मासे, दही आणि सोया प्रोडक्ट्सचा समावेश करणे लाभदायक ठरेल.

Advertisement

(नक्की वाचा: Stomach Cleansing Tips: सकाळी उठल्यानंतर पोटातील घाण 2 मिनिटांत पटकन बाहेर पडेल, करा हे 8 उपाय)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Topics mentioned in this article