Stomach Cleansing Tips: सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ होणं अतिशय आवश्यक आहे. अन्यथा दिवसभर अस्वस्थपणा, आळश जाणवतो. बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे अन्य आजारांनाही आयते निमंत्रण मिळू शकते. सकाळी उठल्यानंतर केवळ दोन मिनिटांत पोट कसे स्वच्छ होईल? यासाठी लोक असंख्य उपाय करतात. आतड्यांमधील घाण व्यवस्थित स्वच्छ होण्यासाठी तुम्हाला तुमच्या लाइफस्टाइलमध्ये काही बदल करणंही गरजेचं आहे. साधेसोपे आठ उपाय फॉलो केल्यास पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळू शकते.
पोट पटकन स्वच्छ होण्यासाठी सोपे उपाय | Stomach Cleansing Tips
1. कोमट पाण्याची जादू
सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यावे, हा सर्वात साधा आणि सोपा उपाय आहे. पाणी प्यायल्यानंतर हलक्या स्वरुपातील स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा किंवा फेऱ्या मारा. कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रसही मिक्स करू शकता.
2. शौचास बसण्याची योग्य पद्धत
शौचालयास बसण्याची पद्धतही पोट स्वच्छ होण्यासाठी महत्त्वाची असते. आपल्या आतड्यांच्या रचनेनुसार बसून शौच करणं फायद्याचे ठरू शकते. तुमच्या घरामध्ये वेस्टर्न पद्धतीचे टॉयलेट असेल तर टेबल घेऊन त्यावर पाय ठेवा. या स्थितीमुळे पोटावर ताण येईल आणि आतड्यांची हालचाल होईल, पोट स्वच्छ होण्यास मदत मिळेल.
3. पोटाचा हलक्या हाताने मसाज करणे
पोट पटकन स्वच्छ होण्यासाठी हलक्या हाताने पोटाचा मसाज करावा. नाभीवर तेल सोडावे आणि गोलाकार दिशेने मसाज करावा. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करावा.
(नक्की वाचा: Flax Seeds Benefits: 15 दिवस भाजलेल्या अळशीच्या बिया खाल्ल्यास होईल कमाल; फायदे, योग्य वेळ आणि सेवनाची पद्धत वाचा)
4. एक चमचा तूप
तुपामुळे आतड्यांमध्ये चिकटलेली घाण बाहेर पडण्यास मदत मिळते. रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर कोमट दुधामध्ये एक चमचा तूप मिक्स करा, यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यातही तूप मिक्स करून पिऊ शकता.
5. फायबरयुक्त आहारडाएटमध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. चिया सीड्स, इसबगोल पाण्यामध्ये भिजत ठेवून प्यावे. यामुळे आतड्यांची स्वच्छता होण्यास मदत मिळेल. पपई, सफरचंद आणि हिरव्या भाज्यांचाही आहारात समावेश करावा.
बद्धकोष्ठतेवर काय उपाय करावे?6. व्यायाम करा
नियमित स्वरुपात व्यायाम करणं आवश्यक आहे, रोज केवळ 15-20 मिनिटे जॉगिंग केल्यास आतड्यांची हालचाल होण्यास मदत मिळले.
7. खूप पाणी प्यावेबद्धकोष्ठतेमागील सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होणे. ज्यामुळे शरीरातील घाण बाहेर फेकली जाण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. दिवसभरात आठ ते 10 ग्लास पाणी प्यावे.
(नक्की वाचा: Curry Leaves Benefits: कढीपत्त्याचे पाणी किती दिवस प्यायल्यास केस लांबसडक होतील? कढीपत्ता कधी खाऊ नये? 17 FAQs)
8. तणाव कमी करामानसिक तणावामुळे पोटाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात, यामुळे पचनप्रक्रियेची गती मंदावते. मानसिक ताण कमी करण्यासाठी योग, ध्यानधारणा करावी.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

