Nutrients Deficiency: कित्येकदा शरीरावर तुम्हाला काळ्या किंवा निळ्या रंगाचे चट्टे दिसतात. बोलीभाषेमध्ये लोक यास त्वचा काळीनिळी पडणे असे म्हणतात. साधारणतः लहान-मोठी दुखापत झाल्यानंतर त्वचेवर असे डाग दिसतात. पण अनेकदा कोणतीही दुखापत न होताच शरीरावर काळ्या-निळ्या रंगाचे डाग येतात. तुम्ही देखील या समस्येचा सामना करत आहात का? तर याकडे दुर्लक्ष करू नका. शरीरातील आवश्यक पोषणतत्त्वांच्या कमतरतेबाबत शरीर तुम्हाला संकेत देत आहे. जाणून घेऊया याबाबत माहिती...
त्वचेवर येणाऱ्या काळ्यानिळ्या डागांबाबत तज्ज्ञांचे काय म्हणणंय?
न्युट्रिशनिस्ट लीमा महाजन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केलाय. याद्वारे महाजन यांनी सांगितलंय की, त्वचेवर वारंवार येणारे काळेनिळे डाग आणि त्वचेवरील ही जखम बरी व्हायला वेळ लागणे ही लक्षणे शरीरातील आवश्यक व्हिटॅमिन्स तसेच खनिजांच्या कमतरतेशी संबंधित असू शकतात.
व्हिटॅमिन सीची कमतरता | Vitamin C Deficiency
न्युट्रिशनिस्टने सांगितलेल्या माहितीनुसार, शरीरातील व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे त्वचा वारंवार निळी पडू शकते. व्हिटॅमिन सी शरीरामध्ये कोलेजन तयार करण्याचे काम करते, जे त्वचा आणि रक्तपेशी मजबूत करण्याचे काम करतात. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे छोट्यातील छोट्या दुखापतीमुळेही त्वचेवर निळे डाग तयार होऊ शकतात. व्हिटॅमिन Cची कमतरता भरुन काढण्यासाठी डाएटमध्ये संत्रे, पेरू, आवळा, कीवी इत्यादी फळांसह भाज्यांचाही समावेश करावा.
(नक्की वाचा: Vitamin B12 Deficiency Cause: शरीरामध्ये Vitamin B12ची कमतरता होण्यामागील खरं कारण काय? या 4 लोकांना सर्वाधिक धोका)
व्हिटॅमिन K ची कमतरता | Vitamin K Deficiency
व्हिटॅमिन K रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झाल्याल छोट्या छोट्या जखमांमधून रक्तस्त्राव होतो आणि शरीरावर वारंवार जखमा दिसू लागतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी पालक, केल, ब्रोकोली, कोबी, अंड्याचे बलक खाऊ शकता.
झिंकची कमतरता | Zinc Deficiency
झिंकच्या कमतरतेमुळेही त्वचेवर जखमा होऊ शकतात. त्वचेवरील जखम बरी होण्यासाठी आणि शरीराच्या रोगप्रतिकारकशक्तीसाठी झिंक अतिशय आवश्यक असते. झिंकची कमतरता भरुन काढण्यासाठी सुकामेवा, डाळी, मासे, चिकन यासारख्या गोष्टींचा डाएटमध्ये समावेश करावा.
या गोष्टीही ठेवा लक्षात
काही दिवसांच्या फरकाने त्वचेवर निळे-काळे डाग पडत असतील किंवा शरीरावर जास्त प्रमाणात अशा जखमा दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांना संपर्क साधावा. कधी कधी ही लक्षणे गंभीर समस्यांचेही संकेत असू शकतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )