Flaxseeds Benefits: अळशीच्या बिया आरोग्यासाठी सुपरफूड मानल्या जातात. या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड, फायबर, प्रोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. यातील पोषणतत्त्वांमुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. शिवाय हृदय, त्वचा आणि केसांचे आरोग्यही निरोगी राहते. पण अळशीच्या बियांचे चुकीच्या पद्धतीने तसेच चुकीच्या वेळेस सेवन करणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. ही समस्या टाळण्यासाठी डाएटमध्ये अळशीच्या बियांचा समावेश कसा करावा, याबाबत न्युट्रिशनिस्टने दिलेली माहिती जाणून घेऊया...
अळशीच्या बियांचे सेवन करण्याची योग्य वेळ
प्रसिद्ध न्युट्रिशनिस्ट दीपशिखा जैनने इन्स्ट्राग्राम हँडलवर अळशीच्या बियांची माहिती देणारा व्हिडीओ शेअर केलाय. अळशीच्या बियांचे योग्य वेळेस आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यासच फायदे मिळतील, असेही त्यांनी सांगितलंय.
सकाळी रिकाम्या पोटी अळशीचे सेवन करा
दीपशिखा जैन यांनी सांगितले की, अळशीच्या बियांचे सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यासह सेवन करावे, याद्वारे शरीराला हेल्दी फॅट्सचा पुरवठा होईल. अळशीतील ओमेगा 3 फॅटी अॅसिडमुळे पचनप्रक्रिया सुधारते, रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल आणि पोटाचे आरोग्यही सुधारेल.
वेटलॉससाठी अळशीच्या बिया कोणत्या वेळेस खाव्या?
तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जेवणाच्या 15-20 मिनिटांपूर्वी एक चमचा अळशीच्या बिया खाण्याचा सल्ला न्युट्रिशनिस्टने दिलाय. यामध्ये फायबरचे प्रमाण खूप असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते. शिवाय रक्तशर्करेची पातळीही स्थिर राहील आणि शरीरातील ऊर्जाही टिकून राहील.
बद्धकोष्ठता
दही, स्मूदी आणि फळांसह अळशीच्या बियांचे सेवन करणं फायदेशीर ठरू शकते. याद्वारे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळेल आणि पचनप्रक्रियेच्या समस्यांपासून सुटका होईल.
(नक्की वाचा: Stomach Cleansing Tips: सकाळी उठल्यानंतर पोटातील घाण 2 मिनिटांत पटकन बाहेर पडेल, करा हे 8 उपाय)
दिवसभरात किती प्रमाणात अळशीच्या बियांचे सेवन करावे?दिवसभरात केवळ एक ते दोन चमचे अळशीच्या बियांचे सेवन करणं पुरेसे ठरेल. जास्त प्रमाणात बिया खाल्ल्यास पोट फुगणे, गॅस यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेस अळशीचे सेवन करणं फायदेशीर ठरू शकते.
(नक्की वाचा: Alum Benefits: 10 रुपयांत मिळणारा हा पांढरा दगड आहे प्रचंड उपयुक्त, 5 समस्यांपासून मिळेल सुटका)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)