तीळ, भोपळ्याच्या बिया, अळशी... कोणत्या बिया कोणत्या वेळेस खाव्या? ही वेळ आरोग्यासाठी ठरेल सर्वाधिक फायदेशीर

How To Eat Seeds For Maximum Benefits: तीळ, भोपळ्याच्या बिया, अळशीच्या बियांचा डाएटमध्ये समावेश करण्याचा सध्या ट्रेंड सुरू आहे. पण या बिया कोणत्या वेळेस खाल्ल्यास शरीराला सर्वात जास्त फायदे मिळतील? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Health News: कोणत्या वेळेस कोणत्या बियांचे सेवन करावे?"
Canva

Right Time To Eat Seeds: बदलत्या लाइफस्टाइलनुसार बहुतांश लोक आता आरोग्याची काळजी घेऊ लागले आहेत. फिट राहण्यासाठी लोक हेल्दी डाएट प्लान फॉलो करू लागले आहेत. वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसह बियांचाही लोक आहारात समावेश करत आहेत. तीळ, भोपळ्याच्या बिया, अळशीच्या बिया, चिया सीड्स यासारख्या बिया खाणं सध्या ट्रेंड बनलंय. पण या बिया योग्य वेळेस खाल्ल्यास आरोग्यास अधिक फायदे मिळतील, असे तज्ज्ञांचे म्हणणंय. न्युट्रिशनिस्ट हीरव मेहताने इन्स्टाग्राम हँडलवर व्हिडीओ शेअर करत या बियांच्या सेवनाचे फायदे सांगितले आहेत.  

सकाळच्या वेळेस कोणत्या बियांचे सेवन करावे?

अळशीच्या बिया (Flax Seeds) 

न्युट्रिशनिस्ट दिलेल्या माहितीनुसार, अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आणि फायबरचे प्रमाण जास्त आहे. यामुळे शरीराची चयापचयाची गती जलद होते आणि हार्मोन्सची पातळीही संतुलित राहण्यास मदत मिळते. पचनपक्रिया कमकुवत असल्यास अळशीच्या बिया खाणे फायदेशीर ठरू शकते. 

चिया सीड्स (Chia Seeds)

चिया सीड्स सकाळी रिकाम्या पोटी खाण्याचा सल्ला न्युट्रिशनिस्टने दिलाय. चिया सीड्स पाण्यात भिजवून खा, यामुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहील. या बियांचा तुम्ही स्मूदीमध्येही समावेश करू शकता.  

दुपारच्या वेळेस कोणत्या बियांचे सेवन करावे?

भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds)

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंकचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. ऑफिसमध्ये असताना छोटीशी भूक लागल्यास भोपळ्याच्या बिया खाणे फायदेशीर ठरेल. 

Advertisement

सूर्यफुलाच्या बिया (Sunflower Seeds) 

सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्सचा समावेश आहे, ज्यामुळे शरीरावरील सूज कमी होण्यास मदत मिळेल. पण अतिशय मर्यादित स्वरुपात या बियांचे सेवन करावं.

संध्याकाळी कोणत्या बियांचे सेवन करणं ठरेल फायदेशीर  

कलिंगडच्या बिया (Watermelon Seeds)

कलिंगडच्या बियांमध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि थकवा कमीह होतो. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी या बियांचे सेवन करू शकता. 

Advertisement

तीळ (Sesame Seeds)

(नक्की वाचा: Frequent Urination In Winter: हिवाळ्यात वारंवार लघवी का होते? ही पावडर खा, समस्या होईल दूर आणि मिळेल गाढ झोप)

Advertisement
रात्री झोपण्यापूर्वी कोणत्या बियांचे सेवन करावे?खसखस (Poppy Seeds)

खसखसमध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण असते, ज्यामुळे शरीराला शांतता मिळते. रात्री झोपण्यापूर्वी खसखल खाल्ल्यास चांगली झोप येईल आणि मेंदूला आराम मिळेल. 

(नक्की वाचा: Feeling Sleepy After Meals: जेवल्यानंतर झोप का येते? सुस्तपणा दूर करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले उपाय)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Topics mentioned in this article