जाहिरात

Frequent Urination In Winter: हिवाळ्यात वारंवार लघवी का होते? ही पावडर खा, समस्या होईल दूर आणि मिळेल गाढ झोप

Frequent Urination During Winter: हिवाळ्यामध्ये वारंवार लघवीला होण्याच्या समस्येमुळे बहुतांश लोक त्रस्त असतात. आयुर्वेदिक तज्ज्ञ नित्यानंदम श्री यांनी वारंवार होणारी लघवीची समस्या रोखण्यासाठी रामबाण उपाय सांगितलाय.

Frequent Urination In Winter: हिवाळ्यात वारंवार लघवी का होते? ही पावडर खा, समस्या होईल दूर आणि मिळेल गाढ झोप
"Frequent Urination During Winter: हिवाळ्यात वारंवार लघवीला का होते?"
Canva

Winter Health Tips: हिवाळा ऋतू बहुतांश लोकांना आवडतो, पण या दिवसांत आरोग्याशी संबंधित काही समस्यंचा सामना करावा लागतो. यापैकीच एक सामान्य समस्या म्हणजे वारंवार लघवी होणे, विशेषतः रात्रीच्या वेळेस. वारंवार उठावे लागत असल्याने झोप देखील मोडते, यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो. थंडीच्या दिवसांत लघवीच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी आयुर्वेदिक विशेषतज्ज्ञ नित्यानंदम श्री यांनी सांगितलेला उपाय जाणून घेऊया... 

हिवाळ्यात वारंवार लघवीला का होते? 

हिवाळ्याच्या दिवसांत शरीर स्वतःला उष्ण ठेवण्यासाठी त्वचेच्या भागामध्ये रक्तप्रवाह कमी करते. यामुळे शरीराचे तापमान टिकून राहते आणि मूत्रपिंडांच्या भागात रक्तप्रवाह तुलनेने वाढतो. परिणामी वारंवार लघवी होण्याची समस्या निर्माण होते. शिवाय थंड वातावरणात शरीराला घाम देखील येत नाही, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी लघवीवाटे बाहेर फेकले जाते. 

वारंवार होणारी लघवी कशी थांबवावी?

आयुर्वेदिक तज्ज्ञ नित्यानंदम श्री यांनी यू-ट्युब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वारंवार होणारी लघवीची समस्या रोखण्यासाठी रामबाण उपाय सांगितलाय. अश्वगंधा पावडरचे सेवन केल्यास शरीराला उष्णता आणि ताकद दोन्ही गोष्टी मिळतील.

Jaggery Chana Benefits In Winter: हिवाळ्यात गूळ आणि चणे खाल्ल्यास काय होते? डॉक्टरांनी सांगितले 5 फायदे

(नक्की वाचा: Jaggery Chana Benefits In Winter: हिवाळ्यात गूळ आणि चणे खाल्ल्यास काय होते? डॉक्टरांनी सांगितले 5 फायदे)

अश्वंगधा पावडरचे कसे करावे सेवन?

रात्री जेवण केल्यानंतर दीड ते दोन तासांनंतर अर्धा चमचा अश्वगंधा पावडर कोमट दुधामध्ये मिक्स करा आणि प्या. 
नित्यानंदम श्री यांच्या माहितीनुसार, हा उपाय केल्यास रात्रीच्या वेळेस वारंवार होणारी लघवीची समस्या कमी होईल. हात पाय थंड होण्याची समस्या, कमकुवतपणा आणि लो बीपीची समस्याही कमी होईल. 

Sleeping On Stomach: पोटावर झोपणं आरोग्यासाठी योग्य ठरेल का? पोटाची चरबी पटकन कमी होईल का?

(नक्की वाचा: Sleeping On Stomach: पोटावर झोपणं आरोग्यासाठी योग्य ठरेल का? पोटाची चरबी पटकन कमी होईल का?)

या गोष्टींचीही काळजी घ्यावी
  • रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणे टाळावे.  
  • शरीरामध्ये उष्णता टिकवून ठेवण्यासाठी संध्याकाळी आल्याचा चहा, सूप किंवा गरम पाणी पिऊ शकता.  
  • पायांना तेलाने मसाज करावा, यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारेल.  
  • तणाव कमी करावा, कारण मानसिक तणावामुळे वारंवार लघवीची समस्या निर्माण होऊ शकते.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com