Excessive sweating Causes: थोडीशी हालचाल केली तरीही घामाघुम होता? शरीरातील या कमतरतेमुळे येतो जास्त घाम

Excessive sweating Causes: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे शरीराला जास्त घाम येतो? या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी जाणून घ्या उपाय..

जाहिरात
Read Time: 2 mins
"Excessive sweating Causes: जास्त घाम येण्यामागील कारणे"
Canva

Excessive sweating Causes: शरीराला घाम येणे ही सामान्य बाब आहे. पण काही लोकांनी शरीराची थोडीशी हालचाल केली तरीही ते घामघुम होतात. शरीरातील पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे किंवा आरोग्याच्या एखाद्या समस्येमुळेही जास्त घाम येऊ शकतो. काहीजण या समस्येकडे दुर्लक्ष करतात, पण यामुळे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात घाम येणे हे जीवनसत्त्व किंवा खनिजांची कमतरता असू शकते. कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरेमुळे शरीराला जास्त घाम येतो, जाणून घेऊया सविस्तर माहिती... 

तुम्हाला देखील जास्त प्रमाणात घाम येतो का? Excessive sweating Causes
 
व्हिटॅमिन डी  | Vitamin D

शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात घाम येणे हे 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेचे संकेत असू शकतात. मजबूत हाडे, शरीराची रोगप्रतिकारकशक्ती, हार्मोन्सच्या संतुलित पातळीसाठी 'व्हिटॅमिन डी' अतिशय आवश्यक आहे. शरीरामध्ये 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता निर्माण झाल्यास डोके आणि कपाळावर जास्त घाम येऊ शकतो. 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेमुळे थकवा येणे, कमकुवतपणा जाणवणे, हाडे आणि सांध्यांचे दुखणे, चिडचिड होणे, झोप कमी येणे आणि रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

(नक्की वाचा: Amla Benefits: रोज 1 आवळा खाल्ल्यास कोणत्या आजारांपासून मुक्तता मिळेल? आवळा कोणी खाऊ नये? 13 FAQs)

व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स | Vitamin B Complex 

व्हिटॅमिन B1, B2, B3, B5, B6 आणि B12 हे शरीराचे चयापचय आणि मज्जासंस्थेचे कार्य नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे शरीराच्या ऊर्जेवर दुष्परिणाम होऊ शकतात, परिणामी शरीरामध्ये उष्णता वाढते आणि जास्त प्रमाणात घाम येऊ शकतो. जीवनसत्त्व बीच्या कमतरतेमुळे हात-पायांमध्ये मुंग्या येणे, थकवा-अशक्तपणा जाणवणे, केस गळणे, स्नायूदुखी आणि झोपेशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात.

Advertisement

(नक्की वाचा:High Uric Acid: हाय युरिक अ‍ॅसिड समस्येमुळे त्रस्त आहात? हे हिरवेगार पान ठरेल वरदान, उपचाराची योग्य पद्धत वाचा)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)