High Uric Acid: धकाधकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे लोकांमध्ये हाय युरिक अॅसिडची समस्या वाढत असल्याचं दिसतंय. प्युरीन नावाच्या कम्पाउंडमुळे शरीरामध्ये युरिक अॅसिड तयार होते आणि लघवीवाटे ते बाहेर फेकले जाते. पण किडनीच्या कार्यप्रणालीमध्ये अडथळे निर्माण झाल्यास शरीरामध्ये युरिक अॅसिडची (High Uric Acid) पातळी वाढू लागते आणि ते रक्तामध्ये जमा होऊ लागते. यामुळे संधिवात, सांधेदुखी, सांधे सुजणे आणि मूतखडे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यावर उपाय म्हणून आयुर्वेदिक तसेच नैसर्गिक औषधोपचार करणं प्रभावी ठरू शकते. यापैकीच एक उपाय म्हणजे विड्याचे पान, यातील औषधी गुणधर्मांमुळे रक्त शुद्ध होण्यासह शरीरावरील सूज कमी होण्यास मदत मिळू शकते.
युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी विड्याच्या पानांचे फायदे (Benefits of Betel Leaves to Reduce Uric Acid)
- रक्तशुद्धी : विड्याच्या पानामुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर फेकले जातात, ज्यामुळे युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते.
- सांध्यावरील सूज आणि वेदना : विड्याच्या पानातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे सांध्यावरील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत मिळेल.
- पचनप्रक्रिया : अन्नाचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते, ज्यामुळे शरीरामध्ये विषारी घटक जमा होत नाही.
- किडनीची कार्यप्रणाली सुधारते , ज्यामुळे शरीरातील युरिक अॅसिड शरीराबाहेर फेकले जाण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होत नाहीत.
विड्याच्या पानाचे कसे करावे सेवन? (How To Consume Betal Leaf)
विड्याच्या पानांचे योग्य आणि मर्यादित स्वरुपात सेवन करावे. जाणून घेऊया पान खाण्याच्या तीन पद्धती ...
पद्धत 1 : रिकाम्या पोटी पान खाणे
- रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पानाचे सेवन करावे.
- पान स्वच्छ धुऊन घ्या आणि सुपारी-चुन्याचा वापर न करता पानाचे सेवन करा.
- यानंतर कोमट पाणी प्यावे.
पद्धत 2: पानांचा काढा
- दोन ते तीन पानांचे छोटे-छोटे तुकडे करा.
- कपभर पाण्यात पाच ते सात मिनिटांसाठी पानं उकळा.
- काढा गाळून प्यावा. सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी काढा पिऊ शकता.
पद्धत 3: पानाची पेस्ट
- मिक्सरच्या भांड्यामध्ये पानं वाटून त्याची पेस्ट तयार करा.
- पेस्टमध्ये मध मिक्स करू शकता.
- या उपाय केल्यास सांधेदुखी आणि वेदनेपासून सुटका मिळू शकते.
(नक्की वाचा: Uric Acid : शरीरात युरिक अॅसिड कधीच वाढणार नाही, फक्त सकाळी रिकाम्या पोटी 1 कप प्या हे ड्रिंक)
कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?- विड्याचे पान ताज असावे. सुकलेले पान खाल्ल्यास कोणतेही फायदे मिळणार नाहीत.
- सुपारी, चुना, तंबाखूसोबत पान खाऊ नये; यामुळे शरीराचे अधिक नुकसान होऊ शकते.
- गर्भवती महिलांनी विड्याचे पान खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
