Alcohol drinking: रात्रीच्याच वेळी अनेक लोक दारू का पितात? 99 टक्के लोकांना माहितच नाही, चक्रावणारं कारण

भारतात मद्यप्राशन हा विषय वैयक्तिक आवडीपेक्षा सामाजिक संकेतांशी जास्त जोडलेला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • भारतात मद्यपानाला सामाजिक नकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे लोक रात्री दारू पिण्याला प्राधान्य देतात
  • दिवसा दारू पिणाऱ्यांकडे लोकांचा विरोधात्मक दृष्टिकोन असतो त्यामुळे मद्यप्राशनासाठी रात्रीची वेळ निवडली जाते
  • रात्री कामानंतर मन आणि शरीर थकल्यामुळे लोक दारू पिण्याला आराम आणि रिलॅक्सेशनचा पर्याय मानतात
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

दारू पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण या मद्य प्रेमींची एक सवय मात्र सारखी असते. ती म्हणजे यातील बहुतांश मद्यपी हे संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी दारू पिणे पसंत करतात. त्या मागे ही एक चक्रावून टाकणारं कारण आहे. विशेष म्हणजे याबाबत 99 टक्के लोकांना माहितीच नाही. तसं पाहीलं तरही सामान्य गोष्ट वाटते. पण तसं नाही. रात्रीच्या वेळी दारू पिण्या मागे ही एक कारण आहे. त्यामुळेच बहुतांश लोक हे रात्रीच दारू पिताना आपल्याला दिसतात. तेच कारण आपण जाणून घेणार आहेत. मद्यप्राशन ही वैयक्तिक निवड असली तरी, भारतात त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही सामाजिक चौकटीत अडकलेला आहे. रात्रीच्या वेळी बार आणि मद्यविक्रीच्या दुकानांवर होणारी गर्दी नेमकी कोणत्या मानसिकतेतून येते, याचा वेध घेणे रंजक ठरणार आहे.

भारतीय संस्कृतीत मद्यपानाला प्रतिष्ठा मानले जात नाही. उलट, उघडपणे मद्यपान करणाऱ्या व्यक्तीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन नकारात्मक असतो. ही सामाजिक प्रतिमा जपण्यासाठी अनेकजण 'रात्रीच्या अंधाराचा' आधार घेतात. लोकानुनय टाळण्यासाठी आणि आपली ओळख लपवून व्यसन पूर्ण करण्यासाठी रात्रीची वेळ सोयीची ठरते. दिवसा उजेडी जर कुणी दारू पित असेल तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. त्याबाबत उलट सुलट चर्चा केली  जाते. त्यामुळे अनेक जण हे रात्री किंवा संध्याकाळीच दारू पिण्याचे नियोजन करतात. 

Advertisement

नक्की वाचा - Baba Vanga: बाबा वेंगाची भविष्यवाणी! 2026 चे शेवटचे 8 महिने 'या' 5 राशींना करणार मालामाल, लागणार बंपर जॅकपॉट

या मागे अजून एक कारण आहे. त्यात आधुनिक जीवनशैलीत माणूस दिवसभर कामाच्या व्यापात असतो. शरीर आणि मन थकलेले असते. अशा स्थितीत रात्री कामातून मोकळीक मिळाल्यावर 'रिलॅक्सेशन' म्हणून मद्यपानाकडे पाहिले जाते. वेळेचे कोणतेही बंधन नसल्यामुळे निवांतपणे मद्यप्राशन करणे रात्रीच शक्य होते. त्यामुळे सर्व कामं आटपल्यानंतर बरेच जण श्रमपरिहार म्हणून दारूकडे वळतात. त्यांचा हा तसा समज असतो. एक दोन पेग पोटात गेल्यानंतर रिलॅक्स वाटतं अशी त्यांची भावना असते. त्यामुले सर्व कामे झाल्यानंतर संध्याकाळी निवंत पण ते दारू घेतात.  

नक्की वाचा - Alcohol Effects: उन्हाळ्यात दारू पिताना काय काळजी घ्याल? 'या' चुका टाळा नाही तर होईल मोठा घात

जगभरात मद्यविक्री व्यवसायाचे गणित रात्रीच्या वेळेवर अवलंबून आहे. रात्रीच्या वेळी होणारी कोट्यवधींची उलाढाल हे सिद्ध करते की, मद्यपान ही आता केवळ सवय न राहता एक 'नाईट लाईफ कल्चर' बनली आहे. त्यामुळेच सूर्यास्त झाला की मद्यप्रेमींची पावले आपोआप नशा पानाकडे वळतात. बारमध्ये झगमगाट वाढतो आणि काउंटरवर गर्दी उसळते. पण हा शौक रात्रीच का पूर्ण केला जातो? यामागे केवळ सवय नाही तर काही खास कारणे दडलेली आहेत. आपल्या समाजात दारू पिणे आजही वाईट मानले जाते. 

नक्की वाचा - Buttermilk Benefits: उन्हाळ्यात ताक पिणे ठरतेय वरदान! रोज एक ग्लास ताक पिण्याचे 'हे' आहेत 5 मोठे फायदे

दिवसा मद्यप्राशन केल्यास चार लोक काय म्हणतील, ही भीती असते. त्यामुळे 'घरच्यांची किंवा समाजाची नजर पडू नये' म्हणून लोक रात्रीच्या अंधाराला पसंती देतात. हा सर्वस्वी प्रतिष्ठेचा आणि लपून-छपून करण्याचा प्रकार बनला आहे. शिवाय दिवसभर उन्हात किंवा ऑफिसमध्ये काबाडकष्ट केल्यावर रात्री लोक घराकडे वळतात. एकदा का काम संपले की वेळेचे दडपण नसते. मित्रमंडळींसोबत गप्पा मारत शीण घालवण्यासाठी रात्रीची वेळ सर्वोत्तम वाटते. म्हणूनच बारमध्ये रात्रीच्या वेळी पाय ठेवायलाही जागा नसते. भारतात मद्यप्राशन हा विषय वैयक्तिक आवडीपेक्षा सामाजिक संकेतांशी जास्त जोडलेला आहे. 

Advertisement

(टीप: मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक आहे. वरील माहिती ही केवळ सामाजिक विश्लेषणासाठी दिली आहे.)