Health Tips News: पाणी आपल्या शरीरासाठी अमृतासमान आहे. पाण्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, शरीर निरोगी राहते आणि अनेक आजारांपासून शरीराचे संरक्षणही होते. पण पाणी योग्य भांड्यातून प्यायल्यास आरोग्यास अधिक फायदे मिळतील, हे तुम्हाला माहिती आहे का? आयुर्वेदातील माहितीनुसार चांदी, तांबे, कांस्य आणि पितळ यासारख्या धातूंच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. याउलट प्लास्टिक, स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यातील पाणी पिणे टाळावे. कारण यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे पाणी ग्लासमधून पिण्याऐवजी लोट्यातून (तांब्या किंवा गोल भांड्यातून) पिण्याचा सल्ला दिला जातो. पूर्वीच्या काळी लोक लोट्यातूनच पाणी पीत असत कारण आरोग्यासाठी ते अधिक लाभदायक मानले जात होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ग्लासमधून पाणी पिण्याची सवय कशी सुरू झाली?
पाणी पिण्यासाठी ग्लास वापरण्याची सवय पोर्तुगालमधून सुरू झाली आणि पोर्तुगीजांमुळेच ती भारतात प्रचलित झाली, असे म्हणतात. लोट्यातून पाणी पिणे अधिक सोयस्कर मानले जाते कारण त्याचा आकार सरळ आणि एकसमान नसून गोल असतो, जो आयुर्वेदानुसार अधिक फायदेशीर आहे. याउलट ग्लास सरळ आणि दंडगोलाकार असतो, जो पाणी पिण्यासाठी तितकासा योग्य मानला जात नाही. त्यामुळे ग्लासने पाणी न पिण्याची सल्ला दिला जातो.
कोणत्या भांड्यातून पाणी प्यावे?
पाण्याला स्वतःचा कोणताही गुणधर्म नसतो. ते ज्या भांड्यात ठेवले जाते, त्याचेच गुणधर्म ते धारण करते. उदाहरणार्थ पाणी दुधात मिसळल्यास त्यामध्ये दुधासारखे आणि दह्यात मिसळल्यास दह्यासारखे गुणधर्म तयार होतात. त्यामुळे पाणी कोणत्या भांड्यात ठेवले जात आहे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. भांड्याचा आकारही पाण्यावर परिणामकारक असतो. लोटा गोल असल्याने त्यात ठेवलेले पाणी गोलाकाराचा प्रभाव स्वीकारते आणि संतुलित ऊर्जा ग्रहण करते. तर ग्लासचा आकार सरळ आणि सिलिंडरप्रमाणे असतो जो नैसर्गिकरित्या लोट्याइतका अनुकूल मानला जाते.
(नक्की वाचा: पाण्याच्या बाटलीमध्ये या गोष्टी भरताय? वेळीच व्हा सावध, अन्यथा...)
पूर्वी विहिरी गोल आकारात बांधल्या जात असत अगदी लोट्याच्या आकाराप्रमाणे, यामागील कारण म्हणजे गोल आकारामुळे पाण्यावर सकारात्मक परिणाम होतो. गोल वस्तूंचा पृष्ठभागाचा भाग (Surface Area) कमी असतो. जेव्हा पृष्ठभाग कमी असतो, तेव्हा त्यावरील ताण, ज्याला वैज्ञानिक भाषेत पृष्ठभागीय ताण (Surface Tension) म्हणतात, तो देखील कमी असतो. जेव्हा पाण्याचा पृष्ठभागीय ताण कमी असतो, तेव्हा ते शरीरासाठी (Water Health Benefits)अधिक फायदेशीर ठरते.
... तर शरीरावर होतील परिणाम
जर तुम्ही जास्त पृष्ठभागीय ताण असलेली पेय प्यायलात तर ती शरीरासाठी हानिकारक ठरू शकते, कारण त्यात एक प्रकारचा अतिरिक्त दाब असतो; असे म्हणतात. साधू-संतांकडे असलेले कमंडलू देखील लोट्याच्या किंवा विहिरीच्या आकारासारखेच गोल असत, हे तुम्ही पाहिले असेल. हे शरीरासाठी अधिक आरामदायक आणि फायदेशीर मानले जातात.
जेव्हा पाण्याचा पृष्ठभागीय ताण कमी असतो, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर अधिक काळ टिकून राहतो. विशेष म्हणजे असे पाणी आपल्या आतड्यांच्या स्वच्छतेसाठी मदत करते. शरीरातील मोठ्या आणि लहान आतड्यांच्या आतमध्ये एक पटल (Membrane) असते, ज्यावर घाण जमा होते. पोटाची कार्यप्रणाली सुरळीत सुरू राहण्यासाठी ही घाण स्वच्छ करणे गरजेचे असते. जर आपण कमी पृष्ठभागीय ताण असलेले पाणी प्यायलात तर ते आतड्यांची खोलवर स्वच्छता करण्यास मदत करते आणि पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल.
(नक्की वाचा: रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने काय होते?)
दंडगोलाकार भांड्यातून पाणी प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतात?
उदाहरणार्थ जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर थोडेसे दूध लावले आणि पाच मिनिटांनी ते कापसाने पुसले तर कापूस काळा होतो. याचा अर्थ दुधाने त्वचेच्या आतील घाण बाहेर काढली. असे घडते कारण दुधाचा पृष्ठभागीय ताण कमी असतो. यामुळे त्वचा थोडीशी मोकळी होते आणि आतील घाण बाहेर येते. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही लोट्यासारख्या गोल भांड्यात ठेवलेले पाणी पिता तेव्हा तेही कमी पृष्ठभागीय ताण असलेले असते. असे पाणी पोटात गेल्यास आतड्यांची स्वच्छता होण्यास मदत मिळते. परिणामी पचनसंस्थेचे कार्य सुधारते आणि शरीर निरोगी राहते.
पृष्ठभागीय ताण कमी असलेले पाणी प्यायल्यास शरीराला ताकद मिळते आणि आजारांपासूनही शरीराचे रक्षण होते. विशेषतः भगंदर, मूळव्याध आणि आतड्यांना सूज येण्यासारख्या समस्यांचा धोका कमी असतो. याच कारणामुळे आयुर्वेदामध्ये लोट्यातून पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )