जाहिरात

Bottle Gourd Dosa: दुधी भोपळ्याची भाजी खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा कुरकुरीत डोसा, वेटलॉसह मिळतील असंख्य फायदे

Bottle Gourd Dosa Recipe:दुधी भोपळ्यापासून पौष्टिक आणि चविष् डोसा तयार करा. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी, झटपट आणि आरोग्यदायी रेसिपी आजच ट्राय करा

Bottle Gourd Dosa: दुधी भोपळ्याची भाजी खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा कुरकुरीत डोसा, वेटलॉसह मिळतील असंख्य फायदे
"Dudhibhopla Recipe : दुधीभोपळा डोसा कसा तयार करावा?"
AI

Bottle Gourd Dosa Recipe: दुधी भोपळा म्हटलं की अनेकांचा चेहरा पडतो, विशेषतः मुलं तर या भाजीपासून लांबच पळतात. पण याच दुधी भोपळ्यापासून काहीतरी नवीन आणि चविष्ट बनवलं, तर हीच भाजी सर्वजण आवडीने खातील. दुधीभोपळ्याचा डोसा रेसिपी तयार केली तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल. नाश्त्यासाठी हा एक हलका, झटपट होणारा उत्तम पर्याय आहे.

दुधी भोपळ्याचा डोसा आरोग्यासाठी लाभदायक 

दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. यात कॅलरीज् कमी आणि फायबर भरपूर असल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. म्हणूनच वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा उत्तम आहार आहे. 

दुधी भोपळ्याचा डोसा तयार करण्यासाठी लागणारी सामग्री

  • किसलेला दुधी भोपळा
  • रवा किंवा तांदळाचे पीठ
  • दही
  • हिरव्या मिरच्या
  • आले
  • चवीनुसार मीठ
  • तेल
दुधी भोपळ्याचा डोसा कसा तयार करावा?
  • सर्वप्रथम दुधी भोपळा किसून घ्या आणि त्यातील जास्तीचे पाणी हलकेच काढून टाका.
  • आता त्यात रवा किंवा तांदळाचे पीठ आणि दही मिक्स करून सर्व सामग्री व्यवस्थित एकजीव करून घ्या.
  • त्यानंतर बारीक चिरलेली मिरची, आले आणि मीठ घालून एक स्मूद बॅटर (पीठ) तयार करा. बॅटर खूप घट्ट किंवा खूप पातळ नसावे याची काळजी घ्या.
  • तवा गरम करून त्यावर थोडे तेल लावा. बॅटर तव्यावर पसरवून गोलाकार डोसा तयार करा. मध्यम आचेवर डोसा खमंग भाजून घ्या.
  • दुधी भोपळ्याचा डोसा नारळाची चटणी किंवा टोमॅटो चटणीसोबत खाऊ शकता. 
  • डोसा तयार करताना तवा खूप गरम नसावा, अन्यथा बॅटर नीट पसरणार नाही. बॅटर 10-15 मिनिटे झाकून ठेवल्यास डोसा अधिक कुरकुरीत होतो.

FAQs

1. दुधीभोपळ्याचा डोसा फर्मेंटेशनशिवाय होऊ शकतो का?
- हो, रवा किंवा तांदळाच्या पिठापासून इन्स्टंट बॅटर तयार केले जाऊ शकते.  

(नक्की वाचा: Pudina Chutney: पुदिना चटणी काळी पडण्याचे कारण 99% लोकांना माहिती नसणार, चटणी फ्रेश राहण्यासाठी वापरा या टिप्स)

2. दुधी भोपळ्याचा डोसा आरोग्यदायी ठरेल का?  
- दुधी भोपळ्यामध्ये पाणी आणि फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे हा नाश्ता पोटासाठी हलका मानला जातो. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

(नक्की वाचा: Homemade Thick Curd: उन्हाळ्यात दही कसे तयार करावे? मार्केटसारखे घट्ट दही तयार करण्यासाठी फॉलो करा 10 स्टेप्स)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com