Holi 2026: होळीच्या रंगांपासून केसांचे आरोग्य जपण्यासाठी खास टिप्स; असं जपा केसांचं सौंदर्य

होळीनंतरही केसांचा मुलायमपणा आणि चमक कायम राहावी, यासाठी गोदरेजमधील टेक्निकल हेड शैलेश मुल्या यांनी काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

 Holi Hair Care Tips: होळीचा सण म्हणजे रंगांची उधळण, उत्साह आणि आनंदाचा सोहळा. मात्र, हा आनंद लुटताना अनेकदा आपल्या केसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. रंगांमध्ये असलेल्या घातक रसायनांमुळे केसांतील नैसर्गिक ओलावा निघून जातो, केस कोरडे आणि निस्तेज होतात. होळीनंतरही केसांचा मुलायमपणा आणि चमक कायम राहावी, यासाठी गोदरेजमधील टेक्निकल हेड शैलेश मुल्या यांनी काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

होळी खेळण्यापूर्वी केसांची 'अशी' घ्या काळजी! 

  • 'केराकेअर मॅकॅडॅमिया ऑइल': होळी खेळायला बाहेर पडण्यापूर्वी केसांना 'केराकेअर मॅकॅडॅमिया ऑइल' अत्यंत फायदेशीर ठरते. हे तेल केसांभोवती एक संरक्षक थर तयार करते, ज्यामुळे रासायनिक रंग केसांच्या आतपर्यंत पोहोचत नाहीत.
  • केसरचना बदला: होळी खेळताना केस कधीही मोकळे सोडू नका. केस मोकळे असल्यास त्यात रंग जास्त अडकतात आणि गुंता होतो. त्याऐवजी घट्ट वेणी किंवा आंबाडा बांधा.
  • स्कार्फ किंवा टोपी वापरा: केसांचे थेट रंगांपासून संरक्षण करण्यासाठी डोक्याला स्कार्फ, टोपी किंवा रुमाल बांधा. ही सर्वात प्रभावी पद्धत आहे.

  • Beauty Tips: लिपस्टिक लावत असाल तर सावधान! सुंदर दिसणे कसं ठरू शकतं आरोग्यासाठी घातक? वाचा सविस्तर

 होळी खेळल्यानंतर काय करावे? (Post-Holi Tips)

रंग खेळून झाल्यानंतर केसांतील रासायनिक घटक काढून टाकण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करा:

  • थंड पाण्याचा वापर: केस धुण्यासाठी कोमट किंवा गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करा. थंड पाण्यामुळे रसायने सहज निघून जाण्यास मदत होते.
  • सौम्य शॅम्पू (Sulphate-free Shampoo): रंगांमुळे केस आधीच कोरडे झालेले असतात, अशा वेळी कडक शॅम्पू वापरण्याऐवजी सौम्य (Mild) शॅम्पूचा वापर करा. यामुळे केसांतील आर्द्रता टिकून राहते.
  • हेअर मास्कने द्या पोषण: केसांना हरवलेले पोषण परत मिळवून देण्यासाठी मध किंवा नैसर्गिक घटक असलेल्या हेअर मास्कचा वापर करा. हे टाळूच्या (Scalp) आरोग्यासाठी उत्तम ठरते.
  • हीटिंग टूल्स टाळा: होळीनंतर काही दिवस हेअर ड्रायर किंवा स्ट्रेटनर वापरणे टाळा. केसांना नैसर्गिक हवेत सुकू द्या, जेणेकरून अधिक नुकसान होणार नाही.

Holi Festival 2026: 2 की 3 मार्च? यंदा होळी नेमकी कधी साजरी करावी? जाणून घ्या अचूक तारीख!

Topics mentioned in this article