जाहिरात

Beauty Tips: लिपस्टिक लावत असाल तर सावधान! सुंदर दिसणे कसं ठरू शकतं आरोग्यासाठी घातक? वाचा सविस्तर

Beauty Tips: लिपस्टिकमध्ये शिसे, पारा आणि आर्सेनिक यांसारखे घातक जड धातू असू शकतात, जे शरीरात साठून दीर्घकालीन आजारांना निमंत्रण देतात. नैसर्गिक आणि 'टॉक्सिन-फ्री' उत्पादने निवडण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Beauty Tips: लिपस्टिक लावत असाल तर सावधान! सुंदर दिसणे कसं ठरू शकतं आरोग्यासाठी घातक? वाचा सविस्तर

ओठांवर लावलेली लिपस्टिक दिसायला जरी सुंदर असली, तरी ती आरोग्यासाठी तितकीच घातक ठरू शकते असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी लिपस्टिकमधील घातक घटकांबाबत सोशल मीडियावर माहिती शेअर केली असून, सौंदर्य प्रसाधने निवडताना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

सौंदर्याच्या ओघात आपण अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष होते. लिपस्टिकचा एक स्वाइप जरी आपल्याला छोटा वाटत असला तरी, त्यामध्ये लपलेले घटक शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. अंजली मुखर्जी यांनी नुकत्याच एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे लिपस्टिकमधील घटकांच्या अस्तित्वावर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मते, सौंदर्य हे आरोग्याच्या किमतीवर नसावे.

लिपस्टिकमध्ये नेमके काय असते?

अंजली मुखर्जी यांच्या मते, लिपस्टिक तयार करण्याच्या प्रक्रियेत आणि रंगांच्या (Pigments) स्त्रोतामुळे शिसे (Lead), पारा (Mercury), आर्सेनिक (Arsenic) आणि निकेल (Nickel) यासारखे काही घातक धातूंचे अंश मिसळले जातात. हे धातू हेतुपुरस्सर टाकले जात नाहीत, तर निर्मिती प्रक्रियेत अशुद्धता म्हणून ते शिल्लक राहतात.

पाहा VIDEO

शरीरावर होणारे गंभीर परिणाम

हे जड धातू शरीरात गेल्यावर 'फ्री रॅडिकल्स' तयार करतात, ज्यामुळे शरीरात 'ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस' निर्माण होतो. हे धातू पेशींच्या आवरणाला हानी पोहोचवतात. जड धातूंच्या सततच्या संपर्कामुळे मानवी डीएनएमध्ये बदल होऊ शकतात. शरीराच्या नैसर्गिक चयापचय क्रियेत हे धातू अडथळा आणतात. मानवी शरीर हे धातू नैसर्गिकरित्या बाहेर टाकू शकत नाही, त्यामुळे ते शरीरात साठत जातात (Bioaccumulation), जे भविष्यात गंभीर आजारांना कारणीभूत ठरतात.

सुरक्षित पर्याय कसे निवडावेत?

बाजारात सध्या 'क्लीन ब्युटी'चा ट्रेंड वाढत आहे. ग्राहकांनी लिपस्टिक खरेदी करताना काही गोष्टींकडे लक्ष द्यावे.

  • लेबल तपासा: नैसर्गिक (Natural), सेंद्रिय (Organic), शिसेमुक्त (Lead-free) किंवा टॉक्सिन-फ्री (Toxin-free) लेबल असलेल्या उत्पादनांना प्राधान्य द्या.
  • पारदर्शकता: ज्या कंपन्या घटकांची संपूर्ण माहिती देतात, अशाच ब्रँड्सची निवड करा.
  • सल्ला घ्या: 'नैसर्गिक' म्हणजे नेहमीच 'सुरक्षित' असे नसते, त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.
     

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com