- दिवसभर उभे राहून काम करणाऱ्या व्यक्तींसाठी पायाचा थकवा आणि सूज कमी करण्यासाठी घरगुती फुट सोक उपाय उपयुक्त आहे
- गरम पाण्यात पाय ठेवल्यास रोमछिद्रे उघडतात आणि रक्ताभिसरण तसेच लिंफ सर्क्युलेशन सुधारतो
- एप्सम सोल्टमध्ये असलेला मॅग्नेशियम स्नायूंना रिलॅक्स करून थकवा कमी करण्यात मदत करतो
How To Relieve Tired Feet At Home: दिवसभराची धावपळ, तास-न्-तास उभे राहून केलेले काम आणि मानसिक ताणामुळे अनेकदा पाय दुखणे, पायाला सूज येणे किंवा जडपणा येणे अशा समस्या उद्भवतात. आयुर्वेदानुसार आपले पाय हे संपूर्ण शरीराचे द्वार मानले जातात. म्हणूनच पायांचा थकवा दूर करून संपूर्ण शरीराला अवघ्या 20 मिनिटांत आराम देण्यासाठी डॉ. रुचा पै यांनी एक सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय सुचवला आहे. फक्त चार साधे घटक वापरून तयार करण्यात येणारा हा 'फुट सोक'चा (Foot Soak) उपाय स्नायूंना रिलॅक्स करतो, रक्ताभिसरण सुधारतो आणि मनाला शांतता देऊन गाढ झोप येण्यास मदत करतो.
तुमचेही पाय थकले आहेत?
फक्त 20 मिनिटे आणि संपूर्ण शरीराला आराम मिळेल
घरच्या घरी फुट सोक करण्यासाठी चार गोष्टी आवश्यक आहेत.
आयुर्वेद सांगतो : पाय म्हणजे संपूर्ण शरीराचं द्वार
गरम पाण्यात पाय भिजवल्याने रोमछिद्र उघडतात
रक्ताभिसरण आणि लिंफ सुधारतं
20 मिनिटांत तुम्हाला काय फरक जाणवेल?
- स्नायू रिलॅक्स होतील
- पायांचा थकवा कमी होईल
- शरीर हलके वाटेल
- मनाला शांतता मिळेल
हा उपाय कोणासाठी?
दिवसभर उभे राहून काम करणारे व्यक्ती, पायात जडपणा / सूज, झोप नीट न लागणे, ताण-तणाव वाढला असणे यासारख्या समस्या असणाऱ्यांनी फुट सोकचा उपाय करावा.
1. कोमट-गरम पाणी
शक्य तितकं कोमट पाणी घ्या
पायाची रोमछिद्रं (pores) उघडतात, रक्ताभिसरण सुधारतं, लिंफ सर्क्युलेशन वाढतं
2. एप्सम सोल्ट(Epsom Salt)
- एक कप एप्सम सोल्ट पाण्यात घाला
- यात मॅग्नेशिअम असतं
- स्नायूंना रिलॅक्स करतं थकवा कमी होतो
- रोज थकणाऱ्या पायांसाठी सर्वोत्तम उपाय आहे
3. अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
अर्धा कप अॅपल सायडर व्हिनेगर घाला यामुळे त्वचेतील पीएच बॅलेन्स (pH balance) राखतं, त्वचा स्वच्छ ठेवतं, दुर्गंधी कमी होते.
(नक्की वाचा : Imli Facts: चिंच खाल्ल्याने खरंच उंची वाढत नाही? लहानपणी तुम्हीही खाल्लाय का आईचा ओरडा, धक्कादायक सत्य समोर)
4. यापैकी एक गोष्ट कोमट पाण्यात मिक्स करा
- रोझमेरी (Rosemary)
- लॅव्हेंडर (Lavender)
- आले (Ginger)
शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते आणि शरीराला आराम मिळतो
(नक्की वाचा : What Is Acidity: पोटात जळजळ होते? अॅसिडिटी म्हणजे काय? तुमच्या या 7 वाईट सवयी तातडीने बंद करा, अन्यथा...)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world