Honey Bee Attack: सावधान! मधमाश्यांच्या हल्ल्यानंतर करू नका ही चूक, शरीरात वेगाने पसरले विष; वाचा योग्य उपाय

Honey Bee Attack: मधमाशी चावल्यावर डंख कसा काढावा आणि इन्फेक्शन टाळण्यासाठी काय करावे? जाणून घ्या डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

जाहिरात
Read Time: 3 mins
"Honey Bee Attack: मधमाशी चावल्यानंतर 3 मिनिटांत काय करावे?"
Canva

Honey Bee Attack Treatment: उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दिवसांत मधमाश्यांचा प्रादुर्भाव वाढणे सामान्य बाब आहे. मधमाशा केवळ मधाचीच निर्मिती करत नाहीत तर निसर्गासह आपल्या जीवनातही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. पण जेव्हा मधमाशी चावते, तेव्हा या सर्व गोष्टींचा विसर पडून आपल्याला खूप राग येतो. अनेकदा बागेत, शेतात, छतावर किंवा बाहेर फिरताना मधमाशा अचानक हल्ला करतात. मधमाशी चावल्यानंतर लोक घाबरून जातात आणि आराम मिळवण्यासाठी लगेचच घरगुती उपाय करू लागतात. परिणामी चुकीच्या उपाय केल्याने अनेकदा मधमाश्यांनी चावा घेतलेल्या जागेवर वेदना आणि सूज वाढू शकते. या समस्या टाळण्यासाठी मधमाशी चावल्यानंतर योग्य वेळेत योग्य उपचार करणे आवश्यक आहे.

मधमाशी चावल्यानंतर तिचा एक लहानसा डंख त्वचेवर राहू शकतो. याच डंखातून विष शरीरात जाते, ज्यामुळे वेदना, जळजळ होणे, त्वचा लालसरपणा होऊन सूज येणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. काही लोकांवर याचा परिणाम कमी होतो, तर ज्या लोकांना अ‍ॅलर्जी असते त्यांच्यासाठी हे घातकही ठरू शकते.

Advertisement

मधमाशी चावल्यास सर्वात आधी काय करावे? (What to do first after a bee sting?)

मधमाशी चावल्यास सर्वात आधी त्या जागेचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. जर तुम्हाला डंख दिसत असेल, तर तो नखाच्या मदतीने किंवा एखाद्या पातळ वस्तूच्या मदतीने हळूहळू तो बाहेर काढा. पण नख लागता कामा नये तसेच मधमाशी चावलेली जागा चुकूनही दाबू नका, असे केल्याने विष आणखी आत जाऊ शकते. डंख काढल्यानंतर ती जागा स्वच्छ पाणी आणि साबणाने नीट धुवून घ्या. यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. त्यानंतर कापडात बर्फ गुंडाळून 10 ते 15 मिनिटे शेक द्यावा, यामुळे त्वचेवरील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत मिळेल.

(नक्की वाचा : Snake Bite: सर्पदंशानंतर 10 मिनिटांची ही चूक ठरेल मृत्यूचे कारण, सर्वात आधी काय करावे? वाचा तज्ज्ञांचे 5 मुद्दे)

मधमाशी चावल्यानंतर काय करू नये? (What to avoid after a bee sting?)

माहितीनुसार अनेक लोक मधमाशी चावल्यानंतर लगेच माती, टूथपेस्ट किंवा पेट्रोल आणि आंबट गोष्ट त्या जागी लावतात, पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असे उपाय करणे योग्य ठरणार नाहीत. मधमाशी चावल्यानंतर जास्त खाज येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटी-अ‍ॅलर्जी औषध घेतले जाऊ शकते.

तर लगेचच सावध व्हा... (Watch out for these symptoms...)

जर मधमाशी चावल्यानंतर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, चेहरा किंवा घशामध्ये सूज आली असेल, चक्कर, उलटी किंवा तीव्र स्वरुपात अस्वस्थता जाणवत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ही अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शनची (तीव्र प्रतिक्रियेची) लक्षणे असू शकतात. अशा परिस्थितीत तातडीने हॉस्पिटलमध्ये जावे.

Advertisement

Photo Credit: NDTV Marathi

मधमाशी दिसेल तर स्वतःचा कसा करावा बचाव? (How to protect yourself if you see a bee?)

जर तुमच्या आजूबाजूला मधमाशा घोंघावत असेल तर कधीही घाबरून हात-पायांची हालचाल करू नका. उलट आपल्या जागेवर पूर्णपणे शांत उभे राहा, असे केल्याने मधमाशीकडून डंख मारण्याचा धोका कमी असतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)