जाहिरात

Snake Bite:सर्पदंशानंतर 10 मिनिटांची ही चूक ठरेल मृत्यूचे कारण, सर्वात आधी काय करावे? वाचा तज्ज्ञांचे 5 मुद्दे

After Snake Bite What To Do: सर्पदंशानंतर घाबरून न जाता कोणते उपचार करावे आणि कोणत्या चुका टाळाव्या, याबद्दल आरोग्य तज्ज्ञांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला सविस्तर वाचा.

Snake Bite:सर्पदंशानंतर 10 मिनिटांची ही चूक ठरेल मृत्यूचे कारण, सर्वात आधी काय करावे? वाचा तज्ज्ञांचे 5 मुद्दे
"After Snake Bite What To Do: सर्पदंश झाल्यानंतर तातडीने करा हे उपाय"
AI Image
  • सर्पदंश ही गंभीर वैद्यकीय आणीबाणी असून त्वरित आणि योग्य उपचार केल्यास रुग्णाचा जीव वाचतो
  • जखमेवर कधीही चिरफाड करू नये, घट्ट पट्टी बांधू नका आणि विष तोंडाने काढण्याचा प्रयत्न करू नका
  • सर्पदंश झाल्यावर रुग्णाला शांत ठेवून हालचाल कमी करावी आणि त्वरित जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करावे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Snake Bite First Aid: अवकाळी पाऊस किंवा ग्रामीण भागात सापांचे दर्शन होणे ही सामान्य बाब आहे. अशा वेळी अनेकदा सर्पदंशाच्या घटना घडतात, ज्या जीवघेण्या ठरू शकतात. तज्ज्ञांच्या मते सर्पदंश ही एक गंभीर 'मेडिकल इमर्जन्सी' आहे. घाबरून गेल्यामुळे किंवा चुकीचे घरगुती उपाय केल्यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. योग्य माहिती आणि वेळेत उचललेली योग्य पावले सर्पदंश झालेल्या रुग्णाचा जीव वाचवू शकतात.

नॅशनल हेल्थ मिशननुसार, सर्पदंशाच्या बाबतीत वेळ अतिशय महत्त्वाची आहे. देशात दरवर्षी मोठ्या संख्येने लोक सर्पदंशाचे बळी ठरतात. अनेकदा लोक जादूटोणा यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवून वेळ वाया घालवतात, ज्यामुळे परिस्थिती गंभीर होते. योग्य वेळी उपचार मिळाल्यास बहुतांश प्रकरणांमध्ये रुग्णाचा जीव वाचवला जाऊ शकतो. 

सर्पदंश झाल्यानंतर सर्वात आधी काय करावे? (What To Do First After A Snake Bite) 

1. सर्पदंश झाल्यानंतर जखम स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. रुग्णाच्या अंगावरील अंगठी, कडे, बूट किंवा घट्ट कपडे त्वरित काढून टाकावे. रुग्णाला शांत ठेवावे आणि जास्त हालचाल करू देऊ नये. उशीर न करता तातडीने जवळील सरकारी रुग्णालयात दाखल करावे.

2. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सर्पदंश झालेल्या जखमेवर कधीही चिरफाड करू नये. जखमेवर अतिशय घट्ट पट्टी किंवा दोरी बांधू नका. विष तोंडाने काढण्याचा प्रयत्न कधीही करू नका. जादुटोणा, गावरान औषधे किंवा कोणत्याही प्रकारच्या घरगुती उपायांवर वेळ वाया घालवू नका.

(नक्की वाचा : Benefits of Sleeping Early: 60 दिवस मी रात्री लवकर झोपलो, थकवा गायब आणि शरीरात झाले मोठे बदल!थक्क करणारा अनुभव)

3. सर्पदंशानंतर सर्वात मोठा धोका चुकीच्या उपचारामुळे असतो. विष शरीरात वेगाने पसरू शकते, त्यामुळे रुग्णाची हालचाल शक्य तितकी कमी ठेवावी. जखम झालेली जागा कापल्यास किंवा विष तोंडाने काढल्यास संसर्गाचा धोका वाढतो आणि रुग्णाची स्थिती अधिक खालावू शकते.

4. आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार, सर्पदंश झाल्यास त्वरित जवळच्या सरकारी रुग्णालयात जावे, जिथे 'अँटी-व्हेनम सीरम' आणि आवश्यक उपचार उपलब्ध असतात. खासगी क्लिनिक किंवा घरगुती उपचारांवर अवलंबून राहण्यापेक्षा सरकारी रुग्णालयात जाणे अधिक सुरक्षित आहे.

(नक्की वाचा : Valley Fever: व्हॅली फिव्हर म्हणजे काय? अदृश्य बुरशीमुळे अमेरिकेत भारतीयाचा मृत्यू, 30 दिवस दिला मृत्यूशी लढा)

5. सापांचा वावर असलेल्या भागात सतर्क राहा. रात्री अंधाऱ्या मार्गावर चालताना टॉर्चचा वापर करा आणि लांब गवत किंवा काळोख असणाऱ्या जागी जाणे टाळा. सर्पदंश ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे. घाबरण्याऐवजी शांत राहून योग्य पावले उचलल्यास जीव बचावला जाऊ शकतो.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com