रात्री पार्टी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तुमच्या शरीरात दारू किंवा अल्कोहोलचं प्रमाण किती असतं? याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का? अनेकांना वाटतं की, भरपूर खाल्लं किंवा 'Greasy Food' खाल्ल्याने दारूचा प्रभाव कमी होतो. मात्र हे केवळ एक मिथक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. प्रत्यक्षात तुमच्या शरीरातून दारू पूर्णपणे बाहेर निघायला तुम्ही विचार करता त्यापेक्षा खूप जास्त वेळ लागतो.
मेडिकल सायन्स काय सांगतं?
तज्ज्ञांनुसार, शरीरातून अल्कोहोल पूर्णपणे निघून जाण्यासाठी 'फाइव हाफ-लाइव्स' (Five Half-lives) ची आवश्यकता असते. दारूची 'हाफ-लाइफ' साधारण चार ते पाच तासांची असते. याचा अर्थ एक पेग किंवा एक स्टँडर्ड ड्रिंक शरीरातून पूर्णपणे निघून जाण्यासाठी २० ते २५ तास म्हणजे तब्बल एक संपूर्ण दिवस लागू शकतो.
शरीराचं मेटाबॉलिज्म कसं काम करतं?
फिजिशियन डॉ. सुनीत सिंह (Austin, Texas) यांनी सांगितलं, दारूच्या पचनाची प्रक्रिया पोटापासून सुरू होते.
- अधिकांश दारू छोट्या आतड्यांपासून सुरू होते आणि थेट रक्तात मिसळते.
- शरीरातील ९० टक्क्यांहून अधिक दारू बाहेर काढण्याचं काम लिव्हर करतं.
- जेव्हा लिव्हर दारूला शरीराबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करतं तेव्हा 'एसिटालडिहाइड' (Acetaldehyde) नावाचं केमिकल तयार होतं. ज्यामुळे डोकेदुखी, अस्वस्थता आणि हृदयाचे ठोके वाढणे आदी समस्या उद्भवतात.
काहीजण जास्त नशेत का असतात? काहींना दारू जास्त का चढते?
प्रत्येक व्यक्तीचं शरीर दारूला विविध प्रकारे प्रोसेस करतं. यामागे लिव्हरचे दोन खास एन्जाइम्स (ADH आणि ALDH) असतात.
पुरुष विरुद्ध महिला -
- रिसर्चनुसार पुरुषांमध्ये ADH एन्जाइम महिलांच्या तुलनेत जास्त असतो. ज्यामुळे त्यांचं शरीर दारू लवकर प्रोसेस करू शकतं.
- जे लोक नियमित दारू पितात, त्यांच्या शरीरात ADH चं प्रमाण कमी असतं.
- रिसर्चनुसार, पूर्व आशिया वंशाच्या ३५-४०% लोकांमध्ये इतर समुदायांपेक्षा ALDH एन्जाइमचं प्रमाण कमी असतं, ज्यामुळे त्यांना अल्कोहोलचे दुष्परिणाम अधिक भोगावे लागतात.
चाचणीत दारू कधीपर्यंत दिसून येते?
तुमची नशा उतरल्याचं तुम्हाला वाटत असलं तरीही मेडिकल चाचणीत रक्तातील दारू बराच काळ राहते.
रक्त : 12 तासांपर्यंत
श्वास (Breath) : 12 ते 24 तासांपर्यंत
लाळ (Saliva) : 48 तासांपर्यंत
लघवी (Urine) : 72 तासांपर्यंत
केस (Hair) : 90 तासांपर्यंत
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)