
Bank Holiday in October Month 2025:दर महिन्याच्या नियमानुसार, ऑक्टोबर २०२५ मध्येही बँका अनेक दिवस बंद राहणार आहेत. या महिन्यात दसरा, दिवाळी, लक्ष्मी पूजा, छठ पूजा अशा अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक सणांमुळे बँकांचे कामकाज ठप्प राहील. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑक्टोबर महिन्यातील सुट्ट्यांची राज्यानुसार यादी जाहीर केली असून, ग्राहकांनी त्यानुसारच आपल्या कामाचे नियोजन करावे.
२ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त देशभरातील सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय सुट्टी राहील. याव्यतिरिक्त, देशातील सर्व सरकारी आणि खासगी बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी (जे अनुक्रमे ११ आणि २५ ऑक्टोबर रोजी येतील) आणि प्रत्येक रविवारी बंद राहतील. ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि दिवाळी यांसारख्या मोठ्या सणांमुळे अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहे.
ऑक्टोबर महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी| Bank Holiday List In October 2025| How Many Days Banks Remain Closed?
- १ ऑक्टोबर: दसरा, आयुध पूजा (महानवमी/विजयादशमी) आणि दुर्गा पूजा (दशैं) निमित्त त्रिपुरा, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, केरळ, नागालँड, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि मेघालय या राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
- २ ऑक्टोबर: महात्मा गांधी जयंती निमित्त संपूर्ण भारतात राष्ट्रीय सुट्टी असल्याने सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बँकांचे कामकाज बंद राहील.
- ३ आणि ४ ऑक्टोबर: सिक्कीममध्ये दुर्गा पूजा (दशैं) असल्यामुळे बँका बंद राहतील.
- ६ ऑक्टोबर: त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी पूजेमुळे बँकांना सुट्टी असेल.
- ७ ऑक्टोबर: कर्नाटक, ओडिशा, चंदीगड आणि हिमाचल प्रदेशमध्ये महर्षी वाल्मीकी जयंती आणि कुमार पौर्णिमा निमित्त बँका बंद असतील.
- १० ऑक्टोबर: हिमाचल प्रदेशमध्ये करवा चौथ निमित्त बँका बंद राहतील.
- १८ ऑक्टोबर: आसाममध्ये कटी बिहू निमित्त बँकांना सुट्टी असेल.
- २० ऑक्टोबर: दिवाळी, नरक चतुर्दशी आणि काली पूजा निमित्त त्रिपुरा, गुजरात, मिझोराम, कर्नाटक, मध्य प्रदेश, चंदीगड, तामिळनाडू, उत्तराखंड, आसाम, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, केरळ, नागालँड, पश्चिम बंगाल, दिल्ली, गोवा, छत्तीसगड, झारखंड, मेघालय, हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.
- २१ ऑक्टोबर: महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, मणिपूर, जम्मू आणि श्रीनगरमध्ये दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजन), दीपावली आणि गोवर्धन पूजा निमित्त बँका बंद राहतील.
- २२ ऑक्टोबर: गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दिवाळी, विक्रम संवत नववर्ष, गोवर्धन पूजा, बलिप्रतिपदा आणि लक्ष्मी पूजा (दिवाळी) निमित्त बँका बंद राहतील.
- २३ ऑक्टोबर: गुजरात, सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाई दूज, चित्रगुप्त जयंती, लक्ष्मी पूजा (भैत्रिद्वितीय) आणि निंगोल चक्कौबा निमित्त बँका बंद असतील.
- २७ ऑक्टोबर: पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये छठ पूजा (संध्या पूजा) निमित्त बँकांचे कामकाज बंद राहील.
- २८ ऑक्टोबर: बिहार आणि झारखंडमध्ये छठ पूजा (सकाळची पूजा) निमित्त बँकांना सुट्टी असेल.
- ३१ ऑक्टोबर: गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त बँका बंद राहतील.
याशिवाय, नेहमीप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी (October 11 आणि October 25) बँकांना राष्ट्रीय सुट्टी असेल. ग्राहकांनी डिजिटल बँकिंगचा (Digital Banking) वापर करून आपले व्यवहार सुरळीत ठेवावेत.
Gaurav More Home: गौरव मोरेचं 1.78 कोटींचं अलिशान घर कसं आहे? पाहा VIDEO
डिजिटल सेवा सुरू:
दरम्यान, बँक शाखा बंद असल्या तरी, ग्राहकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ऑनलाइन बँकिंग, मोबाईल ॲप्स, UPI आणि ATM सेवा २४x७ उपलब्ध राहतील. पैसे हस्तांतरित करणे, बिल भरणे किंवा खात्याची माहिती तपासणे यासारखे महत्त्वाचे व्यवहार या डिजिटल माध्यमातून करता येतील. तरीही, पासबुक अपडेट करणे किंवा मोठी रक्कम जमा करणे यांसारख्या कामांसाठी ग्राहकांनी सुट्ट्यांचे वेळापत्रक लक्षात घेऊन बँकेच्या शाखेत जाणे आवश्यक आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world