जाहिरात

skincare tips: चेहऱ्याला किती प्रमाणात सनस्क्रीन लावलं पाहीजे? जाणून घ्या सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत

घराबाहेर पडण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे आधी सनस्क्रीन लावण्याचा सल्ला ते देतात. दर 2 ते 3 तासांनी ते पुन्हा लावावे.

skincare tips: चेहऱ्याला किती प्रमाणात सनस्क्रीन लावलं पाहीजे? जाणून घ्या सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत
  • सनस्क्रीन योग्य प्रमाणात न लावल्यास त्याचा SPF प्रभाव लक्षणीयरीत्या कमी होतो आणि त्वचेचे संरक्षण कमी होते
  • चेहऱ्यासाठी दोन बोटांवर मावेल इतकी सनस्क्रीन आणि मानेवर तीन बोटे सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे
  • कमी प्रमाणात सनस्क्रीन लावल्यानं SPF ५० चे संरक्षण SPF ३० किंवा त्याहून कमी प्रमाणातही होऊ शकते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Face Sunscreen Quantity: उन्हाळा सुरू झाला की त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रत्येक जण सनस्क्रीनचा वापर करू लागतो. बाजारात महागडे SPF 50 किंवा PA++++ असलेले सनस्क्रीन उपलब्ध आहेत. पण फक्त ते विकत घेणे पुरेसे नाही. अनेक जण नियमित सनस्क्रीन लावूनही टैनिंग, पिगमेंटेशन आणि सन डॅमेजच्या तक्रारी करतात. याचे मुख्य कारण म्हणजे सनस्क्रीन योग्य प्रमाणात न लावणे हे आहे. दिल्लीतील प्रसिद्ध डर्मेटोलॉजिस्ट डॉ. गुरवीन वराईच यांनी याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. जर सनस्क्रीन योग्य प्रमाणात लावले नाही, तर त्याचा SPF प्रभाव खूप कमी होतो असं त्यांनी सांगितलं आहे. 

​डॉ. गुरवीन वराईच यांच्या मते, त्वचेच्या प्रति चौरस सेंटीमीटरवर साधारणपणे 2 mg सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. संपूर्ण चेहरा आणि मानेचा विचार केल्यास हे प्रमाण 1.6 mg ते 1.8 mg इतके होते. सोप्या भाषेत सांगायचे तर, केवळ चेहऱ्यासाठी 2 फिंगर (दोन बोटांवर मावेल इतके) सनस्क्रीन पुरेशी आहे. तर चेहरा आणि मान या दोन्ही भागांसाठी साधारणपणे 3 फिंगर सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे. हीच सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत असल्याचं ही ते सांगतात. त्यामुळे ही पद्धत फॉलो करावी असं त्यांनी सांगितलं. 

नक्की वाचा - Foods to avoid during Nautapa : नवतपाचा धोका! पुढील 6 दिवसात चुकूनही हे पदार्थ खाऊ नका, उलट होऊ शकतो परिणाम

​अनेक लोक त्वचा तेलकट होऊ नये म्हणून कमी सनस्क्रीन लावतात. डर्मेटोलॉजिस्टनुसार, जर तुम्ही 3 ऐवजी फक्त 2 बोटे सनस्क्रीन लावले, तर त्याचा SPF प्रभाव 25% ने कमी होतो. म्हणजेच, SPF 50 चे संरक्षण घटून SPF 30 इतकेच राहते. जर फक्त 1 बोट सनस्क्रीन लावले, तर त्वचेला केवळ SPF 10 ते 15 इतकेच संरक्षण मिळते. यामुळे अकाली वृद्धत्व आणि पिगमेंटेशन वाढू शकते.

नक्की वाचा - Amruta Fadnavis: अमृता फडणवीस दिसल्या सायकल चालवताना, घेतला मोठा निर्णय, पाहा Video

​सनस्क्रीन केवळ टॅनिंग रोखत नाही तर स्किन बॅरियर मजबूत करते. सनबर्नपासून वाचवते आणि सुरकुत्या कमी करते. रोजच्या वापरासाठी SPF 30 उत्तम आहे. पण जास्त वेळ उन्हात राहणाऱ्यांनी SPF 50 किंवा SPF 60 चा वापर करावा. घराबाहेर पडण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे आधी सनस्क्रीन लावण्याचा सल्ला ते देतात. दर 2 ते 3 तासांनी ते पुन्हा लावावे. कान, मान आणि डोळ्यांच्या बाजूला लावण्यास विसरू नये.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com