Height And Weight Calculation: तुमच्या उंचीनुसार शरीराचे किती वजन असले पाहिजे? डॉक्टरने सांगितले फॉर्म्युला

Height And Weight Calculation: तुमची उंची आणि वजनाचे प्रमाण योग्य आहे की नाही हे मोजण्यासाठी आता कॅल्क्युलेटरची गरज नाही. प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. एस. के. सरीन यांनी पुरुष आणि महिलांसाठी एक सोपा फॉर्म्युला सांगितला आहे, जाणून घ्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Height Weight Chart : उंचीच्या हिशेबाने शरीराचे वजन किती असावे?"
NDTV

Height And Weight Calculation: तुमच्या शरीराचे वजन तुमच्या उंचीनुसार योग्य आहे का? याचा अंदाज लावण्यासाठी नेहमी कॅल्क्युलेटर किंवा चार्ट पाहण्याची गरज नाही. प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. एस. के. सरीन यांनी एनडीटीव्हीशी (NDTV) संवाद साधताना एक सोपी पद्धत सांगितली आहे. ज्याद्वारे कोणतीही व्यक्ती आपल्या शरीराचे वजन किती असावे आणि आपण जाड आहोत की नाही, याचा अंदाज लावू शकते. त्यांचे म्हणणे आहे की हा एक सोपा फॉर्म्युला आहे, जो लोकांना स्वतःच्या वजनावर लक्ष ठेवण्यासाठी प्रवृत्त (इन्स्पायर) करू शकतो. अर्थात कोणत्याही व्यक्तीचे योग्य आणि निरोगी वजन हे तिचे वय, शरीराची ठेवण आणि आरोग्याशी संबंधित स्थितीवरही अवलंबून असते.

काय आहे सोपा फॉर्म्युला?

डॉ. एस. के. सरीन यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीने इयत्ता पाचवीपर्यंतही गणित शिकले असेल, तर ती या फॉर्म्युलाचा वापर सहज करू शकते.

Advertisement

पुरुषांसाठी: उंची (सेंटीमीटरमध्ये) मधून 100 वजा करा. जी संख्या येईल, तेच तुमच्या शरीराचे वजन (किलोग्रॅममध्ये) मानले जाऊ शकते.
उदाहरणार्थ: जर एखाद्या पुरुषाची उंची 160 सेंटीमीटर असेल, तर त्याचे वजन साधारणपणे 60 किलोग्रॅम असायला हवे.
महिलांसाठी: उंची (सेंटीमीटरमध्ये) मधून 105 वजा करा.
उदाहरणार्थ: जर एखाद्या महिलेची उंची 160 सेंटीमीटर असेल, तर तिचे आयडियल वजन साधारणपणे 55 किलोग्रॅम मानले जाऊ शकते.

कुटुंबात आजारांचा इतिहास असल्यास काळजी घ्या

डॉ. सरीन यांनी सांगितले की, जर कुटुंबात आई-वडील, आजी-आजोबा किंवा पणजोबा-पणजी यांच्यापैकी कोणाला डायबेटिस (मधुमेह), हाय ब्लड प्रेशर (उच्च रक्तदाब), हृदयविकार, हाय कोलेस्ट्रॉल किंवा कॅन्सर यासारखे आजार असतील, तर व्यक्तीने आपले वजन आयडियल वजनापेक्षा साधारण 5 किलोग्रॅम कमी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचे असे मत आहे की, यामुळे भविष्यात जीवनशैलीशी (लाइफस्टाइल) संबंधित आजारांचा धोका कमी होण्यास मदत मिळू शकते.

(नक्की वाचा : Uric Acid Control Tips: 'मी फक्त डाळ खातो,तरीही युरिक अ‍ॅसिड का वाढतंय?' जाणून घ्या काय खावे आणि काय टाळावे)

Advertisement

हा केवळ एक सामान्य अंदाज आहे

डॉ. सरीन यांनी हे देखील स्पष्ट केले की, हा फॉर्म्युला केवळ एक सामान्य अंदाज लावण्यासाठी आहे. कोणत्याही व्यक्तीचे आदर्श वजन हे तिचे स्नायू (मसल मास), शरीरातील चरबीचे प्रमाण, वय आणि इतर आरोग्याच्या स्थितीनुसार वेगवेगळे असू शकते. त्यामुळे जर वजनाबाबत काही चिंता असेल किंवा आधीपासूनच एखादा आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच टार्गेट निश्चित करणे अधिक फायदेशीर ठरते.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Topics mentioned in this article