जाहिरात

Google Gemini AI फोटो ट्रेंड बदलला? आता भन्नाट AI VIDEO बनवून सगळ्यांना करा चकीत

Gemini AI Videos: सोशल मीडियावर सध्या ‘रेट्रो साडी AI लुक’ खूप ट्रेंड करत आहे. लोक स्वतःसाठी आणि त्यांच्या पार्टनरसोबतही क्रिएटिव्ह फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत.

Google Gemini AI फोटो ट्रेंड बदलला? आता भन्नाट AI VIDEO बनवून सगळ्यांना करा चकीत
Gemini Photos and Realistic AI Videos

How to make gemini ai video:  इंटरनेटवर दररोज नवनवीन ट्रेंड येत आहेत. नुकतेच Google Gemini वर तयार केलेले फोटो ट्रेंडमध्ये होते. पण आता लोकांनी AI व्हिडीओ बनवायला सुरुवात केली आहे आणि ते सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हा ट्रेंड इतका व्हायरल होत आहे की, अनेकजण ‘रेट्रो साडी लुक'पासून ‘कपल AI व्हिडीयो'पर्यंत विविध प्रकारच्या क्लिप्स तयार करत आहेत.

पूर्वी लोक फक्त जेमिनीवर आपले फोटो अपलोड करून प्रॉम्प्टच्या मदतीने युनिक फोटो तयार करत होते, पण आता त्याचा वापर आणखी पुढे गेला आहे. लोक त्याच फोटोंना घेऊन ‘पिक्सवर्स ॲप'मध्ये (PixVerse App) अपलोड करत आहेत आणि तिथे व्हिडीओ प्रॉम्प्ट वापरून रियलिस्टिक AI व्हिडीओ तयार करत आहेत.

Retro Saree Look ते Couple AI Videos

सोशल मीडियावर सध्या ‘रेट्रो साडी AI लुक' खूप ट्रेंड करत आहे. लोक स्वतःसाठी आणि त्यांच्या पार्टनरसोबतही क्रिएटिव्ह फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. यामध्ये बॉलिवूड स्टाईल डान्सिंग व्हिडीओ आणि 90 च्या दशकातील ग्लॅमरस लूक पुन्हा तयार केले जात आहेत.

(नक्की वाचा- Gemini Photo prompts For Men: मुलांसाठी 15 जबरदस्त प्रॉम्प्ट! कॉपी करा अन् तुमच्या फोटोला द्या स्टायलिश लूक)

AI व्हिडीओ बनवण्याची सोपी प्रक्रिया (How to Make Your Trending AI Video?)

  • गुगल जेमिनीवर फोटो अपलोड करा.
  • प्रॉम्प्ट वापरून तुम्हाला हवी असलेली इमेज तयार करा.
  • आता ही इमेज ‘पिक्सवर्स ॲप'मध्ये अपलोड करा.
  • व्हिडीओ प्रॉम्प्ट पेस्ट करा आणि तुमचा AI व्हिडीओ तयार होईल.

प्रॉम्प्ट चेक करा

A hyper-realistic cinematic scene featuring the uploaded person carefully painting his own figurine at a desk and make direct eye contact with camera . The figurine is standing on a transparent acrylic display base, but its size is larger than usual, making it appear more prominent and almost half the height of the real person. Both the person and the figurine wear the exact same outfit, matching in details. Around the desk, realistic painting tools, brushes, and hobby items are scattered, creating a creative workshop atmosphere. The figurine must look ultra-realistic with lifelike human skin tone, natural facial details, and premium PVC texture. Realistic indoor background, cinematic studio lighting, and sharp details.

(नक्की वाचा- Gemini AI Photos Trend Safety: क्षणाचा आनंद, आयुष्यभर मनस्ताप! जेमिनी ट्रेंड वापरताना काय काळजी घ्यावी?)

(double tap for copy) convert 4k hd realistic, a stunning portrait of a young Indian man with I, dark, wavy hair he is wearing a translucent elegant black kur ta he is looking slightly to his right with a soft serene expression.i want same face as I uploaded on alternation 100 percent same, the background is a plain warm-toned wall illuminated by a warm light source from the right creating a distinct, soft edged shadow of his profile and hair on the wall behind him, the overall mood is retro and artistic

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंड व्हायरल होण्याचे कारण

या ट्रेंडच्या व्हायरल होण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. लोकांना स्वतःला त्यांच्या जुन्या लूकमध्ये किंवा काल्पनिक पात्रांच्या रूपात पाहायला आवडते. यामुळे ‘जेमिनी एआय व्हिडीओ' फक्त एक ट्रेंड न राहता एक व्हायरल रील कंटेंट बनला आहे. ही AI टूल्स वापरण्यास खूप सोपी आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांनाही आपली क्रिएटीव्हिटी दाखवण्याची संधी मिळत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com