जाहिरात

BOSS ला गंडवलं, ऑफिसमध्ये Netflix पाहण्यासाठी कर्मचाऱ्याने केला भन्नाट जुगाड, आजूबाजूच्या कोणालाही कळलंच नाही

ऑफिसमध्ये वेबसिरीज पाहायची आहे.पण बॉसने पाहिले तर? असा अनेक कर्मचाऱ्यांना पडत असेल. पण बंगळुरूतील एका टेक्नॉलॉजी एक्सपर्टला बॉसची अजिबातच भीती नाहीय. बॉस काहीच करणार नाही,असं ध्यानी मनी ठेऊन या कर्मचाऱ्याने ऑफिसमध्ये वेब सीरिज पाहण्यासाठी भन्नाट जुगाड केला.

BOSS ला गंडवलं, ऑफिसमध्ये Netflix पाहण्यासाठी कर्मचाऱ्याने केला भन्नाट जुगाड, आजूबाजूच्या कोणालाही कळलंच नाही
Netflix Web series Jugaad Viral News

Office Jugaad Viral Post :  ऑफिसमध्ये वेबसिरीज पाहायची आहे.पण बॉसने पाहिले तर? असा अनेक कर्मचाऱ्यांना पडत असेल. पण बंगळुरूतील एका टेक्नॉलॉजी एक्सपर्टला बॉसची अजिबातच भीती नाहीय. बॉस काहीच करणार नाही,असं ध्यानी मनी ठेऊन या कर्मचाऱ्याने ऑफिसमध्ये वेब सीरिज पाहण्यासाठी भन्नाट जुगाड केला. या टेक्नोलॉजी एक्सपर्टने अशी एआय डिव्हाइस तयार केली आहे की, जी बॉस दिसताच स्क्रीन बदलून टाकते. त्यामुळे बॉसला कधीच कळत नाही की, कर्मचारी ऑफिसमध्ये काम करत नव्हता. तो कामात व्यस्त आहे, असंच त्याच्या बॉसला वाटतं. 

एक्सवर पोस्ट करत जुगाडाचा खुलासा केला

नेटफ्लिक्सवरील आवडती वेबसिरीज एकदा पाहायला सुरुवात केली की ऑफिसमध्ये पोहोचल्यावरही मन तिथेच अडकून राहतं. पण ऑफिसचं वातावरण,कामाचा दबाव आणि बॉसची कडक नजर यामुळे तिथे बसून एंटरटेनमेंट करणं शक्य नसतं.यावर उपाय म्हणून बंगळुरूतील एका तंत्रज्ञाने एक भन्नाट जबरदस्त आयडिया शोधून काढली आहे. बंगळुरूमध्ये काम करणाऱ्या या व्यक्तीने एक्सवर पोस्ट करत त्याने केलेल्या जुगाडाचा खुलासा केला आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलंय की, नेटफ्लिक्स पाहताना बॉसने एकदा त्याला रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतरच या डिव्हाइसची कल्पना सुचली.

नक्की वाचा >> Gk News : फायटर जेटमध्ये पॅराशूट असतं, पण पॅसेंजर प्लेन किंवा प्रायव्हेट जेटमध्ये पॅराशूट का नसतं? 

हे डिव्हाइस आसपासच्या लोकांवर लक्ष ठेवतं

हे डिव्हाइस चेहर्याची ओळख (Face Detection) करू शकते. बॉसचा चेहरा दिसला की ते लगेच स्क्रीन कामाच्या मोडमध्ये बदलते. जेव्हा हा टेक्नॉलॉजी एक्सपर्ट स्वतः एंटरटेनमेंटचा डोस घेत असतो, तेव्हा ही डिव्हाइस आसपासच्या लोकांवर लक्ष ठेवतं. पोस्टमध्ये त्याने या डिव्हाइसचा आणि बॉसचा फोटोही शेअर केला आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर लोकांनी या कर्मचाऱ्याचे खूप कौतुक केले आहे. एका युजरने मजेशीरपणे विचारलं की, "बॉसला हे दिसणार नाही का?"

नक्की वाचा >>  Pan Card : हरवलंय की चोरी झालंय पॅनकार्ड? असं करा ऑनलाईन प्रिंटिंग, 'ही' आहे सर्वात सोपी प्रोसेस

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com