Acidity Home Remedies: अ‍ॅसिडिटीसाठी अँटासिड घेताय? काय करावे आणि काय टाळावे? डॉ. पै यांनी सांगितले सीक्रेट

Acidity Home Remedies: अ‍ॅसिडिटी, छातीत जळजळ आणि आंबट ढेकरांनी त्रस्त आहात का? केवळ गोळ्या न खाता आहारात योग्य बदल करून पित्त कायमचे नियंत्रणात कसे ठेवावे, हे आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. रुचा पै यांच्याकडून जाणून घ्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Acidity Home Remedies: अ‍ॅसिडिटी आणि छातीत जळजळ होणे कायमचे होईल बंद! आजच आहारात करा 'हे' बदल"
Gemini AI And Canva

Acidity Home Remedies: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि बिघडलेल्या आहाराच्या सवयींमुळे अ‍ॅसिडिटी, छातीत जळजळ आणि आंबट ढेकर येणे यासारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. बहुतांश लोक यावर तात्पुरता उपाय म्हणून अँटासिड औषधांचा मारा करतात. पण प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. रुचा पै यांच्या मते, केवळ औषधांवर अवलंबून न राहता रोजच्या आहारातील चुका सुधारणे हाच आम्लपित्तावर कायमस्वरूपी मात करण्याचा खरा मार्ग आहे. ज्वारीची भाकरी, मूग डाळ, दुधी भोपळा यासारखे थंड आणि पचायला हलके पदार्थ पित्त शांत ठेवतात तर आलं-लसूण, तिखट, तेलकट आणि तुरीची डाळ यामुळे त्रास वाढू शकतो. म्हणूनच अ‍ॅसिडिटीपासून मुक्ती मिळवण्यासाठी योग्य आहार आणि दैनंदिन दिनचर्येचे नियोजन करणे गरजेचे आहे.

डॉ. रुचा पै यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये नेमके काय म्हटलंय? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

अ‍ॅसिडिटीसाठी फक्त औषधं घेताय... पण रोजच्या आहारात या चुका करताय का?

आम्लपित्त कमी करायचं असेल तर डाएटमध्ये ज्वारीची भाकरी, मूग डाळ, दुधी भोपळा, भरपूर कोशिंबीर, ताक आणि मखाणा यांचा आहारात समावेश करा. पण हे पदार्थ शक्यतो टाळा शेंगदाणे, मेथी, आलं-लसूण पेस्ट, बेसन, पुरणपोळी, तुरीची डाळ, तिखट, तेलकट आणि पाकिटबंद पदार्थ कमी खा.

Advertisement

अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी करावे?

  • सकाळची सुरुवात धन्याचे पाणी किंवा भिजवलेल्या काळ्या मनुका खाऊन करा.
  • नाश्त्यामध्ये उपमा, दलिया, मूग डाळ चिला किंवा मखाणा निवडा.
  • मधल्या वेळेत एक गोड फळ खा.
  • दुपारच्या जेवणाआधी छोटा गुळाचा तुकडा खा. 
  • त्यानंतर ज्वारीची भाकरी, भाजी, मूग डाळ, भरपूर कोशिंबीर खा. 
  • शेवटी एक ग्लास ताक प्या.
  • संध्याकाळी मखाणा, काकडी किंवा उकडलेले रताळं खाऊ शकता. 
  • रात्रीच्या जेवणात ज्वारीची भाकरी किंवा फुलका, हलकी भाजी, मूग डाळ, मुगाची खिचडी, कोशिंबीर आणि थोडं तूप घेऊ शकता. 

(नक्की वाचा: Sabudana Benefits: साबूदाणा खरंच हेल्दी आहे का? कॅलरी, प्रोटीन, फायबरचे प्रमाण किती असते? ब्लड शुगर-वजनावर काय होतो परिणाम)

टीप - झोपण्याच्या किमान दोन ते तीन तास आधी रात्रीचे जेवण पूर्ण करा.

भाज्यांचे उत्तम पर्याय

  • दुधी भोपळा
  • घोसाळे
  • दोडका
  • पडवळ
  • लाल भोपळा
  • पांढरा भोपळा
  • तोंडली
  • गाजर
  • बीट (मर्यादित प्रमाणात) 
  • काकडी 
  • सुरण (मर्यादित प्रमाणात) 
  • माठ
  • चाकवत

(नक्की वाचा: Viral Trend: इंटरनेटवरील नवा खतरनाक Trend, वेटलॉससाठी चहामध्ये 'हे' केलं जातंय मिक्स, 2 दिवसांत 4 Kg वजन घटेल?)

मर्यादित प्रमाणात

  • पालक
  • शेवग्याच्या शेंगा
  • हिरवे वाटाणे (शक्यतो टाळा)
  • वांगी
  • टोमॅटो (जास्त प्रमाणात)
  • फ्लॉवर 
  • कोबी
  • सिमला मिरची
  • जास्त कांदा-लसूण घातलेल्या भाज्या
  • खूप तिखट किंवा मसालेदार भाज्या
  • शेंगदाण्याचा कुट घातलेल्या भाज्या

आम्लपित्तात काय टाळावे?

  • तिखट पदार्थ
  • फास्ट फुड
  • चहा/ कॉफी
  • मद्यपान
  • दही आणि तेलकट पदार्थ
  • दिवसाची झोप

या सवयींमुळे पित्त आणि अ‍ॅसिडिटी दोन्ही वाढू शकतात.
सतत अ‍ॅसिडिटी होत असेल तर फक्त अँटासिडवर अवलंबून राहू नका.

डॉ. रुचा पै यांनी शेअर केलेली पोस्ट वाचा

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)