जाहिरात

Viral Trend: इंटरनेटवरील नवा खतरनाक Trend, वेटलॉससाठी चहामध्ये 'हे' केलं जातंय मिक्स, 2 दिवसांत 4 Kg वजन घटेल?

Weight Loss Viral Trend: चीनमधील सोशल मीडियावर 2 दिवसांत 4 किलो वजन कमी करण्याचा एक विचित्र आणि जीवघेणा ट्रेंड व्हायरल होत आहे.

Viral Trend: इंटरनेटवरील नवा खतरनाक Trend, वेटलॉससाठी चहामध्ये 'हे' केलं जातंय मिक्स, 2 दिवसांत 4 Kg वजन घटेल?
"Weight Loss Viral Trend: दोन दिवसांत 4 Kg वजन होतेय कमी?"
Canva And Gemini AI प्रतिकात्मक फोटो

Weight Loss Viral Trend: रातोरात स्लिम होण्याचे फॅड लोकांसाठी कसे जीवघेणे ठरू शकते, याचे उदाहरण सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. चीनमध्ये सोशल मीडियावर सध्या एक विचित्र प्रयोग वेगाने व्हायरल होत आहे, या ट्रेंडच्या जाळ्यात अनेक तरुण अडकले आहेत. काही इन्फ्लुएन्सर्स चहामध्ये ग्लिसरीन एनीमा म्हणजेच बद्धकोष्ठतेची समस्या दूर करणारे औषध मिक्स करून पित आहेत. हे औषध प्यायल्याने अवघ्या दोन दिवसांत चार किलोग्रॅमपर्यंत वजन कमी होऊ शकते, असा दावाही केला जात आहे. हे औषध प्यायल्याने लोकांना वारंवार टॉयलेटच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: pexels

(नक्की वाचा : Hand Numbness Causes: तुमच्याही हात-पायांना मुंग्या येतात का? कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे निर्माण होते ही समस्या)

2 दिवसांत वजन घटवणारा जीवघेणा प्रयोग (Dangerous Weight Loss Trend In China)

चहामध्ये पोट स्वच्छ करणारे औषध मिक्स करून पिण्याचा हा अजब ट्रेंड सध्या चीनमधील तरुणाईवर भारी पडत आहे. दोन दिवसांत चार किलो वजन कमी करण्याच्या या नादात अनेक लोक थेट हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वार्डमध्ये पोहोचले आहेत. 'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या (SCMP) माहितीनुसार, हा ट्रेंड फॉलो केल्यानंतर अनेक लोकांची प्रकृती गंभीर झाली. 'मा' नावाच्या एका महिलेने सांगितले की,"जसे हे ड्रिंक प्यायले, अर्ध्या तासातच तिच्या पोटात गोळा आला आणि वेदना सुरू झाल्या. तिला रात्रभर उलट्या आणि जुलाब झाले, ज्यामुळे ती रात्रभर झोपू शकली नाही."

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: pexels

चरबी नव्हे तर फक्त शरीरातील पाणी होतेय कमी (Experts Advice On Extreme Weight Loss)

तर दुसरीकडे या ट्रेंडवर हेनान प्रांतातील एका मोठ्या रुग्णालयाने सांगितले की, "धोकादायक प्रयोगांमुळे अनेक रुग्णांना गंभीर अवस्थेत इमर्जन्सीमध्ये दाखल करावे लागले आहे." तसेच या विषयावर न्युट्रिशनिस्ट्सचे म्हणणे आहे की, "हा प्रयोग आरोग्यासाठी हानिकारक आणि धोकादायक आहे. एनीमा हे फक्त बाह्य वापरासाठी असते, ते प्यायल्याने आतड्यांना थेट इजा पोहोचू शकते."

डॉक्टरांच्या मते, "यामुळे शरीरातील चरबी (Fat) कमी होत नाही तर डिहायड्रेशनमुळे वजन घटल्यासारखे वाटते. पाणी प्यायल्याने वजन पुन्हा वेगाने वाढू लागते आणि गॅस्ट्रिक ग्लँड्सवर वाईट परिणाम होऊ शकतो."

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.) 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com