सोशल मीडियावर अनेकदा आपण व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या गाड्या पाहतो आणि असे नंबर सर्वांनाचा मिळत नाहीत, असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र सामान्य नागरिकही विशिष्ट शुल्क भरून असे आकर्षक नंबर त्यांच्या कार किंवा बाईकसाठी मिळवू शकतात. यासाठी त्यांना काही अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतात.
तुम्ही व्हीआयपी नंबर कसा मिळवू शकता?
जेव्हा तुम्ही नवीन गाडी खरेदी करता आणि आरटीओ (RTO) शुल्क भरता, तेव्हा गाडीला आपोआप एक नंबर दिला जातो. जर तुमचे नशीब चांगले असेल, तर तुम्हाला 7776, 0011, 1101 किंवा 1010 असे आकर्षक नंबर अतिरिक्त शुल्क न भरता मिळू शकतात. मात्र, तुम्हाला एखादा विशिष्ट व्हीआयपी नंबर हवा असल्यास, त्यासाठी निश्चित किंमत चुकवावी लागते.
फॅन्सी नंबरसाठी किती खर्च येतो?
कार किंवा बाईकसाठी फॅन्सी नंबर प्लेट मिळवण्याचा खर्च प्रत्येक राज्यात वेगवेगळा असतो. नोंदणी शुल्काव्यतिरिक्त, फॅन्सी नंबर बुक करण्यासाठी किंवा त्याच्या लिलावात सहभागी होण्यासाठी तुम्हाला राखीव किंमत देखील भरावी लागते. फॅन्सी नंबर मिळवण्याचे ई-लिलाव प्रक्रिया किंवा 'आधी येईल त्याला प्राधान्य' असे दोन पर्याय आहेत.
(नक्की वाचा- VIDEO: लोकल ट्रेनमध्ये सीटच्या वादातून महिलेने मारला पेपर स्प्रे; त्यानंतर महिला प्रवाशांनी...)
- 'सुपर एलिट' नंबर (0001): हा नंबर 'सुपर एलिट' मानला जातो आणि त्याची किंमत सुमारे 5 लाख रुपये असते.
- सिंगल-डिजिट नंबर (0002 ते 0009): या नंबरची किंमत साधारण 3 लाख रुपये आहे.
- सर्वाधिक मागणी असलेले नंबर (0786, 1111, 7777, 9999 आणि 0010 ते 0099 दरम्यानचे नंबर): हे नंबर साधारण 2 लाख रुपयांना मिळतात.
- सेमी फॅन्सी नंबर (उदा. 0100, 0111, 0200, 0222, 0300, 0333, 0400, 0444, 0500, 0555, 0600, 0666, 0700, 0777, 0800, 0888, 0900, 0999, 2000, 2222, 3000, 3333, 4000, 4444, 5000, 5555, 6000, 6666, 7000, 8000, 8888, 9000, 0101, 0108, 1008, 1313): या नंबरसाठी साधारण 1 लाख रुपये खर्च येतो.
(नक्की वाचा- Check Your PF Balance: मिस कॉल द्या अन् पीएफ बॅलेन्स तपासा! 'हा' नंबर सेव्ह करून ठेवा)
फॅन्सी नंबर मिळवण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (MoRTH) अधिकृत वेबसाइटवर, म्हणजेच parivahan.gov.in येथे जा.
- तुम्ही नवीन युजर असाल तर साइन अप करा, त्यानंतर तुमच्या क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा.
- 'ऑनलाइन सर्व्हिस' अंतर्गत 'फॅन्सी नंबर बुकिंग' वर क्लिक करा.
- तुमचे राज्य आणि आरटीओ कोड टाका.
- तुम्हाला हवा असलेला नंबर शोधा किंवा उपलब्ध पर्याय ब्राउझ करा.
- आवश्यक शुल्क भरा आणि तुम्हाला शोरूमच्या सेल्समनला देण्यासाठी एक कोड मिळेल.
- या प्रक्रियेद्वारे कोणताही सामान्य नागरिक आपल्या गाडीसाठी आकर्षक आणि पसंतीचा नंबर मिळवू शकतो.