Vitamin D Foods: कोवळ्या उन्हाशिवाय शरीराला कसं मिळणार व्हिटॅमिन डी? डाएटमध्ये या 3 गोष्टींचा करा समावेश

Vitamin D Food: शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास केवळ कोवळ्या उन्हावर अवलंबून राहण्याची गरज नाही. डाएटमध्ये या चार गोष्टींचा आवर्जून समावेश करा.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Vitamin D Foods: डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?"
Canva
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • व्हिटॅमिन डीचा मुख्य स्रोत सूर्यप्रकाश असूनही, फॅटी फिश आणि अंड्याच्या पिवळ्या बलकमधूनही ते मिळू शकतो
  • शाकाहारी लोकांसाठी मशरूम आणि फोर्टिफाइड दूध किंवा प्लांट बेस्ड मिल्क हे व्हिटॅमिन डीचे उपयुक्त पर्याय आहेत
  • कोवळ्या उन्हाशिवाय व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी संतुलित आहार, थोडेसे सूर्यप्रकाश आणि सक्रिय जीवनशैली आवश्यक आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Vitamin D Food: व्हिटॅमिन डीचा संबंध सहसा सकाळच्या कोवळ्या उन्हाशी जोडला जातो, पण जर तुमच्या शरीराला रोज पुरेशा प्रमाणात कोवळे ऊन मिळत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. तज्ज्ञांच्या मते, काही अन्नपदार्थांच्या माध्यमातून शरीराला व्हिटॅमिन डीचा पुरवठा होऊ शकतो. फॅटी फिश, अंड्याचे बलक, मशरूम आणि फोर्टिफाइड फुड्स हे व्हिटॅमिन डीचे चांगले स्रोत मानले जातात. चला तर मग जाणून घेऊया कोवळे ऊन न मिळाल्यास आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.

शरीराला कोवळे ऊन मिळत नसेल तर व्हिटॅमिन डी कसे मिळणार? | व्हिटॅमिन डीयुक्त 4 खाद्यपदार्थ

1. फॅटी फिशमधून व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात मिळू शकते 

जर तुम्ही मांसाहारी असाल तर सॅल्मन, सार्डिन आणि मॅकेरल यासारखे मासे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. यामध्ये व्हिटॅमिन डी सोबतच ओमेगा-3 फॅटी ॲसिड देखील असते, जे हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. तज्ज्ञांच्या मते नियमित आणि संतुलित प्रमाणात याचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होऊ शकते.

Advertisement

2. अंड्याचे बलक 

अनेक लोक अंड्याचा फक्त पांढरा भाग खातात पण व्हिटॅमिन डीचा मोठा भाग अंड्याच्या पिवळ्या बलकमध्ये (Yolk) असतो. कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी नसेल तर पूर्ण अंडे खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते. 

(नक्की वाचा: High Uric Acid: हाय युरिक ॲसिड समस्या असल्यास डाळ खावी की नाही? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला)

3. मशरूम आणि फोर्टिफाइड फुड्स  

जर तुम्ही शाकाहारी असाल तर मशरूम हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. विशेषतः अतिनील किरणांच्या (UV Light) प्रकाशात तयार झालेल्या मशरूममध्ये व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात आढळते. याशिवाय विविध प्रकारचे दूध, प्लांट बेस्ड मिल्क (वनस्पतीजन्य दूध) आणि ब्रेकफास्ट सीरियल्सचाही डाएटमध्ये समावेश करू शकता.  

केवळ खाद्यपदार्थांवर पूर्णपणे अवलंबून राहू नका

जर शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता खूप जास्त असेल तर केवळ खाद्यपदार्थांवर अवलंबून राहून फायदा नाही. अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करणे आणि गरज पडल्यास सप्लीमेंट्स घेणे योग्य ठरते. तज्ज्ञांच्या मते संतुलित आहार, थोडेसे ऊन आणि सक्रिय जीवनशैली फॉलो केल्यास शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी चांगली राखण्यास मदत करतात.

(नक्की वाचा: Alcohol Heart Attack Risk: रोज 1 ग्लास दारू पिणंही पडेल महाग, हृदयाची धडधड होईल बंद अन्... रीसर्चमधील धक्कादायक खुलासा)

Advertisement

FAQs

1. सूर्यप्रकाशाशिवाय व्हिटॅमिन डी मिळू शकते का?

उत्तर: होय! फॅटी फिश, अंड्याची जर्दी, मशरूम आणि फोर्टिफाइड फुड्स यासारखे काही अन्नपदार्थाद्वार व्हिटॅमिन डी मिळू शकते.

2. शाकाहारी लोकांनी व्हिटॅमिन डीसाठी काय खावे?

उत्तर: मशरूम आणि व्हिटॅमिन डीद्वारे फोर्टिफाइड दूध किंवा प्लांट बेस्ड ड्रिंक्स हे चांगले पर्याय असू शकतात.

3. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची सामान्य लक्षणे काय आहेत?

उत्तर: थकवा, अशक्तपणा, हाडे दुखणे आणि वारंवार आजारी पडणे  

4. काय केवळ खाण्याने व्हिटॅमिन डीची कमतरता भरून निघू शकते?

उत्तर: जर व्हिटॅमिन डीची कमतरता गंभीर असेल तर डॉक्टर सप्लीमेंट्स किंवा अन्य औषधोपचारांचा सल्ला देऊ शकतात.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)


Topics mentioned in this article