नैसर्गिक की केमिकलयुक्त धोकादायक केळ? खरेदीपूर्वी 6 ट्रिक्सद्वारे ओळखा फरक, 10 सेकंदाचा फॉर्म्युला येईल कामी

How to Identify Carbide Bananas: केमिकलने पिकवलेली केळी कशी ओळखावी? कार्बाईड आणि इतर रसायनांचा वापर करून पिकवलेली केळी आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात. 10 सेकंदात नैसर्गिक आणि केमिकलयुक्त केळ्यांमधील फरक ओळखण्याच्या सोप्या टिप्स जाणून घ्या...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Chemical Banana Test: केमिकलने पिकवलेली केळी कशी ओळखावी?"
AI Image

How to Identify Carbide Bananas: आजकाल बाजारात मिळणारे प्रत्येक पिवळे फळ आरोग्यासाठी चांगले असेलच असे नाही.  गुळगुळीत, चमकदार आणि पिवळ्या रंगाचे फळ ग्राहकांना आकर्षित करतात, पण त्यामागील सत्य थोडे भीतीदायक असू शकते. वाढती मागणी आणि लवकर नफा कमावण्याच्या नादात अनेक व्यापारी फळे नैसर्गिकरीत्या नाही, तर केमिकल वापरून पिकवू लागले आहेत. अशी केळी बाहेरून तर परफेक्ट दिसतात, पण आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केमिकलयुक्त फळांची ओळख पटवणे सोपे नसते. पण जर तुम्ही काही छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले, तर अवघ्या 10 सेकंदात तुम्ही अस्सल आणि बनावट (केमिकलवाल्या) केळ्यांमधील फरक समजू शकता, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

बाजारात मिळणारे 3  प्रकारची पिकलेली केळी | Three Types of Ripe Bananas Are Sold in the Market

बाजारात मिळणारी केळी तीन वेगवेगळ्या पद्धतींनी पिकवली जातात आणि प्रत्येक पद्धतीचा आरोग्यावर होणारा परिणामही वेगळा असतो.

1. पारंपरिक पद्धत (लाकडाच्या उष्णतेने)

केळी पिकवण्याची ही सर्वात जुनी आणि नैसर्गिक पद्धत आहे. या प्रकारात कच्ची केळी एका बंद खोलीत ठेवून लाकूड जाळून तापमान वाढवले जाते. कधीकधी हळद किंवा अन्य घरगुती उपायही वापरले जातात. ती खोली काही काळासाठी बंद ठेवली जाते, ज्यामुळे केळी हळूहळू पिकतात.

Advertisement

2. केमिकलने पिकवलेले केले (सर्वात धोकादायक)

ही पद्धत आजकाल मोठ्या प्रमाणात वापरली जात असून ती आरोग्यासाठी सर्वात हानिकारक आहे. एका कंटेनरमध्ये केमिकलचे द्रावण तयार केले जाते, त्यात कच्ची केळी बुडवली जातात आणि काही वेळातच हिरव्या केळ्यांचे पिवळ्या रंगामध्ये रुपांतर होते.

Photo Credit: Unsplash

3. रिपेनिंग चेंबर (सर्वात सुरक्षित पद्धत)

ही एक शास्त्रीय आणि आधुनिक पद्धत आहे. यात नियंत्रित तापमानामध्ये केळी ठेवली जातात. इथिलीन गॅसच्या मदतीने नैसर्गिक प्रक्रियेचे अनुकरण करून केळी पिकवली जातात. 

Photo Credit: NDTV Marathi

10 सेकंदांचा फॉर्म्युला: अशी ओळखा केमिकलने पिकवलेली केळी?

1. केळ्याचा देठ तपासा: जर केळ बाहेरून पूर्ण पिवळ्या रंगाचे आणि त्याचे देठ हिरव्या रंगाचे असेल तर सावध व्हा. हे केमिकलने पिकवलेले असू शकते.
2. रंगाकडे लक्ष द्या: अतिशय चमकदार आणि एकसमान पिवळा रंग जर नैसर्गिक वाटत नसेल, तर त्यात केमिकल असण्याची शक्यता असते.
3. काळे डाग पाहा: नैसर्गिकरित्या पिकवलेल्या केळ्यावर छोटे-छोटे काळे ठिपके असतात. केमिकलवाल्या केळ्यांवर हे डाग कमी किंवा अजिबात नसतात.
4. सुगंध: नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळ्याचा हलका गोड सुवास येतो, तर केमिकलवाल्या केळ्यांना कोणताही सुवास नसतो किंवा विचित्र वास येतो.
5. चव: जर केळ्याची चव बेचव किंवा विचित्र लागत असेल, तर काहीतरी गडबड आहे असे समजावे.
6. लवकर खराब होणे: केमिकलने पिकवलेली केळी लवकर काळी पडतात किंवा लवकर सडतात.

(नक्की वाचा: Milk Packet Color Code: दुधाच्या पिशवीवर निळा, हिरवा आणि नारिंगी रंग का असतो? 99% लोकांना माहिती नसणार कलर कोडचं गुपित)

Advertisement

सर्वात जास्त हानिकारक कोणते?

केमिकलने पिकवलेली केळी आरोग्यासाठी सर्वाधिक घातक ठरू शकतात. ही केळी बाहेरून आकर्षक दिसली तरी आतून कच्ची आणि विषारी असू शकतात. सतत अशी फळे खाल्ल्याने पोट, पचनसंस्था आणि एकूणच आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.

(नक्की वाचा: Stale Dough Side Effects: सावधान! फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठाची पोळी खाताय? पोषणतत्त्व नाही, पोटात हे विष जातंय)

आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, म्हणून काय करावे? 

  • खूप जास्त चमकदार आणि हुबेहूब दिसणारी केळी खरेदी करणे टाळा.
  • हलक्या स्वरुपातील डाग असलेली केळी अधिक नैसर्गिक असतात.
  • स्थानिक किंवा विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच फळे खरेदी करा.
  • हंगामाप्रमाणे मिळणारीच फळे प्राधान्याने खरेदी करा.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )