How To Increase Hemoglobin: हल्ली बहुतांश लोकांमध्ये रक्ताच्या कमतरतेची समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. तुम्हालाही खूप लवकर थकवा जाणवतो का? थोडेसे काम केले तरी चक्कर आल्यासारखे वाटते? केस मोठ्या प्रमाणात गळतात का? जर या सर्व प्रश्नांची उत्तरं हो असतील तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण ही सर्व शरीरात हिमोग्लोबिनची (Hemoglobin) कमतरता असण्याची लक्षणे आहेत. हिमोग्लोबिन हे आपल्या रक्तातील तांबड्या पेशींमध्ये (Red Blood Cells) आढळणारे असे प्रोटीन (प्रथिन) आहे, जे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते.
जेव्हा शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते, तेव्हा शरीराला योग्य प्रकारे ऑक्सिजन मिळत नाही आणि आपल्याला सतत सुस्तपणा किंवा आजारी असल्यासारखे वाटते. सुरुवातीला लोक याकडे लक्ष देत नाहीत; पण आहारात थोडासा बदल करून तुम्ही ही समस्या सहजपणे दूर करू शकता. न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांच्या माहितीनुसार, हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी केवळ लोहचे पुरेसे नाही. त्यासोबत शरीराला व्हिटॅमिन B12 (Vitamin B12) आणि फोलेटची (Folate/B9) देखील गरज असते, जेणेकरून निरोगी लाल रक्तपेशी तयार होऊ शकतील.
शरीराला आवश्यक असलेले 3 खास न्युट्रिएंट्स (पोषक तत्त्वे):
- लोह (Iron): हिमोग्लोबिन तयार करण्याचा मुख्य भाग
- व्हिटॅमिन B12: दही, पनीर आणि दूध यासारख्या दुग्धजन्य पदार्थांद्वारे मिळते.
- फॉलेट (B9): डाळी आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये हे मुबलक प्रमाणात आढळते.
लोहयुक्त 7 देशी अन्नपदार्थ (Here Is 7 Hemoglobin Rich Foods)
1. अळीव बिया (Haleem Seeds ):
अळिवाच्या बियांमध्ये लोहाचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. केवळ एक लहान चमचा अळिवाच्या बियांमध्ये जवळपास 5 mg लोह मिळते.
कसे करावे सेवन: 1 अळिवाच्या बिया रात्रभर लिंबाच्या पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी प्या.
2. शेवग्याची पाने (Moringa Leaves):
शेवग्याच्या पानांमध्ये लोहासोबतच व्हिटॅमिन सी (Vitamin C) मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे शरीर सहजपणे लोह शोषून घेऊ शकते.
कसे करावे सेवन: शेवग्याची ताजी पाने किंवा शेवग्याच्या पानांची पावडर तुमच्या रोजच्या डाळीत मिसळून खाऊ शकता.
3. काळे तीळ:
काळ्या तिळात लोहासोबत कॉपर (तांबे) देखील असते, जे रक्ताच्या नवीन पेशी तयार करण्यास मदत करते.
कसे करावे सेवन: एक चमचा भाजलेले काळे तीळ तुमच्या पोळीवर किंवा पराठ्यावर पेरून खाऊ शकता.
(नक्की वाचा: Hand Numbness Causes: तुमच्याही हात-पायांना मुंग्या येतात का? कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे निर्माण होते ही समस्या)
4. बाजरीची भाकरी:
लोहाचा उत्तम स्त्रोत म्हणजे बाजरी.
कसे करावे सेवन: गव्हाच्या पोळीच्या ऐवजी बाजरीच्या भाकरीचा तुम्ही डाएटमध्ये समावेश करू शकता.
5. मसूर डाळ:
मसुराच्या डाळीमध्ये लोह आणि फॉलेट दोन्ही आढळतात.
कसे करावे सेवन: मसुराची डाळ शिजवून त्यात थोडासा लिंबाचा रस पिळून खा.
6. राजगिरा:
हे धान्य पूर्णपणे ग्लुटेन-फ्री (Gluten-free) असते आणि लोहाचे प्रमाण जास्त असते.
कसे करावे सेवन: नाश्तामध्ये लापशी, लाडू किंवा राजगिऱ्याची भाकरी खाऊ शकता.
(नक्की वाचा: आरोग्यासाठी हे 5 कुकिंग ऑइल सर्वात हानिकारक, तुम्हीही हेच जेवणात वापरताय? डॉ. साळुकेंनी सांगितला धोका)
7. काळे चणे:
काळ्या चण्याद्वारे शरीराला लोह आणि प्रोटीनचा पुरवठा होतो.
कसे करावे सेवन: मोड आलेले काळे चणे किंवा शिजवलेल्यांपासून चणा चाट तयार करून खाऊ शकता.
3 गोल्डन्स रूल्स (Golden Rules)
1. व्हिटॅमिन सी: वनस्पतींपासून मिळणारे लोह पचवण्यासाठी लिंबू, आवळा किंवा कच्चा आंबा यासारख्या व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांची गरज असते.
2. चहा/कॉफीपासून एक ते दोन तासांचे अंतर ठेवा: जेवणाच्या अगदी आधी किंवा लगेच नंतर चहा, कॉफी किंवा दूध पिऊ नका. यामध्ये असलेले टॅनिन आणि कॅल्शियम लोहचे शोषण रोखतात.
3. कडधान्य भिजवून आणि मोड आणून खा: धान्य, बिया आणि डाळी भिजवल्याने त्यातील फायटेट्स कमी होतात, ज्यामुळे पोषक तत्त्वे शरीरात योग्य प्रकारे पचतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world