जाहिरात

Secret Tips: महिनाभर लिंबू ताजे ठेवण्याच्या भन्नाट 'सीक्रेट ट्रिक', 90 टक्के लोकांना माहितच नाही

या सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही लिंबांची नासाडी टाळू शकता.

Secret Tips: महिनाभर लिंबू ताजे ठेवण्याच्या भन्नाट 'सीक्रेट ट्रिक', 90 टक्के लोकांना माहितच नाही
  • उन्हाळ्यात लिंबू फ्रीजमध्ये थेट ठेवल्यास त्यातील ओलावा कमी होऊन ते कडक आणि सुकतात
  • लिंबू ताजे ठेवण्यासाठी झिप लॉक बॅग किंवा एअरटाइट कंटेनरमध्ये हवा बंद ठेवणे आवश्यक आहे
  • लिंबू एका पाण्याच्या भांड्यात बुडवून फ्रीजमध्ये ठेवल्यास ते महिनाभर ताजे राहतात
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

How to Keep Lemons Fresh Longer: उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू ही प्रत्येक घराची गरज असते. सरबत, कोशिंबीर किंवा जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण लिंबू वापरतो. मात्र, अनेकदा लिंबू फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काही दिवसांतच ते कडक होतात किंवा सुकतात. 90 टक्के लोकांना लिंबू स्टोअर करण्याची योग्य पद्धत माहित नसते. जर तुम्हीही लिंबू थेट फ्रीजच्या ट्रेमध्ये ठेवत असाल, तर तुम्ही मोठी चूक करत आहात. लिंबू दीर्घकाळ रसरशीत ठेवण्यासाठी काही खास टिप्स  आहेत. त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर लिंब महिनाभर चांगले राहतात. अनेकांना या टिप्स माहितच नसतात. 

लिंबू का सुकतात?
लिंबामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. जेव्हा ते उघड्यावर किंवा थेट फ्रीजमध्ये ठेवले जातात, तेव्हा फ्रीजमधील थंड आणि कोरड्या हवेमुळे त्यातील ओलावा कमी होतो. यामुळे लिंबाची साल कडक होते आणि त्यातील रस सुकू लागतो.

ताजे ठेवण्याच्या प्रभावी पद्धती
एअरटाइट कंटेनर किंवा झिप लॉक बॅग: लिंबू कधीही मोकळे न ठेवता ते प्लास्टिकच्या झिप लॉक बॅगमध्ये किंवा हवा बंद डब्यात ठेवावेत. यामुळे त्यातील आर्द्रता टिकून राहते.

नक्की वाचा - Pocket AC: एसीची गरज नाही! गळ्यात घाला 'हे' खास डिव्हाइस, उन्हात मिळेल गारेगार अनुभव, पाहा किंमत

पाण्याचा वापर: एका काचेच्या बरणीत पाणी भरून त्यात लिंबू बुडवून ठेवा आणि ही बरणी फ्रीजमध्ये ठेवा. या पद्धतीमुळे लिंबू महिनाभर ताजे राहतात.

पेपर टॉवेल ट्रिक: लिंबू पेपर टॉवेल किंवा कागदात गुंडाळून ठेवल्यास त्यातील जास्तीचा ओलावा शोषला जातो आणि लिंबू सडत नाहीत.

अर्ध्या कापलेल्या लिंबासाठी: कापलेले लिंबू कधीही उघड्यावर ठेवू नका. ते एका लहान डब्यात ठेवा किंवा ज्या बाजूने कापले आहे ती बाजू खालच्या दिशेला करून ठेवा.

उन्हाळ्यात लिंबाचे भाव गगनाला भिडलेले असताना ते योग्यरीतीने साठवणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा गृहिणी लिंबू विकत आणल्यानंतर ते थेट फ्रीजमध्ये ठेवतात, परिणामी ते काही दिवसांतच वाळून जातात. लिंबाचा रस आणि ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी ते एअरटाइट डब्यात किंवा कागदात गुंडाळून ठेवणे फायदेशीर ठरते. विशेषतः अर्धे कापलेले लिंबू साठवण्यासाठी ते एखाद्या लहान भांड्यात पालथे करून ठेवल्यास ते काळे पडत नाहीत. या सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही लिंबांची नासाडी टाळू शकता.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com