जाहिरात

Homemade Thick Curd: उन्हाळ्यात दही कसे तयार करावे? मार्केटसारखे घट्ट दही तयार करण्यासाठी फॉलो करा 10 स्टेप्स

Homemade Thick Curd: घरी बनवा बाजारासारखे घट्ट आणि चविष्ट दही! उन्हाळ्यात सोप्या पद्धतीने परफेक्ट दही लावण्यासाठी ही स्टेप-बाय-स्टेप रेसिपी नक्की फॉलो करा.

Homemade Thick Curd: उन्हाळ्यात दही कसे तयार करावे? मार्केटसारखे घट्ट दही तयार करण्यासाठी फॉलो करा 10 स्टेप्स
"How To Make Thick Curd At Home: घरच्या घरी घट्ट जाडसर दही कसे तयार करावे?"
Canva

Homemade Thick Curd: काही लोकांना जेवताना दही खाण्याची सवय असते, त्याशिवाय या मंडळींना जेवल्यासारखं वाटत नाही. पराठे, भात असो किंवा कोशिंबीर एकूणच दह्यामुळे जेवणाची वाढते.  उन्हाळा सुरू झाला की दह्याचा वापर अधिक वाढतो. पण बाजारातून दही आणण्याऐवजी घरच्या घरीच दही तुम्ही सहज तयार करू शकता. दही कसे तयार करायचे? जाणून घेऊया सविस्तर रेसिपी

दही तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य

  • अर्धा लिटर दूध
  • अर्धा मोठा चमचा कॉर्नफ्लोर
  • एक मोठा चमचा मिल्क पावडर
  • थोडे ताजे दही

मार्केटसारखे घट्ट दही तयार करण्याची रेसिपी 

1. दूध गरम करा

सर्वप्रथम एका पॅनमध्ये अर्धा लिटर दूध घेऊन ते गरम करायला ठेवा.

2. दुधाला उकळ येऊ द्या  

दूध तास-न्-तास आटवण्याची गरज नाही. दुधाला एक उकळी आली की गॅस बंद करा.

3. दूध थंड करा

दूध थोडे कोमट होईपर्यंत थंड होऊ द्या.

4. विरजण तयार करा
एका छोट्या वाटीत थोडे ताजे दही घ्या आणि त्यात थोडे कोमट दूध मिसळून पातळ मिश्रण तयार करा.

5. मिश्रण एकजीव करा

आता कोमट दुधाच्या भांड्यात हे विरजणाचे मिश्रण व्यवस्थित मिसळा.

(नक्की वाचा: Diabetes Tests: मधुमेहींना मोठा दिलासा! रक्त नाही आता श्वास सांगणार तुमचा डायबेटिस, कशी होणार टेस्ट? वाचा)

6. भांडे निवडा

दही लावण्यासाठी शक्य असल्यास मातीचे भांडे वापरा, यामुळे दह्याला उत्तम चव येते.

7. भांडे झाकून ठेवा

दह्याचे मिश्रण मातीच्या भांड्यात ओतून ते सुती कापडाने किंवा अ‍ॅल्युमिनियम फॉइलने घट्ट झाकून ठेवा.

8. उबदार ठिकाणी ठेवा

दही लवकर सेट होण्यासाठी एक कढई थोडीशी गरम करून घ्या. त्यात एक किचन टॉवल अंथरून त्यावर दह्याचे भांडे ठेवा.

(नक्की वाचा: Tawa Cleaning Tips: तुमच्या किचनमधील तवा काळाकुट्ट झालाय? महागडे लिक्विड नव्हे या 4 टिप्स करा फॉलो, नव्या तव्यासारखी येईल चमक)

9. दही तयार होण्याची वाट पाहा

साधारण दोन तासांत घरच्या घरी बाजारसारखे घट्ट दही खाण्यासाठी तयार होईल.

10. टीप: मातीचे भांडे वापरल्यास दह्यातील अतिरिक्त ओलावा शोषला जातो, ज्यामुळे दही अधिक घट्ट होते.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com