बाजारपेठेत हळदीची मागणी झपाट्याने वाढत असून त्यामुळे दुकानदारांकडूनही बनावट हळदीची विक्री केली जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दूध, खाद्यपदार्थ आणि मसाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असते आणि या भेसळयुक्त गोष्टी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. आज आपण शुद्ध आणि भेसळयुक्त हळद कशी ओळखावी, याबद्दल बोलणार आहोत. आयुर्वेदापासून आधुनिक विज्ञानापर्यंत हळद अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण मानली जाते. हळद खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात.
हळदीचे फायदे
सर्दी झाल्यास पिण्यासाठी हळदीचं दूध दिलं जातं किंवा दुखापत झाल्यास जखमेवर हळदीची पेस्ट लावावी जाते. ही पद्धत आपल्या पूर्वजांच्या काळापासून चालत आली आहे. किरकोळ समस्यांसाठी अनेकदा हळदीचा वापर केला जातो. परंतू आजकाल बहुतांश लोक बाजारात मिळणारी हळद वापरतात. बाजारात मिळणारी हळद अनेकदा भेसळयुक्त असून ती आरोग्यासाठीही हानिकारक असते. अशा परिस्थितीत आपण आरोग्यदायी म्हणून वापरत असलेली हळद शुद्ध आहे की बनावट हे कसे ओळखायचे?
भेसळयुक्त हळद कशी ओळखायची
- भेसळयुक्त किंवा बनावट हळद ओळखण्यासाठी तुम्हाला एका ग्लासमध्ये साधं पाणी घ्यावं लागेल.
- त्यात एक चमचा हळद घाला. यानंतर ते चांगले मिसळा.
- एकत्र केल्यानंतर, हळद भेसळयुक्त असल्यास ग्लासाच्या तळाशी गोळा होईल.
- बनावट किंवा भेसळयुक्त हळद पाण्यात मिसळल्याने तिचा रंग गडद किंवा चमकदार होतो.
- तुमच्या तळहातावर चिमूटभर हळद घ्या आणि दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने 10-20 सेकंद मसाज करा. हळद शुद्ध असेल तर हातावर पिवळे डाग पडतील.
- गरम पाण्याने भरलेलं भांडं घ्या, नंतर त्यात 1 चमचा हळद घाला आणि एकत्र करा. जर हळद तळाशी स्थिर झाली असेल तर हळद शुद्ध आहे. परंतु पाण्यात मिसळल्यावर ती गडद पिवळी झाली तर फेकून द्या, ती भेसळयुक्त हळद आहे.
हळदीमध्ये असणाऱ्या पोषक तत्त्वांबाबत बोलायचे झाले, तर यामध्ये अँटीऑक्सिडंड, अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल, अँटी-कार्सिनोजेनिक, अँटी-म्युटाजेनिक व अँटी-इंन्फ्लमेट्री अशा गुणधर्मांचे भांडार आढळते. मात्र भेसळयुक्त हळद आपल्या आरोग्यावर परिणाम करु शकते.