जाहिरात

How To Remove Lint From Clothes: काळ्या रंगाचे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यानंतर पांढरे डाग राहतात का?

Black Clothes Care Hacks: काळ्या रंगाच्या कपड्यांवरील चमक टिकवून ठेवण्यासाठी महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करणे आवश्यक नाही. यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्सही फॉलो करू शकता.

How To Remove Lint From Clothes: काळ्या रंगाचे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यानंतर पांढरे डाग राहतात का?
"वॉशिंग मशिनमुळे काळ्या कपड्यांवर पांढरे डाग राहतात का?"

How To Remove Lint From Clothes: काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे बहुतांश लोकांना आवडते. काळ्या रंगाचे कपडे दिसायला जितके स्टायलिश दिसतात, तितकेच त्यावर जमा झालेली धूळ किंवा पांढरे डाग पटकन दिसून येतात. विशेषतः वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर कपड्यांवर पांढऱ्या गोष्टींचा थर जमा होतो आणि कितीही प्रयत्न केले तरी ते स्वच्छ करणे कठीण असते. काही सोप्या टिप्स फॉलो करुन काळ्या रंगांच्या कपड्याची ही समस्या काही मिनिटांत दूर होईल.  

कपडे धुण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा  

  • कपडे धुण्यापूर्वी ते उलटे करा म्हणजे आतील बाजू बाहेरील बाजूस करा. यामुळे आतील बाजूवर पांढऱ्या रंगाचा थर जमा होण्याची शक्यता आहे. 
  • तसेच कपड्यांचे खिसे तपासून पाहा, टिशू पेपर किंवा कागद असतील ते बाहेर काढा. कागदांचाही थर कपड्यांवर जमा होतो.  
Latest and Breaking News on NDTV

कपडे धुण्यासाठी फॉलो करा जबरदस्त टिप्स (Washing Machine Tips For Dark Clothes)

  • कपडे धुण्याच्या पावडरचे प्रमाण योग्य असावे. यामुळे काळ्या रंगाच्या कपड्यावर पांढरे डाग दिसू लागतात. 
  • शेवटच्या पाण्यामध्ये अर्धा कप पांढरे व्हिनेगर मिक्स करू शकता, हे कपड्यांसाठी नैसर्गिक फॅब्रिक सॉफ्टनर म्हणून काम करते.  
  • कपडे धुण्याची पावडर सुरुवातीस गरम पाण्यात मिक्स करा, जेणेकरून पावडर पाण्यात पूर्णपणे विरघळेल आणि कपड्यांवर पांढरे डाग दिसणार नाहीत.

Drinking Black Coffee On Empty Stomach Benefits: रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी प्यायल्यास काय होते?

(नक्की वाचा: Drinking Black Coffee On Empty Stomach Benefits: रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी प्यायल्यास काय होते?)

कपडे धुतल्यानंतर या गोष्टीची घ्या काळजी  

  • कपडे सुकवल्यानंतर मायक्रोफायबर कपडे किंवा ओले स्क्रबर पॅड घ्या आणि कपड्यांवर हलक्या हाताने फिरवा, जेणेकरून कपड्यांवरील पांढऱ्या रंगाच्या डागांची समस्या दूर होईल. 
  • ड्रायरचा वापर करत असाल तर त्यामध्ये ड्रायर शीटचा वापर करावा, यामुळे स्टॅटिक चार्ज कमी होईल.  
  • ड्रायर नसेल तर व्हिनेगरने कपडे धुणेही तितकेचे फायदेशीर ठरेल. 
Latest and Breaking News on NDTV

एक्सपर्ट टिप्स (Black Clothes Cleaning Tips)

  • वॉशिंग मशीनमध्ये एकाच वेळेस जास्त कपडे धुणे टाळावे, यामुळे कपडे योग्य पद्धतीने स्वच्छ होणार नाहीत.
  • तुमच्या परिसरातील पाण्याचे स्वरुप जड असेल तर त्यामध्ये वॉटर सॉफ्टनर किंवा पांढरे व्हिनेगर मिक्स करू शकता. 
  • गडद रंगाच्या कपड्यांसाठी विशेष पावडरचा वापर करू शकता, जेणेकरून कपड्यांवरील चमक आणि रंग देखील टिकून राहील.   

Ghee Benefits: तुपाचे 7 जबरदस्त फायदे, आयुर्वेदानुसार तुपाचा वापर कसा करावा? वाचा सविस्तर माहिती

(नक्की वाचा: Ghee Benefits: तुपाचे 7 जबरदस्त फायदे, आयुर्वेदानुसार तुपाचा वापर कसा करावा? वाचा सविस्तर माहिती)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com