जाहिरात

Platform Ticket: मुंबईकरांनी लक्ष द्या! दिवाळी काळात 'या' स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद, पाहा यादी

स्थानकांवर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवरील हा प्रतिबंध २८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रभावी राहणार आहे. 

Platform Ticket: मुंबईकरांनी लक्ष द्या! दिवाळी काळात 'या' स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद, पाहा यादी

Railway Platform Ticket Sale Suspended: देशभरात दिवाळीच्या सणाची धामधुम सुरु आहे. दिवाळी तसेच छट पूजेच्या उत्सवामुळे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे.  दिवाळी (Diwali) आणि छठ पूजेच्या (Chhath Puja) काळात रेल्वे स्थानकांवर होणारी प्रवाशांची अतिदाब गर्दी (Overcrowding) नियंत्रित करण्यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railways) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली आणि मुंबई (Mumbai-Delhi) सह देशभरातील १५ प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची (Platform Ticket) विक्री तात्पुरती बंद करण्यात आली आहे.  रेल्वेच्या या निर्णयाचा मुख्य उद्देश व्यस्त स्थानकांवर प्रवाशांची सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक सुनिश्चित करणे, तसेच गाडीमध्ये चढणे आणि उतरणे (Boarding and Alighting) सुलभ करणे हा आहे. स्थानकांवर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवरील हा प्रतिबंध २८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रभावी राहणार आहे. 

BSNL ची दिवाळी भेट! फक्त 1 रुपयांत 30 दिवस Unlimited Calling आणि 2GB डेटा, वाचा सर्व माहिती

रेल्वे बोर्डाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens), आजारी प्रवासी, लहान मुले आणि मदत आवश्यक असलेल्या महिला प्रवाशांना मात्र प्लॅटफॉर्म तिकिटे जारी केली जातील. मुंबईतील सहा स्थानकांवर आजपासून बंदी  मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), ठाणे, कल्याण आणि पनवेल या सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री आज, १६ ऑक्टोबर २०२५ पासूनच प्रतिबंधित करण्यात आली आहे.

प्लेटफॉर्म तिकीट बंदी असलेले १५ प्रमुख रेल्वे स्थानक:

  • नवी दिल्ली रेल्वे स्थानक
  • दिल्ली रेल्वे स्थानक
  • हजरत निजामुद्दीन
  • आनंद विहार टर्मिनल
  • गाझियाबाद
  • बांद्रा टर्मिनस
  • वापी
  • सुरत
  • उधना
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)
  • दादर
  • लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)
  • ठाणे
  • कल्याण
  • पनवेल

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना त्यांनी या बदलांनुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे आणि या सणासुदीच्या काळात सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन केले आहे.

Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून 13 जिल्ह्यांना अलर्ट

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com