भारतीय वायू सेनेमध्ये नोकरीची मोठी संधी! पगार, परीक्षा व ऑनलाइन अर्जाची वाचा सविस्तर माहिती

Indian Air Force Agniveervauy: भारतीय वायू सेनेकडून (IAF) अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरवायूकरिता भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अर्ज कसा दाखल करावा? जाणून घ्या सविस्तर माहिती...

Advertisement
Read Time: 3 mins

Indian Air Force Agniveer Vayu Recruitment : भारतीय वायू सेनेतर्फे (IAF) अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरवायूकरिता भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यासाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. अविवाहित महिला व पुरुष उमेदवार यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

ऑनलाइन अर्ज कधीपासून करू शकता?

ऑनलाइन नोंदणी तारखा : 8 जुलै 2024 सकाळी 11 वाजेपासून ते 28 जुलै 2024 रात्री 11 वाजेपर्यंत अर्ज नोंदणी करू शकता.

(ट्रेंडिंग न्यूज:  AI चॅटबॉट हिरावून घेणार तुमची नोकरी? ChatGPT 4oने शेअर केली भारतातील ही यादी)

कधी आहे परीक्षा?

ऑनलाइन परीक्षेच्या तारखाः 18 ऑक्टोबर 2024 पासून पुढे.

वयोमर्यादा

जन्म मर्यादा तारीख : जन्म 03 जुलै 2004 व 03 जानेवारी 2008दरम्यान (दोन्ही तारखा समाविष्ट) जन्म झालेले उमेदवार पात्र असतील.

(ट्रेंडिंग न्यूज: ATM मधून पैसे काढण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार?)

शैक्षणिक पात्रता :

विज्ञान विषय

उमेदवाराला इंग्रजी विषयामध्ये 50% गुण आणि एकूण किमान 50% गुण असावेत. केंद्र, राज्य व केंद्रशासित प्रदेशांद्वारे मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळांकडील इन्टरमीडिएट / 10+2/ मॅथेमॅटिक्स, फिजिक्स व इंग्लिशसह तुल्य परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजेत.

किंवा
डिप्लोमा कोर्समधील इंग्लिशमध्ये 50% गुण आणि एकूण किमान 50% गुणांसह केंद्र, राज्य व केंद्रशासित प्रदेशांद्वारे मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक इन्स्टिट्युटकडील इंजिनिअरिंग (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाइल/ कॉम्प्युटर सायन्स / इन्स्ट्रमेन्टेशन टेक्नोलॉजी/ इन्फर्मेशन टेक्नोलाजी) मधील तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण (किंवा इन्टरमीडिएट / मॅट्रिक्युलेशनमधील, जर इंग्रजी विषय डिप्लोमा कोर्समध्ये नसल्यास)

Advertisement

व्होकेशनल कोर्समधील इंग्लिशमधील 50% गुण आणि एकूण किमान 50% गुण यासह केंद्र, राज्य व केंद्रशासित प्रदेशांद्वारे मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाकडील नॉन-व्होकेशनल विषय म्हणजेच फिजिक्स व मॅथेमॅटिक्स वासह दोन वर्षांचा व्होकेशनल कोर्स उत्तीर्ण (किंवा इन्टरमीडिएट / मॅट्रिक्युलेशनमधील, जर इंग्रजी विषय व्होकेशनल कोर्समध्ये नसल्यास)

विज्ञान विषयांखेरीज

इंग्रजीमध्ये 50% गुण आणि एकूण किमान 50% गुण असलेले केंद्र, राज्य व केंद्रशासित प्रदेशांद्वारे मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळांकडील कोणत्याही स्ट्रीम / विषयांत इन्टरमीडिएट / 10+2/ तुल्य परीक्षा उत्तीर्ण

Advertisement

किंवा

व्होकेशनल कोर्समधील इंग्लिशमधील 50% गुण आणि एकूण किमान 50% गुण यासह केंद्र, राज्य व केंद्रशासित प्रदेशांद्वारे मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाकडील दोन वर्षांचा व्होकेशनल कोर्स उत्तीर्ण (किंवा इन्टरमीडिएट मॅट्रिक्युलेशन, जर इंग्रजी विषय व्होकेशनल कोर्समध्ये नसल्यास)

NOTE: विज्ञान विषयांतील परीक्षेकरिता पात्र उमेदवार सुद्धा (समाविष्ट इन्टरमीडिएट / 10+2/ इंजिनिअरिंगमधील तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स किंवा फिजिक्स व मॅथ्सच्या नॉन-व्होकेशनल विषयांसह दोन वर्षांचा व्होकेशनल कोर्स) विज्ञान विषयांखेरीज पात्र असणार आहेत आणि दोन्ही विज्ञान विषयांत परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात येणार आहे आणि ऑनलाइन नोंदणी प्रपत्र भरतेवेळी विज्ञान विषयांखेरीज एकाच वेळी परीक्षा.

Advertisement

नोंदणी आणि परीक्षा शुल्क: 

550 रुपये अधिक जीएसटी.  

किती मिळेल वेतन?

 सेवेचे वर्ष मासिक वेतन इन हँडअग्निवीर कॉर्पस फंडातील योगदान (30%)
 पहिले वर्ष 30,000 /- 21,000 /- 9,000 /- 
 दुसरे वर्ष 33,000 /- 23,100 /- 9,900 /-
 तिसरे वर्ष 36,500 /- 25,550 /- 10,950 /-
 चौथे वर्ष 40,000 /- 28,000 /- 12,000 /-

अर्ज कसा दाखल करावा?

उमेदवारांनी https://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर लॉग इन करून ऑनलाइन अर्ज दाखल करावा.   

ऑनलाइन नोंदणीदरम्यान खालील कागदपत्रे अपलोड करावी 

1. इयत्ता दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
2. इंटरमीडिएट/10+2 उत्तीर्ण प्रमाणपत्र
3. किंवा आवश्यक असलेली संबंधित विषयातील अंतिम वर्षाची गुणपत्रिका 
4 पासपोर्ट साइज रंगीत फोटो (फोटो जून 2024 पूर्वीचा नसावा)
5. उमेदवाराच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा 
6. उमेदवाराच्या स्वाक्षरीचा फोटो 
7. उमेदवाराच्या आईवडिलांचा फोटो/ पालकांच्या स्वाक्षरीचा फोटो (उमेदवाराचे वय 18 वर्षांखालील असल्यास)