एटीएममधून पैसे काढणाऱ्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता तुम्हाला जास्तीचे पैसे खर्च करावे लागू शकतात. एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता ज्यादाचे शुल्क भरावे लागू शकतात. एटीएम ऑपरेटर्सनी भारतीय रिझर्व्ह बँक आणि नॅशनल पेमेन्ट्स कॉरपोरेशन ऑफ इंडियाकडे (NPCI) एटीएममधून कॅश काढण्यासाठीचं शुल्क वाढवण्याची मागणी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ET च्या रिपोर्टनुसार, एटीएम इंडस्ट्रीची संघटना कॅटमीने (CATMI) मागणी केली आहे की एटीएम इंटरचेंज फी (ATM Interchange Fee) वाढवून 23 रुपये प्रति ट्रान्झॅक्शन करावी. यामुळे एटीएम व्यवसायात आणखी गुंतवणूक होऊ शकते. एटीएम इंटरचेंज चार्ज हे कार्ड जारी करणाऱ्या बँकेकडून कापले जातात आणि ते ज्या बँकेच्या एटीएममधून तुम्ही पैसे काढले त्या बँकेला दिले जातात.
(नक्की वाचा - भाज्यांनी आणलं रडकुंडीला, फरसबी-दोडका 160 रुपये किलो; महिनाभर दर चढेच राहण्याची शक्यता)
इंटरचेंज फी वाढीचा परिणाम
एटीएम इंटरचेंज फी वाढवली तर त्याचा थेट परिणाम एटीएममधून पैसे काढणाऱ्यांवर होणार आहे. एटीएमची फ्री लिमिट संपल्यानंतर पैसे काढल्यास त्यासाठी हे जास्तीचं शुल्क द्यावं लागणार आहे. एटीएम ऑपरेटर्सना आशा आहे की रिझर्व्ह बँक त्यांच्या मागण्या मान्य करेल. याआधी एटीएम इंटरचेंज फी दोन वर्षांपूर्वी वाढवली होती. मात्र ऑपरेटर्सच्या मागणी रिझर्व्ह बँकेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
(नक्की वाचा- Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पाची तारीख ठरली, अर्थमंत्र्यांकडून तयारीला सुरूवात)
एटीएममधून फ्री लिमिट किती?
देशातील मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई या सारख्या प्रमुख शहरांमध्ये एटीएममधून पैसे काढण्यासाठी ज्या बँकेचं कार्ड आहे त्या बँकेच्या एटीएममधून महिनाभरात 5 वेळा फ्रीमध्ये पैसे काढले जाऊ शकतात. मात्र दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यात केवळ तीन वेळा मोफत पैसे काढले जाऊ शकतात. त्यानंतर पैसे काढल्यास विविध बँकांचे शुल्क वेगळे आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world