जाहिरात
Story ProgressBack

AI चॅटबॉट हिरावून घेणार तुमची नोकरी? ChatGPT 4oने शेअर केली भारतातील ही यादी

नवीन ChatGPT 4o मॉडेलला भारतातील रिप्लेस होणाऱ्या नोकऱ्यांबाबत विचारले असता नेमकी काय माहिती समोर आली आहे? जाणून घेऊया सविस्तर...

Read Time: 2 mins
AI चॅटबॉट हिरावून घेणार तुमची नोकरी? ChatGPT 4oने शेअर केली भारतातील ही यादी

जेव्हापासून ChatGPT, Copilot, आणि Gemini यासारख्या AI चॅटबॉट्स टेक्नोलॉजी विकासित होत आहे, तेव्हापासून प्रत्येकाच्या मनामध्ये नोकरी गमावली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. काही प्रमाणात ही भीती अगदीच खोटीही ठरवता येणार नाही. कारण गेल्या सहा महिन्यांमध्ये टेक्नोलॉजी क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर लक्ष केंद्रित केल्याने हजारोंच्या संख्येने नोकऱ्यांच्या संधीमध्ये कपात केली आहे. मेटा, गुगल, अ‍ॅपल आणि अ‍ॅमेझॉन यासारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी आतापर्यंत आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. layoff.fyi या वेबसाइटवरील माहितीनुसार, वर्ष 2024मध्ये 302 टेक कंपन्यांनी सुमारे 89 हजार 105 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली.  

टेक लीडर्सकडून काय आहे म्हणणे? 

सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, सॉफ्टवेअर डेव्हलपर (software developers), वेब डेव्हलपर (web developers), कम्प्युटर प्रोग्रामर (computer programmers), कोडर (coders) आणि डेटा सायंटिस्ट (data scientists) म्हणून काम करणाऱ्यांना नागरिकांना विशेषतः AI टेक्नोलॉजीमुळे फटका बसत आहे. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांवर AIमुळे नोकरी गमावण्याची वेळ येण्याची शक्यता असते. 

Nvidia सॉफ्टवेअर कंपनीचे CEO जेनसेन हुआंग आणि  HCLचे माजी CEO विनीत नायर यांसारख्या प्रसिद्ध असणाऱ्या टेक लीडर्सकडूनही हेच सूचित करण्यात आले आहे की, मूलभूत स्तरावरील कोडिंग लवकरच ऑटोमेटेड टुल्सद्वारे केली जाईल आणि या कौशल्याची जाण असणाऱ्या लोकांची भविष्यात कमी-अधिक प्रमाणात नियुक्त केली जाईल. 

सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट

अशाच आशयाची माहिती देणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये भविष्यामध्ये ChatGPT 4o द्वारे रिप्लेस होऊ शकतील अशा नोकऱ्यांची यादी ChatGPTने शेअर केली होती. ChatGPT 4oला भारतातील नोकऱ्यांसंदर्भातील प्रश्न विचारल्याचे पोस्टमध्ये दिसत आहे. काम करण्याच्या प्रक्रियेमध्ये चॅटबॉट हे मनुष्याप्राण्यांपेक्षा अधिक चांगले का असेल?  ChatGPT द्वारे रिप्लेस होऊ शकणाऱ्या काही विशिष्ट नोकऱ्यांची शक्यता आहे का ? याची यादी ChatGPT 4oला तयार करण्यास सांगितले गेले. 

काय आहे शक्यता?

ChatGPT 4oनुसार, भारतामध्ये चॅटबॉटद्वारे रिप्लेस होण्याची शक्यता असलेली नोकरी म्हणजे डेटा एण्ट्री क्लर्क. कारण हेच काम जलद गतीने आणि कमी त्रुटींसह आपण सहज करू शकतो,असा चॅटबॉटला विश्वास आहे. ChatGPT 4oमुळे डेटा एण्ट्री क्लर्कच्या नोकऱ्या रिप्लेस होण्याची 95 टक्के शक्यता आहे. चॅटबॉटनुसार,"सध्याच्या AIची क्षमता आणि ट्रेंडनुसार आधारित या शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. ज्या GPT-4 सारख्या AI टेक्नोलॉजीमुळे या क्षेत्रांतील नोकऱ्यांवर परिणाम होण्याची किंवा नोकऱ्या पूर्णतः रिप्लेस होण्याची शक्यता वर्तवतात". 
 

वर्तवण्यात आलेल्या या शक्यतांनुसार AI नवीन समस्या सोडवण्यास किंवा नावीन्यपूर्ण पद्धतीने कार्य करण्यास खरंच सक्षम असणार आहे का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.   

Monsoon Forecast | कसा सुरु आहे मान्सूनचा प्रवास? शेतकऱ्यांनो आनंदाची बातमी पाहा... 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
अमित शाहांनी राजनाथ सिंह यांच्यानंतर शपथ का घेतली? काय आहेत लोकसभेचे नियम?
AI चॅटबॉट हिरावून घेणार तुमची नोकरी? ChatGPT 4oने शेअर केली भारतातील ही यादी
mallikarjun-kharge-exclusive ndtv-interview-rahul-gandhi-prime-minister-india-alliance-my-choice-for-pm-candidate
Next Article
Exclusive : पंतप्रधानपदाची चॉईस कोण? काँग्रेस अध्यक्ष खर्गेंनी सांगितली 'मन की बात'
;