भारतीय रेल्वे नोकरीच्या संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये विविध प्रकारच्या 1036 जागांसाठी भरतीची घोषणा झाली आहे. इच्छुक उमेदवार भारतीय रेल्वेच्या वेबसाईटवर जाऊन सविस्तर माहिती घेत अर्ज दाखल करु शकतात. इच्छूक उमेदवारांना 7 जानेवारी आणि 6 फेब्रुवारी 2025 दरम्यान अर्ज करता येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अर्ज शुल्क
सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 500 रुपये असणार आहे. तर SC/ST उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये असणार आहे.
(नक्की वाचा : State Cabinet Portfolio राज्यमंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणतं खातं कुणाकडं? वाचा सर्व माहिती )
कोणत्या जागांसाठी भरती?
पदव्युत्तर शिक्षक (PGT): 187
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT): 338
वैज्ञानिक पर्यवेक्षक (अर्गोनॉमिक्स आणि प्रशिक्षण): 03
मुख्य कायदा सहाय्यक: 54
सरकारी वकील : २०
शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (PTI) - इंग्रजी माध्यम : 18
वैज्ञानिक सहाय्यक / प्रशिक्षण: 02
कनिष्ठ अनुवादक हिंदी: 130
वरिष्ठ प्रसिद्धी निरीक्षक: ०३
कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक: 59
ग्रंथपाल: 10
संगीत शिक्षिका (महिला): 3
प्राथमिक रेल्वे शिक्षक: 188
सहाय्यक शिक्षक (महिला कनिष्ठ शाळा): 02
प्रयोगशाळा सहाय्यक/शाळा: 07
लॅब असिस्टंट ग्रेड III (रसायनशास्त्रज्ञ आणि धातूशास्त्रज्ञ): 12
(नक्की वाचा- MS Dhoni : धोनीच्या अडचणीत वाढ; हरमूमधील बंगला का आला चर्चेत?)
अर्ज कसा करायचा?
उमेदवार अधिकृत RRB वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज दाखल करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया तपासून घ्या.