International Men's Day: हयगय नको! प्रत्येक पुरुषाने 'या' 5 आरोग्य तपासण्यात केल्याच पाहिजे

नियमित आरोग्य तपासणी केवळ आजार शोधण्यात मदत करत नाही, तर त्यांना गंभीर स्वरूप धारण करण्यापासूनही रोखते. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त प्रत्येक पुरुषाने आपल्या आरोग्य रूटीनमध्ये समाविष्ट कराव्यात अशा 5 आवश्यक टेस्ट्सची माहिती घेऊयात. 

जाहिरात
Read Time: 3 mins

 International Men's Day:  लोक आता आरोग्याबाबत जागरूक होत असले तरी, आजही अनेक पुरुष नियमित आरोग्य तपासणी किंवा आवश्यक वैद्यकीय चाचण्या टाळतात. जोपर्यंत त्रास होत नाही, तोपर्यंत लक्ष द्यायचा नाही ही विचारसरणी अत्यंत चुकीची आहे. जसजसे वय वाढत जाते, तसतसे शरीरात लक्षणे न दिसता अनेक गंभीर आजार लागतात.

नियमित आरोग्य तपासणी केवळ आजार शोधण्यात मदत करत नाही, तर त्यांना गंभीर स्वरूप धारण करण्यापासूनही रोखते. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त प्रत्येक पुरुषाने आपल्या आरोग्य रूटीनमध्ये समाविष्ट कराव्यात अशा 5 आवश्यक टेस्ट्सची माहिती घेऊयात. 

1. लिपिड प्रोफाइल टेस्ट (Lipid Profile Test)

हृदयविकारमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण जगभरात खूप जास्त आहे. ही चाचणी रक्तातील उत्तम आणि खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण तपासते. हाय कोलेस्ट्रॉलमुळे धमन्यांमध्ये चरबी जमा होऊन हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुले 30 वर्षांनंतर प्रत्येक पुरुषाने दर 4 ते 5 वर्षांनी ही चाचणी करावी. कुटुंबात उच्च कोलेस्ट्रॉलचा इतिहास असल्यास, ही तपासणी लवकर सुरू करावी.

2. ब्लड प्रेशर (Blood Pressure)

सर्वात सोपी, स्वस्त आणि सर्वात महत्त्वाची चाचणी आहे. उच्च रक्तदाब याला "सायलेंट किलर" म्हटले जाते, कारण याची लक्षणे दिसत नाहीत. पण यामुळे हृदय, मूत्रपिंड (Kidney) आणि मेंदूला (Brain) गंभीर नुकसान पोहोचू शकते. सामान्य रक्तदाब 120/80 mmHg पेक्षा कमी मानला जातो. त्यामुळे दर 6 महिन्यांनी ब्लड प्रेशर तपासणे ही चांगली सवय आहे. रीडिंग  सतत जास्त आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Advertisement

3. ब्लड शुगर टेस्ट

मधुमेह (Diabetes) हा असा आजार आहे जो शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवाला प्रभावित करतो. ब्लड शुगर टेस्ट हे तपासते की तुमचे शरीर साखरेवर किती चांगल्या प्रकारे प्रक्रिया करत आहे. टाईप-2 मधुमेहाचे निदान लवकर झाल्यास आहार आणि जीवनशैलीत बदल करून तो नियंत्रित करता येतो. 40 व्या वर्षांनंतर प्रत्येक पुरुषाने दरवर्षी ही चाचणी करून घ्यावी.

4. प्रोस्टेट-स्पेसिफिक ॲन्टिजन टेस्ट 

प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमध्ये आढळणाऱ्या सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. पीएसए (PSA) टेस्ट प्रोस्टेट ग्रंथीमध्ये तयार होणाऱ्या एका प्रोटीनचे प्रमाण मोजते. याचे प्रमाण वाढणे हे प्रोस्टेटमध्ये सूज, संक्रमण किंवा कर्करोगाचे संकेत असू शकते. 50व्या वर्षांनंतर प्रत्येक पुरुषाने डॉक्टरांचा सल्ला घेऊन ही चाचणी सुरू करावी. कुटुंबात प्रोस्टेट कर्करोगाचा इतिहास असल्यास, 40 ते 45 वर्षांच्या दरम्यान ही तपासणी सुरू करणे आवश्यक आहे.

Advertisement

5. कोलोनोस्कोपी (Colonoscopy)

कोलोरेक्टल कर्करोग हा आणखी एक गंभीर आजार आहे, ज्याचे लवकर निदान करणे महत्त्वाचे आहे. कोलोनोस्कोपीमध्ये डॉक्टर लवचिक नळीद्वारे मोठ्या आतड्याची आतून तपासणी करतात आणि पॉलिप नावाचे जे वाढलेले भाग पुढे कर्करोगात बदलू शकतात, त्यांना काढून टाकू शकतात. 50 वर्षांनंतर दर 10 वर्षांनी ही चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो.

Topics mentioned in this article