Barat Gaurav Tourist Train Yatra : भारतीय रेल्वेचा पर्यटन विभाग IRCTC ने भाविकांसाठी एक जबरदस्त आणि खास पाऊल उचललं आहे. भाविकांसाठी भारत गौरव टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून ७ ज्योतिर्लिंग पॅकेज सुरू करण्यात आलं आहे.
या योजनेचा उद्देश देशभरातली लोकांना एकाच यात्रेतून प्रमुख धार्मिक स्थळांचं विशेष दर्शन घडवून आणणं आणि तीर्थयात्रा अत्यंत सोपं आणि खिशाला परवडेल अशा स्वरुपात करणं हा आहे. हा ११ रात्री आणि १२ दिवसांचा अध्यात्मिक प्रवास २७ एप्रिल रोजी गोरखपूरवरुन सुरू होईल.
कोणकोणत्या ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेता येईल?
- महाकालेश्वर मंदिर
- ओंकारेश्वर मंदिर
- सोमनाथ मंदिर
- नागेश्वर मंदिर
- भीमाशंकर मंदिर
- त्र्यंबकेश्वर मंदिर
- घृष्णेश्वर मंदिर...
या प्रवासादरम्यान पर्यटकांना राहण्याची, खाण्याची आणि स्थानिक प्रवासाची सोय करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान सर्व सुविधांची विशेष काळजी घेतली जाईल.
सर्व वर्गांच्या प्रवाशांसाठी स्लीपर, ३एसी आणि २एसी वर्ग उपलब्ध आहेत. भारत गौरव पर्यटक रेल्वे हा भारतीय रेल्वेचा एक अनोखा उपक्रम आहे, जो संकल्पना-आधारित प्रवाशाच्या माध्यमातून देशातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांना जोडतो. ही रेल्वे स्लीपर, ३एसी आणि २एसी यांसारख्या विविध वर्गांची सोय करते, जेणेकरून सर्व स्तरांतील प्रवासी या प्रवासाचा लाभ घेऊ शकतील.