जाहिरात

Dream प्लेस फिरून या...1 ते 10 एप्रिलपर्यंत IRCTC चे स्वस्त टूर पॅकेज; काश्मीर ते गोव्यापर्यंत फिरण्याची संधी

IRCTC Tour Package: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने १ ते १० एप्रिल दरम्यान प्रवाशांसाठी विशेष आणि परवडणारी टूर पॅकेजेस सुरू केली आहेत. जाणून घेऊया या खास पॅकेजविषयी...

Dream प्लेस फिरून या...1 ते 10 एप्रिलपर्यंत IRCTC चे स्वस्त टूर पॅकेज; काश्मीर ते गोव्यापर्यंत फिरण्याची संधी
IRCTC Tour Package

10-day India Tour: अचानक घरी यावं, आपली बॅग उचलावी आणि दूर फिरायला निघून जावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण नियोजन आणि बजेट अनेकदा आड येतात. अशावेळी एखादा पूर्वनियोजित केलेलं पॅकेज सोपं ठरलं. यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने १ ते १० एप्रिल दरम्यान प्रवाशांसाठी विशेष आणि परवडणारी टूर पॅकेजेस सुरू केली आहेत. जाणून घेऊया या खास पॅकेजविषयी...


१ बर्फाची मजा, काश्मीर टूर पॅकेज

पॅकेजचं नाव : HEAVENLY KASHMIR EX JAIPUR
प्रस्थान: जयपुरहून, १० एप्रिल 
कालावधी: ५ रात्र/६ दिवस
प्रवास: फ्लाइट आणि कॅब सुविधा

तुम्ही श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्ग आणि पहलगाम सारख्या सुंदर ठिकाणी फिरू शकता.

किंमत...

एकट्या व्यक्तीसाठी: ५१,०४० रुपये
2 व्यक्तींसाठी: ४०,८९० रुपये 
व्यक्तींसाठी: ३९,४६० रुपये 
मुलांसाठी: ३३,९६० रुपये

२. कुर्ग आणि म्हैसूरचा हिरवागार निसर्ग 

पॅकेजचे नाव: कॉफी विथ कर्नाटक
प्रस्थान: हैदराबाद, १ एप्रिल
कालावधी: ५ रात्री/६ दिवस
प्रवास: विमान आणि कॅब

किंमत:

एकट्या व्यक्तीसाठी: १६,७००
२ व्यक्तींसाठी: १४,०१० प्रति व्यक्ती
३ व्यक्तींसाठी: १०,९३० प्रति व्यक्ती
मुलांसाठी: ९,८१०

हे सर्वात किफायतशीर पॅकेज आहे, विशेषतः मित्र-मैत्रिणींसोबत.

३. सी क्रूझ, गोवा रेल्वे टूर

तुम्हाला गोव्याचा आनंद घ्यायचा असेल, तर हे पॅकेज उत्तम आहे:

पॅकेजचे नाव: चंदीगड ते गोवा रेल्वे टूर पॅकेज

प्रस्थान: चंदीगड, ४ एप्रिल
कालावधी: ५ रात्री आणि ६ दिवस
प्रवास: ट्रेन आणि कॅब

किंमत:

एकट्या व्यक्तीसाठी: २७,०८५
२ व्यक्तींसाठी: १९,४०५ प्रति व्यक्ती
३ व्यक्तींसाठी: १८,५९५ प्रति व्यक्ती
मुलांसाठी: १४,७२५

कमी खर्चात समुद्रकिनारा आणि पार्टी या दोन्हींचा आनंद घ्या.

बुकिंग कसं कराल?

या सर्व पॅकेजचं बुकिंग तुम्ही इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन करू शकता. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com