IRCTC Tour Package: परदेश सहलीचा प्लान करीत असाल तर IRCTC तुमच्यासाठी एक जबरदस्त पर्याय घेऊन आलं आहे. या प्रजासत्ताक दिनी तुम्ही दुबईला फिरण्याचा प्लान करू शकता. यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म कॉर्पोरेशनने ४ रात्री आणि ५ दिवसांचं खास पॅकेज लॉन्च केलं आहे. यासाठी प्रतिव्यक्ती किती रुपये द्यावे लागतील, जाणून घेऊया.
कोणासाठी आहे हे पॅकेज?
IRCTC चे पॅकेज जयपूर, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद आणि कोचीच्या पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. IRCTC ने सांगितलं की, या सहलीचा उद्देश देशातील विविध भागातील लोकांना एकत्र करीत त्यांचा परदेश दौरा करीत भारतातील एकता आणि सांस्कृतिक विविधता दाखवणं हा आहे.
पॅकेजमध्ये काय काय असेल?
IRCTC च्या पॅकेजमध्ये पर्यटकांना रिटर्न फ्लाइटसह थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा मिळेल. याशिवाय दुबईचा व्हिजा, टॅव्हल इन्शुरन्स, फूड आणि एसी बसमध्ये साइटसीनचा समावेश आहे. याशिवाय टूरमध्ये वाळवंटातील सफारीचा अनुभव घेता येईल. पॅकेजची किमत ९४,७३० रुपये प्रति व्यक्ती ठेवण्यात आली आहे.
या प्रवासादरम्यान पर्यटकांना दुबईतील प्रसिद्ध ठिकाणं उदा. पाम जुमेराह, मिरॅकल गार्डनर, बुर्ज अल अरब, गोल्ड आणि स्पाइक सूक (बाजार) पाहू शकतील. सोबतच जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफामधील लाइट्स आणि साऊंड शोदेखील या टूरचा भाग आहे. याशिवाय अबू धाबीला संपूर्ण दिवसभर फिरता येईल. दुबईतील गोल्ड मार्केटमध्येही खरेदीची संधी मिळेल. या पॅकेजचं बुकिंग ६ जानेवारीपर्यंत करता येईल.
महत्त्वाचे नियम जाणून घ्या...
दुबईला जाण्यापूर्वी काही आवश्यक नियम जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. दुबई एक आधुनिक शहर आगे. मात्र येथील कायदा अत्यंत कडक आहे.
- सार्वजनिक ठिकाणी अंग झाकलेले कपडे घालावेत.
- सार्वजनिक ठिकाणी दारू पिणं वर्ज्य आहे.
- ड्रग्जबाबत इथं झिरो टॉलरन्स नीती आहे.
- परवानगीशिवाय कोणाचेही फोटो काढू नये.
- सरकार किंवा धर्माविरोधात काहीही वक्तव्य करणं गुन्हा मानला जातो.
- प्रवासादरम्यान केवळ लायसन्स असलेली टॅक्सी किंवा कॅबचा वापर करा आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन करा.
- याव्यतिरिक्त पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन म्हणजेच सार्वजनिक ठिकाणांवर प्रेम किंवा शारिरीक जवळकी दाखविण्याबाबत कडक नियम आहेत.