Iron Deficiency: वारंवार थकवा आणि चक्कर येते? शरीरात आहे या गोष्टीची कमतरता न्युट्रिशनिस्टनी सांगितली कारणं

Iron Deficiency: महिलांच्या शरीरामध्ये लोहाची कमतरता का निर्माण होते? जाणून घ्या यामागील कारणं, लक्षणं आणि न्युट्रिशनिस्टने सांगितलेले उपाय...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Iron Deficiency: शरीरातील लोहाची कमतरता कशी दूर करावी?"

Iron Deficiency: महिलांमध्ये लोहाची कमतरता असणे ही एक सामान्य समस्या आहे, पण तुम्हाला माहीत आहे का की ही समस्या महिलांचे आरोग्य, त्यांची कार्यक्षमता आणि दैनंदिन जीवनावर वाईट परिणाम करू शकते. अनेकदा लोकांना याची लक्षणे ओळखता येत नाहीत. हीच गोष्ट लक्षात घेऊन क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन लवनीत बत्रा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. न्यूट्रिशनिस्ट बत्रा यांच्या मते काही महिला म्हणतात की,'मी तर रोज डाळ खाते, तरीही माझ्या शरीरात लोहाची कमतरता कशी काय असू शकते?' खरं तर, लोहाची कमतरता फक्त तुम्ही किती लोहाचे सेवन करत आहात यावर अवलंबून नसते, तर तुमचे शरीर ते किती चांगल्या प्रकारे शोषून (Absorb) घेऊ पाहत आहे यावरही अवलंबून असते.

Advertisement

शरीरात लोहाची कमतरता असल्याची लक्षणे

  • वारंवार थकवा जाणवणे
  • चक्कर येणे
  • शरीरात अशक्तपणा जाणवणे
  • लवकर धाप लागणे 
  • नेहमी थंडी वाजणे
  • पीरियड्स (मासिक पाळी) दरम्यान जास्त अशक्तपणा जाणवणे

पोषणतज्ज्ञांच्या मते, एका महिलेला (Adult Woman) दररोज सुमारे 18 ते 21 मिलीग्रॅम लोहाची आवश्यकता असते. तर दुसरीकडे एका वाटी डाळीमध्ये केवळ दोन ते तीन मिलीग्रॅम लोह असते. त्यामुळे शरीराची गरज पूर्ण करण्यासाठी फक्त डाळ खाणे पुरेसे नाही.

(नक्की वाचा: What Is Acidity: पोटात जळजळ होते? अ‍ॅसिडिटी म्हणजे काय? तुमच्या या 7 वाईट सवयी तातडीने बंद करा, अन्यथा...)

कोणत्या गोष्टी लोह शोषून घेण्यास अडथळा ठरतात?

  1. जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणे
  2. व्हिटॅमिन सी (Vitamin C) ची कमतरता असणे
  3. पचनसंस्था खराब असणे
  4. वारंवार डायटिंग करणे
  5. पीरियड्स दरम्यान जास्त रक्तस्त्राव (Heavy Bleeding) होणे
  6. आहारात प्रोटीनचे प्रमाण कमी असणे

लोहाची कमतरता कशी टाळावी?  

1. जेवणासोबत लिंबू खावा

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीराला लोह चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करते. त्यामुळे सॅलड, डाळ किंवा भाजीसोबत लिंबाचा वापर केला जाऊ शकतो.

(नक्की वाचा: Symptoms of UTI: उन्हाळ्यात लघवी करताना जळजळ होतेय? उष्णता समजून दुर्लक्ष करू नका, असू शकतो हा गंभीर आजार)

Advertisement

2. जेवणानंतर लगेच चहा-कॉफी पिणे टाळा

जेवल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी प्यायल्याने त्यातील घटक लोह शोषण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणू शकतात. म्हणूनच जेवणानंतर कमीत कमी एक ते दोन तासांनी चहा-कॉफी प्यावी.

3. आहारात प्रोटीनचे प्रमाण वाढवा 

प्रोटीन शरीराला लोहाचा योग्य वापर करण्यास मदत करते. यासाठी डाळी, पनीर, दूध, दही, अंडी आणि इतर प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

Advertisement

4.पोटाच्या आरोग्याची काळजी घ्या

जर तुमच्या शरीराची पचनसंस्था ठीक नसेल, तर तुमचे शरीर लोह योग्य रीतीने शोषून घेऊ शकणार नाही. म्हणूनच पोटाचे आरोग्य निरोगी ठेवणे आवश्यक आहे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )